Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkया घरगुती उपायाने पांढरे केस मुळापासून काळे होतील का? येथे सत्य जाणून...

या घरगुती उपायाने पांढरे केस मुळापासून काळे होतील का? येथे सत्य जाणून घ्या

(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी साठी सर्वप्रथम अर्जुन देवोडीया यांनी केले आहे.)

लहान वयात केस पांढरे होणे ही आता सामान्य बाब झाली आहे. बाजारात अशी अनेक औषधे आणि घरगुती उपाय उपलब्ध आहेत जे या समस्येपासून मुक्ती मिळवण्याचा दावा करतात. या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये घरगुती उपायाने केस मुळापासून काळे होत असल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर हा घरगुती उपाय वापरणाऱ्यांचे केस कायमचे काळे होतील असा दावा केला जातोय.

या घरगुती उपायाने पांढरे केस मुळापासून काळे होतील
Courtesy: Instagram/rakshakirasoi

व्हिडिओमध्ये एक महिला आयुर्वेदिक तेल बनवण्याची पद्धत सांगत आहे. या पद्धतीत प्रथम मेथीदाणे आणि कलोंजी पावडर तयार केली जात आहे. त्यानंतर ही पावडर चहाची पाने आणि मेंदीसोबत गरम मोहरीच्या तेलात मिसळून ते मिश्रण चोवीस तास तसेच सोडण्यास सांगितले आहे.

यानंतर महिलेचा दावा आहे की आठवड्यातून दोनदा हे तेल लावल्याने केसांमध्ये फरक पडतो. महिलेच्या म्हणण्यानुसार, हे ‘जादुई’ तेल लावल्याने व्यक्तीचे केस कायमचे मुळापासून काळे होतात. हा व्हिडिओ ’rakshakirasoi’ नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “फक्त एकदा हे घरगुती तेल लावल्याने पांढरे केस कायमचे काळे होतील”. या पेजवर आणखी बरेच घरगुती उपचार व्हिडिओ आहेत.

Fact Check/ Verification

या दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही प्रथम आयुर्वेदातील काही तज्ज्ञांशी बोललो. बनारस हिंदू विद्यापीठातील आयुर्वेद विभागातील प्राध्यापक जेपी सिंह यांनी आम्हाला सांगितले की, व्हिडिओमध्ये करण्यात आलेला दावा योग्य नाही.

प्रोफेसर जेपी सिंह यांच्या म्हणण्यानुसार, हे तेल हेयर डाय प्रमाणे काही काळ केस काळे करू शकते, परंतु तेलामुळे केस कायमचे काळे होतील असे म्हणणे चुकीचे आहे. यासोबतच त्यांनी सांगितले की, मेथीमुळे या तेलाने केसांना पोषण मिळू शकते, मात्र त्यामुळे केस कायमचे काळे होऊ शकत नाहीत.

व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्याबाबत न्यूजचेकरने दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. शिवानी घिलडियाल यांच्याशीही संपर्क साधला, आयुर्वेदाच्या मदतीने पांढरे केस मुळापासून काळे करता येत नाहीत, असे त्या म्हणाल्या.

मात्र डॉ.शिवानी यांच्या म्हणण्यानुसार आयुर्वेदात अशी काही औषधे आहेत, ज्यांच्या मदतीने नवीन केस पांढरे होण्यापासून रोखले जाऊ शकते. पण जे केस आधीच पांढरे झाले आहेत ते मुळापासून काळे होत नाहीत.

जेव्हा आम्ही इंटरनेटवर याबद्दल शोध घेतला तेव्हा असे अनेक अहवाल सापडले, ज्यामध्ये केसांची काळजी आणि केस गळतीच्या समस्येसाठी मेथीच्या दाण्यांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण मेथी दाणे किंवा त्यापासून बनवलेले तेल केस कायमचे काळे करू शकतात, असे या अहवालांमध्ये स्पष्टपणे लिहिलेले नाही.

Conclusion

एकंदरीत, व्हायरल व्हिडीओमध्ये नमूद केलेले घरगुती तेल केसांच्या निगा राखण्यासाठी वापरता येण्याची शक्यता आहे. केस काही काळ काळेही होऊ शकतात. पण या घरगुती उपायाने केस कायमचे मुळापासून काळे होतील असे म्हणणे चुकीचे ठरेल.

Result: Partly False

Our Sources

Quote of Prof. JP Singh, Ayurveda Dept., BHU
Quote of Dr Shivani Ghildiyal, All India Institute of Ayurveda, New Delhi
Report of The Indian Express


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular