Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
महिला व मुलींना मोफत स्कुटी मिळणार असून ऑनलाईन अर्ज करा.
Fact
हा दावा खोटा आहे. युजर्सची माहिती गोळा करून स्कॅम योजनांसाठी वापर करण्याचा हा प्रकार आहे.
महिला व मुलींना मोफत स्कुटी मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्जाची लिंक असे सांगत एका तथाकथित वेबसाईटवरील लिंक सध्या व्हायरल होत आहे. आमच्या तपासात हा प्रकार युजर्सची माहिती गोळा करून स्कॅम योजनांसाठी वापर करण्याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
“नमस्कार मित्रांनो ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, त्यापैकी सर्वात मोठा अडथळा म्हणजे वाहतुकीची असुविधा. शाळा किंवा महाविद्यालयांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठे अंतर पार करणे आणि सुरक्षित वाहतूक सुविधा न मिळाल्यामुळे अनेक मुली शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतात. अशा परिस्थितीत मोफत स्कूटी योजना एक महत्त्वाचा उपाय म्हणून समोर आली आहे.” असे हा दावा सांगतो.
महिला व मुलींना मोफत स्कुटी मिळणार असे सांगणाऱ्या या दाव्याचे आम्ही काळजीपूर्वक वाचन केले. यामध्ये कुठेही ही योजना कोणाची आहे याचा उल्लेख आढळला नाही. सदर योजना सरकारची आहे की कोणत्या खासगी समाजसेवी संस्थेची आहे? याचा तपशील न आढळल्याने आम्ही त्यादृष्टीने शोध घेतला. आम्ही Google वर मोफत स्कुटी योजना कुणी सुरु केली आहे का? यादृष्टीने तपास केला मात्र उत्तर मिळाले नाही.
दाव्याची भाषा मराठी आहे शिवाय अनेक युजर ही योजना महाराष्ट्र सरकारशी संबंधित असल्याचा समज करून घेऊन शेयर करीत आहेत, दरम्यान आम्ही ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे का? हे इंटरनेटवर शोधले. मात्र काहीच हाती लागले नाही.
पुढील तपासात आम्ही महाराष्ट्र सरकारचा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग, महिला आणि बालकल्याण खाते तसेच समाजकल्याण खाते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. या प्रत्येक विभागाने अशाप्रकारची कोणतीही योजना सुरु केलेली नसून व्हायरल मेसेज खोटा आहे. अशी माहिती दिली.
महाराष्ट्र वगळता इतर कोणत्या राज्यानेही अशी योजना सुरु केली आहे का? याचा तपास केला असता त्याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
संबंधित वेबसाईटवर उपलब्ध लिंक माहिती संकलन करीत असल्याचे दिसून आल्याने आम्ही त्यावरील ऑनलाईन लिंकचा Scam Detector या साधनावर तपास केला. संबंधित डिटेक्टर एकादी वेबसाईट किंवा लिंक किती विश्वासार्ह आहे याची माहिती देते.
Scam Detector ने संबंधित वेबसाईट चा विश्वासार्हता रेशिओ ४६.४ टक्के इतका असून Threat, Phishing, Malware, and Spam असे धोके असल्याची माहिती आम्हाला दिली.
दरम्यान आम्ही यासंदर्भात जाणून घेण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ञ हितेश धरमदासानी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी “अशाप्रकारच्या वेबसाईटपासून सावध राहण्याची गरज व्यक्त केली. अशा वेबसाईट्स युजर्सची डेटा फसव्या योजनांचे आमिष दाखवून गोळा करतात आणि तो पुढे विकला जातो किंवा स्कॅमसाठी वापरला जातो.” असे सांगितले.
अशाप्रकारे आमच्या तपासात महिला आणि मुलींना मोफत स्कुटी योजना असे सांगत व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आणि स्कॅमचा एक भाग असल्याचे स्पष्ट झाले.
Our Sources
Google Search
Conversation with Primary and Secondary Education, Higher Education, Women and Child Development Departments of Maharashtra Government
Analysis on Scam Detector
Conversation with Cyber Safety Expert Hitesh Daharamdasani
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Runjay Kumar
March 21, 2025
Vasudha Beri
March 21, 2025
Prasad S Prabhu
March 19, 2025