Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केला गेलाय की, आम आदमी पार्टीच्या शपथविधीच्या कार्यक्रमात आरएसएसचे प्रमुख मोहन भागवतही व्यासपीठावर उपस्थित होते. व्हायरल फोटोत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील दिसत आहे.
एका फेसबुक युजरने व्हायरल फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिले,”आम आदमी पार्टीच्या शपथ ग्रहणाच्या कार्यक्रमात आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांचे येणे म्हणजे हे नक्की कुठले संबंध आहे.”
(मूळ हिंदी पोस्टचा मराठीत अनुवाद केला आहे)
या ट्विटचे संग्रहण तुम्ही इथे पाहू शकता.
नुकत्याच पंजाबमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने ११७ पैकी ९२ जागा जिंकल्या. १६ मार्चला भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याचबरोबर १९ मार्चला आपच्या दहा आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली.
त्यातच पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खूप वेळा त्यांच्यावर आरोप झाला की, आप ही आरएसएसची ‘बी’ टीम आहे. सोशल मीडियावर ८ सेकंदाची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली.
या व्हिडिओत असा दावा केला गेलाय की, स्वतः अरविंद केजरीवाल हे जनसंघ परिवाराचे आहे आणि जन्मतःच ते भाजपचे असल्याचा दावा केला जात आहे. न्यूजचेकरच्या तपासात हा दावा भ्रामक निघाला होता. त्याचे फॅक्ट चेक तुम्ही इथे वाचू शकता..!
यातच आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून त्यात असा दावा केला जातोय की, आम आदमी पार्टीच्या शपथ ग्रहणाच्या कार्यक्रमात आरएसएसचे प्रमुख मोहन भागवतही व्यासपीठावर उपस्थित होते.
Fact Check / Verification
व्हायरल दाव्याची सत्यता तपासण्यासाठी आम्ही तो फोटो गुगल रिव्हर्सवर शोधला. त्यावेळी आम्हांला युएनआय या वृत्त संस्थेचा १९ मार्च २०२२ रोजी प्रकाशित झालेली एक बातमी सापडली. त्या बातमीनुसार, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कॅबिनेटमध्ये दहा मंत्री सामील होणार होते.
या मंत्र्यांना पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल राजपुरोहित यांनी चंदीगड स्थित असलेल्या राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, हरियाणाचे राज्यपाल बंदारू दत्तात्रेय आणि पंजाबचे प्रोटेम स्पिकर इंद्रबीर सिंह निज्जर देखील उपस्थित होते.
युएनआयच्या त्या बातमीत व्हायरल फोटोचा समावेश आहे. त्या कार्यक्रमात आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित असल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
या तपासात आम्हांला हरियाणाचे राज्यपाल बंदारू दत्तात्रेय यांनी १९ मार्च २०२२ रोजी केलेले एक ट्विट सापडले. त्या ट्विटनुसार,”आपच्या पंजाब सरकारचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्र्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम चंदीगडस्थित राजभवनात पार पडला.”
या ट्विटच्या सोबत एक फोटो देखील जोडलाय. त्यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल राजपुरोहित, हरियाणाचे राज्यपाल बंदारू दत्तात्रेय दिसत आहे.
या व्यतिरिक्त आम आदमी पार्टीच्या युट्यूब वाहिनीने पंजाबच्या नवनियुक्त मंत्र्यांच्या शपथविधीचा व्हिडिओ अपलोड केला होता. त्या व्हिडिओत देखील आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत कुठेही दिसत नाही.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, आम आदमी पार्टीच्या शपथविधीच्या कार्यक्रमात आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत व्यासपीठावर उपस्थित नव्हते.
Result : Misleading/Partly False
Our Sources
१९ मार्च २०२२ रोजी प्रसिद्ध झालेली युएनआयची बातमी
१९ मार्च २०२२ रोजी हरियाणाच्या राज्यपालांनी केलेले ट्विट
१९ मार्च २०२२ रोजी आम आदमी पार्टीने अपलोड केलेली व्हिडिओ
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
May 21, 2025
Vasudha Beri
May 16, 2025
Kushel Madhusoodan
April 8, 2025