Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
२१०० चा हप्ता ५०० वर आणून लाडक्या बहिणींची फसवणूक सुरु आहे.
हा दावा दिशाभूल करणारा आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७७४१४८ महिलांना लाडक्या बहीण योजनेतून फरकाचे ५०० रुपये दिले जात आहेत.
महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणेनूसार लाडक्या बहिणींना २१०० कधीपासून मिळणार? या प्रश्नावर राजकीय चर्चा आणि गदारोळ सुरु असताना सरकारने २१०० चा हप्ता ५०० वर आणून लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
“लाडकी बहिण योजनेचा हफ्ता ५०० रूपयांवर आणुन @mieknathshinde यांच खच्चीकरण सुरू असल्याचा पुरावाच @Dev_Fadnavis यांनी पुन्हा एकदा दिला आहे. २१०० रूपयांचा हफ्ता ५०० रूपयांवर आणुन बहिणींचीही फसवणुक…” अशा कॅप्शनसोबत हा दावा केला जात आहे.
व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही सर्वप्रथम Google वर कीवर्ड सर्च करून लाडक्या बहीण योजनेचा हप्ता महाराष्ट्र सरकारने ५०० रुपये केला आहे का? याचा शोध घेतला. दरम्यान आम्हाला यासंदर्भात सरकारची कोणतीही अधिकृत सूचना किंवा घोषणा आढळली नाही. शिवाय अशी घोषणा केल्यासंदर्भात कोणतेही वृत्त मिळाले नाही.
आम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर शोधले, मात्र लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशी अपडेट आम्हाला मिळाली नाही.
दरम्यान आम्ही शोध घेत असताना महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या अधिकृत X खात्यावर या दाव्यासंदर्भात स्पष्टीकरण देणारी पोस्ट घातली असल्याचे दिसून आले.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये, “एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून, सदर प्रक्रियेत दिनांक ३ जुलै २०२४ नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.” हे सांगण्यात आलेले आहे. “शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७७४१४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे, किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे.” हे ही नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विधिमंडळात याबद्दल स्पष्टीकरण देत असतानाचा व्हिडिओही जोडण्यात आला आहे.
आणखी तपासात आम्हाला संबंधित दाव्याबद्दल स्पष्टीकरण देणाऱ्या बातम्या वाचायला मिळाल्या. ज्यामध्ये “नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७७४१४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये लाडक्या बहीण योजनेतून दिले जाणार आहेत. सर्व पात्र महिलांचा याच्याशी संबंध नसून संबंधित योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या बाबतीत हा निर्णय घेण्यात आलेला असल्याची माहिती मिळाली. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत आणि TV 9 मराठी आदी माध्यमांनी याबद्दल वृत्ते प्रसारित केली आहेत.
यावरून व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट होते.
अशाप्रकारे आमच्या तपासात २१०० चा हप्ता ५०० वर आणून लाडक्या बहिणींची फसवणूक सुरु आहे हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले. नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७७४१४८ महिलांना लाडक्या बहीण योजनेतून फरकाचे ५०० रुपये दिले जात आहेत.
Our Sources
Official Website of Government of Maharashtra
Tweet made by Aditi Tatkare on April 15, 2025
News published by Maharashtra Times on April 15, 2025
News published by Sakal on April 15, 2025
News published by TV 9 Marathi on April 15, 2025
News published by Lokmat on April 15, 2025
Runjay Kumar
May 9, 2025
Prasad S Prabhu
May 9, 2025
Prasad S Prabhu
May 7, 2025