Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
इंडिया टुडेने आपल्या एका लेखात दावा केला आहे की, जर मुस्लिमांना भारतात रहायचे असेल तर हिंदूंची सर्वोच्चता स्वीकारावी लागेल असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांची ‘विवेक’ या मराठी मासिकात नुकतीच मुलाखत प्रसिद्ध झाली. मुलाखती दरम्यान मोहन भागवत यांना अर्थव्यवस्था, अयोध्या आणि मथुरा विवादांसह भारतातील मुस्लिमांच्या स्थितीशी संबंधित अनेक प्रश्न विचारले गेले. प्रश्नांची उत्तरे देताना मोहन भागवत यांनी भारतातील मुस्लिमांच्या परिस्थितीविषयी विधान केले, जे इंडिया टुडेने आपल्या एका लेखात प्रसिद्ध केले आहे. इंडिया टुडेने आपल्या लेखात दावा केला आहे की मोहन भागवत म्हणाले की भारतात राहणा-या मुस्लिमांनी हिंदूंचे श्रेष्ठत्व स्वीकारले पाहिजे. सत्तारूढ भाजपवर नेहमीच असे आरोप लावले गेले आहेत की त्यांचावर संघाच्या विचारधारेचा प्रभाव आहे, म्हणून भागवत यांचे विधान फार महत्वाचे आहे. तसेच, जर ते सत्याची कसोटी पूर्ण करते तर ते अगदी आक्षेपार्ह आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही इंडिया टुडेने केलेल्या दाव्याची पडताळणी सुरू केली. Muck Rack नावाच्या वेबसाइटच्या म्हणण्यानुसार, या लेखावर आतापर्यंत 6,093 लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

इंडिया टुडेचा लेख आम्ही बारकाईने वाचला असता आम्हाला असे आढळून आले की, इंडिया टुडेने भागवत यांनी ‘विवेक’ साप्ताहिक दिलेल्या मुलाखतीच्या आधारे आपले विधान प्रसिद्ध केले आहे.

यानंतर आम्ही विवेक साप्ताहिक वेबसाइटला भेट दिली, आम्हाला मोहन भागवत यांची पूर्ण मुलाखत मिळाली. विवेक नावाच्या मासिकाने भागवत यांची मुलाखत प्रकाशित केली आहे. परंतु भागवत यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही. त्यांनी मुलाखतीत असे सांगितले आहे की, भारतात मुसलमानांना कधीही निराश कसे केले जाऊ शकत नाही आणि हिंदूंचे श्रेष्ठत्व कसे मुस्लिमांना स्वीकारावे लागत नाही. भागवत यांनी आपल्या मुलाखती दरम्यान असेही सांगितले की भारत हा जगातील एकमेव असा देश आहे जेथे घटनेद्वारे सर्व धर्मातील लोकांना समान अधिकार देण्यात आले आहेत.
वेबसाइटवरच, आम्हाला विवेक नावाच्या साप्ताहिक यूट्यूब चॅनल देखील आढळले आहे ज्यात भागवत यांची पूर्ण मुलाखत बर्याच भागात प्रकाशित झाली आहे.

वरील व्हिडिओंमध्ये, इंडिया टुडेने आपल्या लेखात प्रसिद्ध केलेल्या मुलाखतीचा तो भाग आम्हालाही आढळला. सरसंघचालक भागवत यांची संपूर्ण मुलाखत हिंदीत आहे. यात त्यांनी मुस्लिमांना कोठेही दुय्यम दर्जाचे नागरिक म्हटले गेले नाही. व्हिडिओमध्ये 2.37 मिनिटांनंतर राज्यघटना आणि मुस्लिमांविषयी बोलताना भागवत म्हणतात की भारत हा जगातील एकमेव असा देश आहे जेथे इतर धर्माच्या लोकांनाही घटनेने समान अधिकार दिले आहेत. भागवत पुढे म्हणतात की जेव्हा पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा पाकिस्तान हा धर्माच्या जोरावर निर्माण झाला होता, परंतु कोणत्याही भारतीय हिंदूंनी भारतीय मुस्लिमांना इथून पाकिस्तानात जा किंवा हिंदूंचे श्रेष्ठत्व स्वीकारा असे सांगितले नाही.
भागवत यांची संपूर्ण मुलाखत ऐकल्यानंतर आम्हाला कळले की इंडिया टुडेने त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला आणि त्यांनी जे बोलले त्याचा चुकीचा अर्थ लावला. हा लेख लिहिण्यापर्यंत इंडिया टुडेने आपला लेख अद्ययावत केला आहे आणि दिशाभूल करणारा भाग काढून टाकला परंतु लेखात काय बदल केले गेले याची माहिती दिलेली नाही. इंडिया टुडेने प्रकाशित केलेला लेख यापूर्वीही अद्ययावत झाला आहे.

इंडिया टुडेने प्रकाशित केलेला प्राथमिक अहवाल व अद्ययावत अहवाल येथे वाचला जाऊ शकतो.
प्रारंभिक रिपोर्ट: https://archive.vn/eqkKr
अपडेटेड रिपोर्ट: https://archive.vn/3cYAv
यावरुन हेच सिद्ध होते की, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानासंदर्भात इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेला लेख दिशाभूल करणारा आहे.