Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
मलाया विद्यापीठाच्या डॉ. विकिनेश्वरी यांनी दिलेली रेमेडी वापरल्यास अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास ची गरज नाही.
Fact
अशी कोणतेही औषध किंवा रेमेडी वापरण्याचा सल्ला आपण दिला नसल्याचे स्वतः डॉ. विकिनेश्वरी सबरत्नम यांनीच स्पष्ट केले आहे. हा दावा खोटा आहे.
व्हाट्सअप विद्यापीठातून अनेक आरोग्यविषयक सल्ले आणि मार्गदर्शन दिले जाते हे आपण पाहतोच. काही सल्ल्यांना आगापिछा राहत नाही. तर काही सल्ले विशिष्ट डॉक्टरांचे नाव देऊन दिले जातात. असाच एक सल्ला सध्या मलाया विद्यापीठाच्या डॉ. विकिनेश्वरी यांनी दिला असल्याचे सांगून व्हाट्सअप वर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये सांगितलेली रेमेडी जर अंमलात आणली तर हृदयरोग्याला अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा बायपास सारख्या शस्त्रक्रिया उपचारांची गरजच पडणार नाही. असे सांगितले जात आहे.

“प्रो. डॉ. एस. विकीनेश्वरी बायोटेक विभाग, इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल सायन्स युनिव्हर्सिटी ऑफ मलाया, ५०६०३, कुआलालंपूर, मलेशिया. 11 आता ॲन्जीओग्राफी / ॲन्जीओप्लास्टी किंवा बायपास करण्याची जरुरी नाही’ नैसर्गिक पध्दतीने हृदयाच्या बंद/ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या उघडणे किंवा मोठ्या करणे. ब्लॉक झालेली रक्तवाहिनी उघडी/मोठी करण्यासाठी. १) लिंबाचा रस २) ३) ४) आल्याचा रस लसणाचा रस सफरचंदाचे व्हिनेगर १ कप (१५ लिंबू) १ कप (पाव किलो) १ कप (अर्धा किलो) १ कप वरील सर्व रस (चारही) एकत्र मिश्रण करुन मंद गॅसवर अर्धा तास उकळा. जेव्हा ते मिश्रण ३ कप शिल्लक राहील तेव्हा गॅस बंद करुन ते थंड होऊ द्या. चांगले थंड झाल्यावर त्यात ३ कप चांगले शुध्द नैसर्गिक मध घाला व चांगले मिक्स करुन एका स्वच्छ बाटलीत भरुन ठेवा. 38 दररोज सकाळी अनोषा पोटी (काहीही न खाता) वरील बाटलीतील मिश्रण १ चमचा. जरुर घेणे. आपल्या बंद (ब्लॉक) झालेल्या रक्तवाहिन्या उघडतील. रक्तवाहिन्यातील गुठळ विरघळून ती रक्तवाहिनी पूर्ववत रक्त पुरवठा करु शकेल आणि आपली अॅन्जीओग्राफी / ॲन्जीओप्लास्टी / बायपास करण्याचे ठळेल व आपला खर्च देखील वाचेल. ‘आपली प्रकृती सुधारुन सशक्त राहो हीच सदिच्छा कृपा करुन हा पेपर आपण आपल्या नातेवाईक तसेच मित्रांना देणे.” असे हा मेसेज सांगतो. विशेष म्हणजे “कृपया ज्यांना हा पेपर मिळाला त्यांनी इतर गरजूंसाठी १० झेरॉक्स कॉपी काढून वाटप करावे ही विनंती.” असे आवाहनही केले जात आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

हृदयाच्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या पुन्हा नैसर्गिक पद्धतीने उघडण्यासाठी करावयाचा हा उपाय संबंधित डॉ. विकिनेश्वरी यांनी दिला आहे का? हे शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. व्हायरल दाव्यामध्ये विकिनेश्वरी यांची ओळख दिलेली आहे. त्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल सायन्स, युनिव्हर्सिटी ऑफ मलाया येथे कार्यरत असल्याचे आम्हाला यातून समजले. यावरून आम्ही त्या प्रत्यक्ष अस्तित्वात आहेत का? याचा शोध घेतला. आम्हाला मलाया विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर एक प्रोफाइल सापडली. ज्यामध्ये आम्हाला डॉ. विकिनेश्वरी यांची माहिती मिळाली.

यावरून आम्हाला विकिनेश्वरी यांचा ईमेल अड्रेस मिळाला. आम्ही त्यांना संबंधित दावा त्यांनीच केला आहे का? यासंदर्भात माहिती विचारली असता, त्यांनी आम्हाला रिप्लाय करून आपण अशापद्धतीचा कोणताही दावा केलेला नसून अकारण आपल्याला यामध्ये गोवले जात असल्याची माहिती दिली. त्यांनी आमच्या मेल ला दिलेले उत्तर आपण खाली पाहू शकता.

“मी या रेमेडीची ओरिजिनल सेंडर नाही. मी या रेमेडीवर संशोधन केलेले नाही. मी वैद्यकीय क्षेत्राची डॉक्टर नाही. माझा हा संदेश इतरांपर्यंत पाठवा.” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावरून हे स्पष्ट होते की डॉ. विकिनेश्वरी यांनी अशाप्रकारचा कोणताही दावा केलेला नाही.
आम्ही हृदयाला जोडणाऱ्या रक्तवाहिन्यांना झालेले ब्लॉकेज अशा पद्धतीने मोकळे होऊ शकतात का? यासंदर्भात तपास केला. मात्र याबद्दल कोणतेही संशोधन किंवा स्वतंत्र रिपोर्ट्स अथवा मीडिया मध्ये छापून आलेल्या बातम्याही मिळाल्या नाहीत.
अशाप्रकारे हार्ट ब्लॉकेज वरील रेमेडी म्हणून डॉ. विकिनेश्वरी यांच्या नावे दावा करण्याचा प्रकार खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Official Website of Malaya University
Converation on Email with Dr. Vikineshwari Sabaratnam
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Kushel Madhusoodan
June 3, 2025
Komal Singh
December 4, 2024
Prasad S Prabhu
July 2, 2024