Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
पाकिस्तानशी झालेल्या संघर्षात भारताने सहा विमाने गमावल्याची कबुली हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी दिली.
हवाई दल प्रमुखांचे असे कोणतेही विधान नाही, व्हायरल व्हिडिओ एडिटेड असल्याचे आढळले.
पाकिस्तानशी झालेल्या अलिकडच्या संघर्षात भारताने ६ जेट विमाने आणि एक ड्रोन गमावल्याची “कबुली” देणारा हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांचा एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे.
अनेक एक्स युजर्सनी व्हिडिओ शेअर करून आरोप केला आहे की, “अखेर भारतीय हवाई दल प्रमुखांनी कबूल केले आहे की ७ मे रोजी झालेल्या हवाई हल्ल्यात भारताने ६ जेट विमाने आणि एक हेरॉन यूएव्ही गमावला.” तथापि, न्यूजचेकरला हा दावा खोटा असल्याचे आढळले.
व्हिडिओमध्ये, हवाई दल प्रमुख असे म्हणताना ऐकू येत आहे की, “… आणि इथे तो हँगर आहे, जो हँगरचा अर्धा भाग गेला आहे. आणि मला खात्री आहे की आत काही विमाने होती जी तिथे खराब झाली होती. तर, जर मी थोडक्यात सांगू शकलो तर, आम्ही सहा जेट विमाने आणि एक मोठे हेरॉन ड्रोन गमावले असले तरी, आम्ही किमान दोन कमांड आणि कंट्रोल सेंटर्स तिथे पोहोचू शकलो…”

अशा पोस्ट येथे, येथे आणि येथे पाहता येतील.
गुगलवर “IAF Chief” आणि “India lost six jets” असे कीवर्ड सर्च केले असता एअर चीफ मार्शल एपी सिंग यांच्या कथित वक्तव्याबद्दल कोणताही विश्वासार्ह रिपोर्ट मिळाला नाही. एअर फोर्सशी संबंधित सोशल मीडिया हँडल्स (येथे, येथे आणि येथे पहा) मध्ये देखील ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय उपकरणांचे नुकसान झाल्याच्या व्हायरल क्लिपला पुष्टी देणारी कोणतीही माहिती नव्हती.
त्यानंतर आम्ही व्हायरल क्लिपच्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले ज्याने आम्हाला ANI भारत द्वारे 9 ऑगस्ट 2025 रोजी लाईव्ह स्ट्रीम केलेल्या 16 व्या एअर चीफ मार्शल एलएम कात्रे मेमोरियल लेक्चरमध्ये एअर चीफ मार्शल एपी सिंग यांचे संपूर्ण भाषण दाखवलेल्या यूट्यूब पोस्टकडे नेले. त्यात व्हायरल क्लिपमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच पार्श्वभूमीवर एअर फोर्स चीफ दिसतात.
त्याच दरम्यान, संरक्षण अधिकाऱ्याने भारतीय सैन्याने लक्ष्य केलेल्या पाकिस्तानी हवाई तळांच्या आधी आणि नंतरच्या प्रतिमा देखील शेअर केल्या. व्हिडिओमध्ये सुमारे २३ मिनिटांनंतर, एअर चीफ मार्शल एपी सिंग हे म्हणताना ऐकू येतात, “…ते शाहबाज आहे, त्यांचे जेकबाबाद एअरफील्ड, त्यापैकीच एक, पुन्हा एकदा हल्ला झालेला एक प्रमुख एअरफील्ड. आणि इथे एक एफ-१६ हँगर आहे, जो तुम्ही येथे पाहू शकता. आणि इथे हा फोटो आहे, पुन्हा एकदा ओपन सोर्सवरून, त्याच हँगरच्या त्यांच्या आधीच्या एका चित्रातून. आणि इथे तो हँगर आहे, जो हँगरचा अर्धा भाग गायब आहे.”

