Saturday, November 2, 2024
Saturday, November 2, 2024

HomeFact CheckHealth and Wellnessफेअर अँड लवलीमध्ये खरंच डुक्कराचे तेल वापरले जाते ? जाणून घ्या सत्य...

फेअर अँड लवलीमध्ये खरंच डुक्कराचे तेल वापरले जाते ? जाणून घ्या सत्य काय आहे

भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी एक म्हणजे फेअर अँड लवली. जून २०२० मध्ये हिंदुस्थान युनीलिव्हरने फेअर अँड लवलीचे रिब्रँडिग करण्यासाठी त्याचे नाव बदलून ‘ग्लो अँड लवली’ केले. ग्लो अँड लवली वापरण्याचे प्रमाण भारतात खूपच जास्त आहे, हे त्याच्या विक्रीवरून दिसून येतं.

सोशल मीडियावर फेअर अँड लवली संदर्भात एक संदेश व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की चेन्नईच्या हायकोर्टाच्या एका प्रकरणात फेअर अँड लवलीने मान्य केले की, क्रीममध्ये डुक्कराचे तेल वापरले आहे. 

Fact Check / Verification

दावा क्रमांक २ : चेन्नईच्या हायकोर्टाच्या फेअर अँड लवली कंपनीने एका प्रकरणात हे मान्य केले की, क्रीममध्ये पिग (डुक्कर) फॅटचे तेल आहे.

आम्ही या संदर्भात गुगलवर शोधले. पण आम्हांला कोणतीही माहिती मिळाली नाही. मग आम्ही फेअर अँड लवली यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यात वापरलेल्या घटकांची माहिती घेतली. त्यात ग्लिसरीन आणि मिनरल ऑईल, मल्टिव्हिटॅमिन आणि मॉइश्चरायझर वापरले आहे, असे आढळून आले.

ग्लो अँड लवली संकेतस्थळाचा स्क्रिनशॉट

त्यानंतर आम्ही फेअर अँड लवलीच्या पॅकेटवर असणारे घटक तपासले. तेव्हा आम्हाला त्यात कुठेही पॉर्क फॅट ऑईल असल्याचे आढळून आले नाही.

फोटो साभार : tips and beauty

या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही हिंदुस्थान युनीलिव्हरच्या मुंबई ऑफिसशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. आमचा जर संपर्क झाला तर आम्ही लेख अपडेट करू.

टीप : आपण आज मालिकेतला दुसरा भाग फेअर अँड लवलीचा पाहिला. याआधी आपण नेस्लेच्या किटकॅट चॉकलेटची तथ्य पडताळणी केली होती. तुम्ही ते इथे वाचू शकता. आता आपण एका नव्या भागात भेटू.

Conclusion 

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, फेअर अँड लवली क्रीममध्ये डुक्कराचे तेल वापरले जात नाही. 

Result : Fabricated Content/False


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा
.

Most Popular