Saturday, April 27, 2024
Saturday, April 27, 2024

HomeFact Checkहलाल वरून पुन्हा एकदा हिमालया टार्गेट, जाणून घ्या सत्य काय आहे

हलाल वरून पुन्हा एकदा हिमालया टार्गेट, जाणून घ्या सत्य काय आहे

औषधे, कॉस्मेटिकस आणि काही खाद्यपदार्थ बनविणारी कंपनी ‘हिमालया’ पुन्हा एकदा सोशल मीडियावर टार्गेट वर आली आहे. कंपनीने प्रसिद्ध केलेली एक माहिती शेयर करीत या कंपनीने आपण हलाल प्रमाणित उत्पादने विकत असल्याचे स्वतःच कबूल केल्याचे सांगितले जात आहे. अशा कंपनीची उत्पादने हिंदूंनी कशी खरेदी करायची? असा प्रश्न उपस्थित करून काही युजर्सनी हिंदू धर्म भ्रष्ट होईल असा दावा केला आहे.

याप्रकारच्या अनेक पोस्ट सध्या व्हायरल होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. ट्विटर सारख्या माध्यमावर अशा पोस्ट करून यापूर्वी #boycotthimalaya सारखी मोहीम राबविण्यात आली होती. काही महिने हा प्रकार थांबला होता मात्र पुन्हा अशा पोस्ट जोरदार येत असून व्हायरलही होत आहेत.

काही युजर्सनी आपण या कंपनीची उत्पादने घ्यावीत की नाहीत यावर विचार करावा असे म्हटले असून काही युजर्सनी या कंपनीविरोधात आवाज उठविण्यात यावा असे आवाहन पोस्ट च्या माध्यमातून केल्याचे दिसून येते.

Fact Check/ Verification

हिमालया कंपनी संदर्भात व्हायरल होत असलेली ही माहिती खरी आहे का? हे पाहण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही सर्वप्रथम हिमालया च्या अधिकृत वेबसाईटवर पोहोचलो. तेथे आम्हाला कंपनीची विविध उत्पादने आणि त्यांची माहिती तसेच सामाजिक उपक्रमांची माहिती मिळाली.

हिमालया कंपनीने स्वतःहोऊन आपण हलाल प्रमाणित उत्पादने विकतो असे का जाहीर केले? या प्रश्नावर आम्ही शोधले असता, कंपनीच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर पिन करून ठेवलेले हे ट्विट आम्हाला आढळले.

१ एप्रिल २०२२ रोजी केलेले हे ट्विट वाचून आम्ही त्याचा अर्थ समजून घेतला. ” हलाल वेलनेस कंपनी आपली उत्पादने १०० हुन अधिक देशात निर्यात करते. त्या देशांनी ही उत्पादने स्वीकारण्यासाठी कंपनी आणि उत्पादने दोघांनाही तेथील नियम आणि कायदे पाळावे लागतात. काही देशात हलाल प्रमाणन सक्तीचे आहे. यासाठी तशा देशांमध्ये उत्पादने विकण्यासाठी कंपनीने हलाल प्रमाणन मिळविले आहे. कंपनीच्या कोणत्याही उत्पादनांत मांस नसते. मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर तसा आरोप होत आहे. हा आरोप तत्त्वता चुकीचा आहे. हलाल प्रमाणन म्हणजे त्या उत्पादनात मांसाचे घटक आहेत असा अर्थ काढणे चुकीचे आहे. काही देशांच्या नियमांप्रमाणे शाकाहारी उत्पादनांनाही हलाल प्रमाणन असणे बंधनकारक आहे. सर्व कंपन्या ज्या त्या देशात आपली उत्पादने निर्यात करतात त्यांना हे प्रमाणन घ्यावेच लागते.” असे स्पष्टीकरण त्यामध्ये आढळले.

औषधे आणि कॉस्मेटिकस तयार करणाऱ्या अनेक कंपन्या मांस आणि जनावरांचे अनेक अवशेष आपल्या उत्पादनात वापरतात. यामुळे काही देशात त्यांना हलाल प्रमाणपत्र दिले जात नाही. पूर्णपणे शाकाहारी पद्धतीने काम करणाऱ्या कंपन्यांनाही यामुळे हे प्रमाणपत्र घेऊन आपली उत्पादने विकावी लागतात. अशी माहिती आम्हाला jagran josh येथे मिळाली.

Screengrab of Jagran Josh

हलाल प्रमाणपत्र देण्याची पद्धत आणि मुस्लिम देशात त्याची आवश्यकता काय आहे, याची माहिती इथे वाचता येईल. युनो ने ही हलाल म्हणजे काय याची माहिती प्रसिद्ध केली असून ती येथे वाचता येईल.

Conclusion

अशापद्धतीने हिमालय कंपनीने हलाल प्रमाणपत्र मिळविल्याचे विषयावरून दिशाभूल करणारे दावे केले जात असल्याचे आमच्या तपासात उघड झाले आहे. हलाल म्हणजे मांस वापरले जात असेल असा समज तयार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आहे.

Result: Missing Context

Our Sources

Official website of Himalaya wellness

Clarification by Himalaya

General guidelines of UNO on Halal

तुम्‍हाला एकाद्या क्‍लेमची फॅक्ट-तपासणी करायची असेल,फीडबॅक द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल,तर 9999499044 वर व्हॉट्सअप करा किंवा checkthis@newschecker.in वर ईमेल करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular