Authors
Claim
मध्यप्रदेश निवडणुकीत तिकीट वाटपावरून नाराज झालेले राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचा दावा सोशल मीडिया यूजर्स करत आहेत.
Fact
खासदार दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या नावाखाली केलेल्या दाव्याची चौकशी करण्यासाठी आम्ही दिग्विजय सिंह यांची सोशल मीडिया पेजेस शोधली. प्रक्रियेत, आम्हाला त्यांच्या X अकाउंटवर 15 ऑक्टोबर 2023 रोजी शेअर केलेली पोस्ट आढळली. यामध्ये व्हायरल दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. याशिवाय आम्हाला आणखी दोन पोस्ट मिळाली असून, याप्रकरणी राज्याचे डीजीपी आणि निवडणूक आयोगाकडे योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, आम्हाला 16 ऑक्टोबर 2023 रोजी दिग्विजय सिंह यांच्या फेसबुक पेजवर शेअर केलेला एक व्हिडिओ प्राप्त झाला, ज्यामध्ये त्यांनी राजीनामा पत्राची बातमी खोटी असल्याचे आणि ते पत्र बनावट असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, खासदार दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या नावाखाली शेअर केला जात असलेला दावा खोटा आहे. खरे तर दिग्विजय सिंह यांनीच व्हायरल झालेल्या पत्राला बनावट म्हटले आहे.
Result: False
Our Sources
X posts shared by Congress MP Digvijay Singh
Facebook post shared by Congress MP Digvijay Singh
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम सौरभ पांडे यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा