Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
उत्तर प्रदेशात निवडणुका संपल्यानंतर 8 मार्च 2022 रोजी दुसऱ्याच दिवशी ईव्हीएमवर गोंधळ सुरू झाला. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही व्हिडिओ शेअर करत वाराणसीमध्ये प्रशासनावर ईव्हीएमची अदलाबदली केल्याचा आरोप केला.
या व्हिडिओंमध्ये एकाच टेम्पोमध्ये अनेक ईव्हीएम बॉक्स दिसत आहेत. काही लोक टेम्पोवर उभे असून आजूबाजूला प्रचंड गर्दी आहे. लोक भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
संग्रहित ट्विट इथे पहा.
संग्रहित ट्विट इथे पहा.
अनीस राजा नावाच्या सपा कार्यकर्त्याने व्हिडिओसोबत लिहिले की, वाराणसीमध्ये ईईव्हीएमची अदलाबदली करण्याचा मोठा कट पकडला गेला आहे. त्याचप्रमाणे, हे व्हिडिओ वेगवेगळ्या कॅप्शनसह व्हायरल होत आहेत.
यासोबतच 8 मार्च रोजी संध्याकाळी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, जिल्हा दंडाधिकारी वाराणसीतील स्थानिक उमेदवारांना न सांगता ईव्हीएम मशीन हलवत आहेत.
या संदर्भात, आम्हाला उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याचे एक ट्विट आढळले, ज्यामध्ये या प्रकरणासंदर्भात एक प्रेस रिलीज आहे. यात असे लिहिले आहे की, “टेम्पोमध्ये दिसलेले ईव्हीएम मतमोजणी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ठेवण्यात आले होते. हे प्रशिक्षण 9 मार्च 2022 रोजी होणार होते. या कारणास्तव, 8 मार्च रोजी ही ईव्हीएम मशीन स्टोरेजमधून एका महाविद्यालयात नेली जात होती, जिथे प्रशिक्षण होणार होते. दरम्यान, राजकीय पक्षांच्या काही लोकांनी हे वाहन अडवले आणि या ईव्हीएमची अदलाबदली मतदानासाठी झाल्याची अफवा पसरवण्यात आली.
प्रेस रिलीजमध्ये पुढे म्हटले आहे की “मतदानासाठी वापरण्यात आलेल्या मशीन्स स्ट्राँग रूममध्ये सीलबंद आहेत आणि केंद्रीय निमलष्करी दलांच्या देखरेखीखाली सुरक्षित आहेत. ही यंत्रे प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणार्या मशीनपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत.” वाराणसीचे डीएम कौशल राज शर्मा यांनीही अखिलेश यादव यांच्या आरोपांवर असेच वक्तव्य केले आहे.
निवडणूक आयोग आणि वाराणसीच्या डीएम यांनी दिलेले स्पष्टीकरण देखील या वस्तुस्थितीला बळकटी देते की व्हायरल व्हिडिओंमध्ये दिसत असलेल्या मशीनवर “प्रशिक्षण/जागरूकता ईव्हीएम” असे स्टिकर्स चिकटवलेले आहेत. हे स्टिकर चांगल्या दर्जाच्या व्हिडिओमध्ये ईव्हीएमवर स्पष्टपणे दिसत आहे.

मग वाराणसीतील अधिकार्यांची चूक झाली नाही का?
खरे तर, वाराणसीचे आयुक्त दीपक अग्रवाल यांनीच ईव्हीएम मशीनच्या हालचालीत प्रशासनाकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे. दीपक अग्रवाल यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनीही याबाबत आपले म्हणणे मांडले आहे. चंद्रा म्हणतात की या प्रक्रियेचे अनुसरण करून, वाराणसीच्या एडीएमनी ईव्हीएमच्या प्रशिक्षित हालचालींबद्दल राजकीय पक्षांना माहिती द्यायला हवी होती. पण त्यांनी तसे केले नाही, त्यामुळे यूपीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने एडीएमला निलंबित केले आहे. मात्र, चंद्रा यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड किंवा ईव्हीएमची अदलाबदली झाल्याचा दावाही फेटाळून लावला आहे.
अशाप्रकारे, आमच्या पडताळणीत असे दिसून आले आहे की, वाराणसी प्रशासनाकडून ईव्हीएमच्या हालचालींबाबत चूक झाली होती, परंतु व्हिडिओमध्ये दिसणारी मशीन मतदान यंत्रांपेक्षा वेगळी होती आणि ती प्रशिक्षणासाठी ठेवण्यात आली होती. याशिवाय या प्रकरणी आणखी काही माहिती समोर आल्यास ती या तथ्य पडताळणीत अपडेट केली जाईल.
Viral Video screenshots
Versions of Varanasi DM, Varanasi Commissioner and Chief Election Commissioner of India
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Vasudha Beri
November 19, 2025
Runjay Kumar
November 17, 2025
Prasad S Prabhu
October 30, 2025