Authors
Claim
काँग्रेस नेत्याच्या मणिपूर दौऱ्यात ‘गो बॅक राहुल गांधी’च्या घोषणा देण्यात आल्या.
Fact
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममध्ये राहुल गांधींचा निषेध दर्शवणारा जुना व्हिडिओ खोट्या दाव्याने होतोय शेयर.
मणिपूरमध्ये ‘गो बॅक राहुल गांधी’ आंदोलन असे सांगत एका स्थानिक भोजनालय असल्यासारखे दिसणाऱ्या ठिकाणावरून जात असताना काँग्रेसचे नेते आणि एलओपी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत असलेल्या विरोधकांचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या अनेक युजर्सनी हा गांधींच्या मणिपूर भेटीचा असल्याचा दावा केला आहे. न्यूजचेकरला मात्र हा दावा खोटा असल्याचे आढळले. हा व्हिडीओ खरं तर जानेवारीचा आहे आणि त्यात आसाममध्ये गांधींविरोधातील निदर्शने दिसत आहेत.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
राहुल गांधी जुलै महिन्यात हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेतली आणि उत्तर-पूर्व राज्यातील जिरीबाम, चुराचंदपूर आणि बिष्णुपूर जिल्ह्यातील मदत छावण्यांना भेट दिली. “समस्या सुरू झाल्यापासून मी इथे तिसऱ्यांदा आलो आहे. ही एक जबरदस्त शोकांतिका झाली आहे. मला परिस्थितीत काही सुधारणा होण्याची अपेक्षा होती. परंतु परिस्थिती जिथे असावी तिथे अजूनही कुठेही नाही हे पाहून मी खूप निराश झालो, ” असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले.
Fact Check/ Verification
व्हायरल व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सवर Google लेन्सच्या शोधामुळे आम्हाला 22 जानेवारी 2024 रोजीच्या पीटीआयच्या रिपोर्टकडे नेले. व्हायरल व्हिडिओमधील स्क्रीनग्राब असलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे की, “काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आसामच्या नागावमधील रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयात जमावाने रोखले. रविवारी संध्याकाळी गांधी आणि इतर काही नेते घटनास्थळापासून सुमारे 10 किमी अंतरावर रुपोही येथे रात्री निवासासाठी जात असताना अंबागनमधील रेस्टॉरंटमध्ये थांबले तेव्हा ही घटना घडली.
त्यात 21 जानेवारी 2024 रोजी वृत्तसंस्था ANI ची X पोस्ट देखील समाविष्ठ आहे, ज्यामध्ये त्याच व्हिडिओची थोडी मोठी आवृत्ती आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आसाम: ‘राहुल गांधी गो बॅक’ आणि ‘अन्याय यात्रा’चे पोस्टर घेऊन मोठ्या संख्येने लोकांनी आज संध्याकाळी नागावच्या अंबागन भागात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शने केली.
आम्हाला जानेवारी 2024 मधील News18 ची एक फेसबुक पोस्ट आढळली ज्यामध्ये मणिपूरमध्ये गांधींना निषेधाचा सामना करावा लागला असा दावा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्हायरल व्हिडिओमधील स्निपेट्स आहेत. “राहुल गांधी गो बॅक’ आणि ‘अन्याय यात्रा’चे पोस्टर घेऊन मोठ्या संख्येने लोकांनी आज संध्याकाळी नागावच्या अंबागन भागात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शने केली,” असे कॅप्शन या पोस्टमध्ये देण्यात आले आहे.
एबीपी न्यूज, आज तक आणि अमर उजाला यासारख्या अनेक आउटलेट्सने देखील या वर्षी जानेवारीमध्ये भारत जोडो न्याय यात्रेच्या आसाम टप्प्या दरम्यान घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे.
आम्ही गुगल मॅपवर आसामच्या नागावचे लोकेशन दिसले. यामध्ये व्हिडिओमध्ये दिसणारे लोकेशन शोधण्यात आम्ही यशस्वी झालो. तेच खाली पाहिले जाऊ शकते.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात काँग्रेस नेत्याच्या मणिपूर भेटीदरम्यान विरोधकांनी ‘गो बॅक राहुल गांधी’च्या घोषणा दिल्याचा दावा करण्यासाठी आसाममधील एक जुना व्हिडिओ शेअर केला गेला आहे, हे स्पष्ट झाले.
Result: False
Sources
Report By PTI, Dated January 22, 2024
X Post By ANI, Dated January 21, 2024
Facebook Post By News18, Dated January 21, 2024
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजीसाठी वसुधा बेरी यांनी केले असून, ते इथे पाहता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा