Authors
Claim
गोव्यातील पाद्री अँथनी फर्नांडिस यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे.
Fact
गोव्यातील ख्रिस्ती पुजारी अँथनी फर्नांडिस यांनी हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा फेसबुक आणि ट्विटरवर एक फोटो शेअर करून केला जात आहे. या दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी, आम्ही व्हायरल चित्र Yandex वर शोधले. यादरम्यान आम्हाला हे चित्र विकिमीडिया (commons.wikimedia.org) या संकेतस्थळावर सापडले. 2008 साली या वेबसाईटवर चित्र प्रकाशित करताना, हे चित्र “फादर मॅथ्यू” नावाच्या टीव्ही मालिकेतील असल्याचे सांगण्यात आले. वेबसाइटवर दिलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की चित्रात दिसणारी व्यक्ती पोलिश अभिनेता Artur Zmijewski आहे.
चित्राविषयी अधिक माहितीसाठी, ‘Artur Zmijewski Father Mateusz’ या कीवर्डसह Google शोधून, आम्हाला ATM Grupa वेबसाइटवर देखील हे चित्र सापडले. या वेबसाइटवर असेही म्हटले आहे की चित्रात दिसणारी व्यक्ती पोलिश अभिनेता Artur Zmijewski आहे, ज्याने ‘फादर मॅथ्यू’ नावाच्या टीव्ही मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.
याशिवाय, गोव्यात नुकतीच अशी कोणतीही घटना नोंदवली गेली आहे का हे शोधण्यासाठी आम्ही Google वर काही कीवर्ड शोध केला. या प्रक्रियेदरम्यान, आम्हाला व्हायरल दाव्याशी संबंधित कोणतीही बातमी मिळाली नाही.
अशाप्रकारे, गोव्यातील पाद्रीने हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. व्हायरल झालेला हा फोटो पोलंडमधील एका टीव्ही कलाकाराचा आहे.
Result: False
Our Sources
ATM Grupa Article
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in