“आणि मला खात्री आहे की आत काही विमाने होती जी तिथे खराब झाली आहेत. म्हणून, जर मी थोडक्यात सांगू शकलो तर, आम्ही मुरीद आणि चकलाला सारख्या किमान दोन कमांड अँड कंट्रोल सेंटर्सवर पोहोचू शकलो, ज्यापैकी एक मी तुम्हाला दाखवला आहे..”
त्यांच्या भाषणाच्या या भागात भारताच्या कथित नुकसानाची कोणतीही माहिती नव्हती, जी व्हायरल फुटेजच्या ऐकवली जात आहे.
या कार्यक्रमातील एअर चीफ मार्शल सिंग यांचे भाषण ९ ऑगस्ट २०२५ रोजी द हिंदूच्या यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह स्ट्रीमिंग देखील करण्यात आले. वरील भाग व्हिडिओमध्ये २९:०८ मिनिटांच्या काउंटरवर पाहता येतो. या लाईव्ह स्ट्रीममध्ये देखील भारतीय विमानांचे कथित नुकसान झाल्याची कबुली देण्यात आली नाही, ज्यामुळे खोटा दावा करण्यासाठी त्यांच्या भाषणात बनावट टिप्पणी मिसळण्यात आली आहे याची पुष्टी होते.
१६ व्या एअर चीफ मार्शल एलएम कात्रे मेमोरियल लेक्चरवरील संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकातही एअर चीफ मार्शल सिंग यांनी अशा कोणत्याही घोषणेचा उल्लेख केलेला नाही.

“हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी ऑप सिंदूरच्या यशाचे कौतुक केले, एअर पॉवरची प्राथमिकता आणि भविष्यातील ताकदीसाठी स्वदेशीकरण, संशोधन आणि विकास, संयुक्तता आणि समन्वयाची गरज यावर भर दिला,” असे सांगत आयएएफच्या एका एक्स पोस्टमध्ये या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले.
शिवाय, व्हायरल व्हिडिओचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यावर, आम्हाला ०:३३-०:३६ मिनिटांच्या सेगमेंटमधील आवाजात लक्षणीय बदल दिसला, जिथे भारताने सहा जेट गमावल्याबद्दल कथित टिप्पणी ऐकू येते.
त्यानंतर आम्ही ऑडिओ एआय डिटेक्शन प्लॅटफॉर्म Resembl AI वर सेगमेंट पाहिले, ज्याने आवाजाला “बनावट” म्हटले.
मिसइन्फॉर्मेशन कॉम्बॅट अलायन्स (एमसीए) च्या डीपफेक्स अनालिसिस युनिट (DAU), ज्याचा न्यूजचेकरही एक भाग आहे, देखील क्लिपचे विश्लेषण केले. डीएयूने हाईव्हच्या डीपफेक व्हिडिओ डिटेक्शन टूलवरील फुटेजचे विश्लेषण केले ज्याने व्हिडिओ ट्रॅकमध्ये एआय मॅनिपुलेशनचे अनेक मार्कर हायलाइट केले. तथापि, Hive च्या ऑडिओ टूलने असे सूचित केले नाही की ऑडिओ ट्रॅकचा कोणताही भाग एआयने जनरेट केला होता.

न्यूजचेकरने यापूर्वीही उच्च संरक्षण अधिकाऱ्यांचे व्हायरल झालेले असेच बनावट व्हिडिओ खोटे ठरवले आहेत, ज्यात त्यांनी मे २०२५ मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या तणावादरम्यान लष्करी मालमत्तेचे नुकसान झाल्याची कबुली दिल्याचे खोटे दाखवले होते. आमचे फॅक्ट चेक येथे, येथे आणि येथे पाहता येईल.
म्हणूनच, आम्हाला आढळून आले की भारतीय हवाई दल प्रमुख ऑपरेशन सिंदूर दरम्यान सहा विमानांचे नुकसान झाल्याची कबुली देत असल्याचे दाखवल्याचा दावा करणारे व्हायरल फुटेज मॅनिप्युलेटेड आहे.
Sources
YouTube Video By ANI Bharat, Dated August 9, 2025
YouTube Video By The Hindu, Dated August 9, 2025
Release By Ministry Of Defence, Dated August 9, 2025
Resemble AI Website
DAU Analysis
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी वसुधा बेरी यांनी केले असून येथे वाचता येईल.)
Prasad S Prabhu
November 29, 2025
Prasad S Prabhu
August 17, 2025
Runjay Kumar
July 31, 2025