Thursday, April 17, 2025
मराठी

Fact Check

फॅक्ट चेक: काँग्रेसला मतदानासाठी थेट दुबई वरून फतवा? खोटा आहे हा दावा

Written By Prasad S Prabhu, Edited By JP Tripathi
Nov 8, 2024
banner_image

Claim
काँग्रेसला मतदानासाठी थेट दुबई वरून फतवा काढण्यात आलाय.
Fact
व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाच महिने जुना असून त्यात दाखविण्यात आलेले पत्रही बनावट आहे.

काँग्रेसला मतदानासाठी थेट दुबई वरून फतवा काढण्यात आला आहे असा दावा News18 लोकमत चॅनेलच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुंबई भाजपच्या अधिकृत X आणि फेसबुक अकाऊंटवरून हा दावा करण्यात आला असून हाच दावा अनेक सोशल मीडिया युजर्स शेयर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

फॅक्ट चेक: काँग्रेसला मतदानासाठी थेट दुबई वरून फतवा? खोटा आहे हा दावा

इतर युजर्सद्वारेही हा दावा शेयर करण्यात आल्याचे आमच्या पाहणीत आले.

दाव्यांचे संग्रहण येथे, येथे, येथे आणि येथे पाहता येईल.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

“Association of Sunni Muslims” संघटनेने हा फतवा काढला असून मतदारांना याद्वारे काही आमिषेही दाखविण्यात आली आहेत. असे संबंधित News18 लोकमत चॅनेलच्या न्यूजरिपोर्टमधील व्हायरल झालेल्या भागात म्हटले आहे. संबंधित संघटनेचे नाव दाखविणारे एक पत्रही संबंधित व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान “काँग्रेसला मतदानासाठी थेट दुबई वरून फतवा!” आणि “महाविकास आघाडीला मतदान करा – मुस्लिम फतवा हा फतवा दुबईतून काढण्यात आलेला आहे. काँग्रेसला मतदान केल्यास संपूर्ण आर्थिक मदत केली जाईल असे फतव्यात आश्वासन दिलेले आहे. हिंदूंनो जागे व्हा व महायुतीला एकगठ्ठा मतदान करा.” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला होणार आहे. भाजप आणि मित्रपक्षांची महायुती आणि काँग्रेस व मित्रपक्षांची महाविकास आघाडी प्रामुख्याने संघर्षात सहभागी झाली आहे. दरम्यान महायुतीच्या प्रचारासाठी या दाव्याचा वापर केला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्यातील संबंधित व्हिडिओच्या पाहणीसाठी आम्ही त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला News18 Lokmat ने आपल्या अधिकृत युट्युब चॅनेलवर 14 मे 2024 रोजी अपलोड केलेला एक व्हिडीओ मिळाला. “Special Report | Raj Thackeray | कथित फतवा अन् पेटला राजकीय ‘वणवा’ | Lok Sabha Election” अशा शीर्षकाखाली बनविण्यात आलेला न्यूज रिपोर्ट या व्हिडिओमध्ये असल्याचे आमच्या पाहणीत आले. संबंधित रिपोर्टमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान जारी झालेल्या कथित फतव्यामुळे राजकीय वणवा कसा पेटला याची माहिती आम्हाला मिळाली.

व्हायरल व्हिडीओ हा News18 Lokmat च्या पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना प्रसारित केलेल्या न्यूज रिपोर्टचा भाग असल्याची माहिती आम्हाला मिळाली. यावरून हा फतव्याचा व्हिडीओ सध्याचा नाही आणि असा फतवा आताच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेला नाही. याची आम्हाला खात्री झाली.

यावरून आमच्या एक गोष्ट लक्षात आली की, लोकसभा निवडणुकीच्या काळात जारी झालेल्या संबंधित फतव्याच्या दाव्यावर न्यूजचेकरने 9 मे 2024 रोजी फॅक्टचेक प्रसिद्ध केले होते. “लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे हे पत्र बनावट आहे” हे तेंव्हाच सिद्ध झाले होते.

आम्ही केलेल्या फॅक्टचेक रिपोर्टनुसार सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दाखविण्यात येत असलेले व्हायरल पत्र पाच महिन्यांपूर्वीही व्हायरल झाले होते. व्हायरल पत्राच्या शीर्षस्थानी “Association of Sunni Muslims” असे इंग्रजीत लिहिले आहे आणि त्याखाली त्याचे भाषांतरही हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे. याशिवाय, पत्ता आहे “#2-11th street, Khalid Bin Walid Road, Plot no. Umm Hurair One, Dubai, United Arab Emirates” आणि जारी करण्याची तारीख 29 एप्रिल 2024 अशी लिहिली आहे.

फॅक्ट चेक: काँग्रेसला मतदानासाठी थेट दुबई वरून फतवा? खोटा आहे हा दावा
Fatava letter in viral video

न्यूजचेकरने सर्वप्रथम पत्रात उपस्थित असलेल्या मुस्लिम संघटनेचा शोध घेतला. यावेळी, आम्हाला इंटरनेटवर असोसिएशन ऑफ सुन्नी मुस्लिम ऑर्गनायझेशन ऑफ दुबईशी संबंधित कोणतीही माहिती मिळाली नाही.

यानंतर, आम्ही व्हायरल पत्रातील पत्त्याच्या मदतीने त्या संस्थेचा शोध घेतला आणि हा पत्ता संयुक्त अरब अमिरातीची राजधानी दुबई येथे असलेल्या पाकिस्तानी दूतावासाच्या मुख्यालयाचा असल्याचे आढळले.

फॅक्ट चेक: काँग्रेसला मतदानासाठी थेट दुबई वरून फतवा? खोटा आहे हा दावा

व्हायरल पत्रात असलेले मोबाईल क्रमांकही बनावट आहेत

आम्ही व्हायरल पत्रात उपस्थित असलेल्या क्रमांकांवर देखील संपर्क साधला. यावेळी, आम्ही व्हॉट्सॲपच्या मदतीने पत्राच्या शीर्षस्थानी असलेल्या क्रमांकावर संपर्क साधला, जो कथितरित्या मोहम्मद फैयाज नावाच्या व्यक्तीचा होता. या वेळी आम्हाला आढळून आले की हा नंबर डॅलमायर या कॉफी मशीन विकणाऱ्या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत आहे. यावेळी आम्हाला कंपनीचे इन्स्टाग्राम अकाउंटही सापडले. हा क्रमांक या खात्याच्या बायोमध्ये आहे, जो व्हायरल पत्रातही आहे.

फॅक्ट चेक: काँग्रेसला मतदानासाठी थेट दुबई वरून फतवा? खोटा आहे हा दावा

यानंतर आम्ही त्या कंपनीशीही संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट केले की, “आम्ही पत्रात नमूद केलेल्या संस्थेशी संबंधित नाही. या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही.”

यामुळे कथित व्हायरल पत्र बनावट असल्याचेही सिद्ध झाले आहे.

Conclusion

आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले की व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाच महिने जुना असून त्यात दाखविण्यात आलेले पत्रही बनावट आहे. पत्रात दावा केलेल्या संस्थेची माहिती इंटरनेटवर उपलब्ध नाही.

Result: False

Our Sources
News report published by News18 Lokmat on May 14, 2024
Address mentioned on Google
Telephonic Conversation with mentioned number


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,830

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.