Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
भारत सरकारने टेलिग्रामवर बंदी घातली आहे.
Fact
हा दावा खोटा आहे. असा कोणताही निर्णय भारत सरकारने घेतलेला नाही.
अलीकडेच, मेसेजिंग ॲप टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव यांना पॅरिस, फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. टेलीग्रामचा वापर अमली पदार्थांची तस्करी आणि बाल लैंगिक शोषणाच्या प्रतिमांचे वितरण यासारख्या बेकायदेशीर कामांसाठी केला जात असल्याचा आरोप आहे. दरम्यान, भारत सरकारने टेलिग्रामवर बंदी घातल्याचा दावा करत झी न्यूजचे एक ग्राफिक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, तपासात आम्हाला हा दावा खोटा असल्याचे आढळले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या झी न्यूजच्या लोगोच्या ग्राफिकवर हे लिहिलेले आहे (संग्रहण), “भारत सरकार ने सोशल ऐप टेलीग्राम को किया बैन, जल्द ही प्ले स्टोर से हटा ली जाएगी ऐप।”
दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही संबंधित कीवर्डसाठी Google वर शोधले. या वेळी, आम्हाला भारत सरकारने टेलिग्रामवर बंदी घातल्याच्या दाव्याला पुष्टी देणारा कोणताही विश्वसनीय रिपोर्ट किंवा सरकारी दस्तऐवज सापडला नाही.
आता आम्ही क्षितिज सिंघा, उपसंचालक, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय) यांच्याशी संपर्क साधला. फोनवरील संभाषणात त्यांनी भारत सरकारने टेलिग्रामवर बंदी घातल्याच्या दाव्याचे खंडन केले आणि म्हणाले, “भारत सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.”
व्हायरल ग्राफिकची अधिक चौकशी करण्यासाठी, आम्ही झी न्यूजच्या टेक पत्रकाराशी बोललो. त्याने व्हायरल ग्राफिक बनावट म्हटले. जर तुम्ही नीट बघितले तर तुम्हाला व्हायरल ग्राफिकवर PDF MALA लिहिलेले दिसेल. त्यांनी सांगितले की असा वॉटरमार्क झी न्यूजच्या मूळ ग्राफिक्सवर लावलेला नाही.
तपासातून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचतो की भारत सरकारने टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला नाही. व्हायरल दावा खोटा आहे.
Sources
Phonic conversation with Kshitij Singha, DD PIB (MeitY).
Phonic conversation with Tech journalist of Zee News.
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम कोमल सिंग यांनी केले असून, ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा