Wednesday, December 25, 2024
Wednesday, December 25, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांचे नाव परवेझ राजा आहे का?...

फॅक्ट चेक: एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांचे नाव परवेझ राजा आहे का? येथे जाणून घ्या सत्य

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांचे नाव परवेझ राजा आहे.
Fact

हा दावा पूर्णपणे निराधार असून दिशाभूल करीत व्हायरल केला जात आहे.

एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांचे नाव परवेझ राजा आहे, असे सांगत एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. आम्हाला फेसबुक आणि X या माध्यमांवर हा दावा शेयर केला जात असल्याचे निदर्शनास आले.

“प्रणव राॅय यांच्या सी. बी. आय.च्या अटकेत प्रणव राॅय यांचा जन्म दाखला मिळाला त्यानुसार प्रणव राॅय यांचे खरे नांव परवेज राजा असून जन्म कराची असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या पत्नीचे नाव राधिका नसून राहीला आहे. NDTV म्हणजे नवाजुद्दीन तौफिक वॅनचुअर असे आहे. नवाजुद्दीन तौफिक हे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. अशा प्रकारे पत्रकारांच्या भुमिकेतून भारता विषयी चुकीच्या माहिती आधारे भारतीयांची दिशाभूल करणाऱ्या पत्रकारितेचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हि बातमी इतर ग्रुप वर प्रसारित न केल्यास देशाच्या दिशाभूल करणाऱ्या पत्रकाराला पाठिशी घालण्याचे पातक कोणी घेवू नये, हिच अपेक्षा.” अशा कॅप्शनखाली हा दावा शेयर केला जात आहे.

दाव्यांचे संग्रहण येथे आणि येथे पाहता येईल.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

फॅक्ट चेक: एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांचे नाव परवेझ राजा आहे का? येथे जाणून घ्या सत्य

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्यामध्ये प्रणव रॉय सीबीआयच्या अटकेत असताना त्यांचा जन्मदाखला मिळाला आणि त्यांची गुपिते स्पष्ट झाली असे म्हणण्यात आल्याचे आम्हाला दिसले. संबंधित कीवर्डस वापरून आम्ही शोध घेतला असता, अशाप्रकारचे दावे २०२० पासूनच केले जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले. यावरून त्यांना सीबीआयने केलेली अटक सध्याची नसून जुनी असल्याचा सुगावा घेऊन आम्ही Google वर शोध घेतला.

शोध घेत असताना आम्हाला दैनिक जागरण ने ५ जून २०१७ रोजी प्रसिद्ध केलेली बातमी पाहायला मिळाली. ‘प्रणय रॉय के घर पर CBI की रेड, केजरीवाल और ममता समर्थन में उतरे’ या शीर्षकाखाली दिलेल्या या बातमीत “सीबीआयने रात्री उशिरा प्रणव रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला. प्रणय रॉय यांच्यावर निधी पळवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रणय रॉय यांच्यावर आयसीआयसीआय बँकेचे ४८ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.” असे आम्हाला वाचायला मिळाले.

फॅक्ट चेक: एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांचे नाव परवेझ राजा आहे का? येथे जाणून घ्या सत्य
Courtesy: Dainik Jagaran

५ जून २०१७ रोजी Zee News चा व्हिडीओ रिपोर्ट आणि नवभारत टाईम्सने केलेल्या बातमीतही आम्हाला या २०१७ च्या जून महिन्यात झालेल्या प्रणव रॉय यांच्यावरील छाप्याची माहिती मिळाली.

याशिवाय देशातील जवळपास सर्वच प्रतिष्ठित माध्यम संस्थांनी प्रणव रॉय यांच्या घरावर सीबीआयच्या छाप्याची बातमी ठळकपणे प्रसिद्ध केली होती. पण प्रणव रॉयचे नाव परवेझ राजा आहे किंवा एनडीटीव्हीचे नाव नवाजुद्दीन तौफिक वेंचर असल्याचा उल्लेख कोणत्याही मीडिया रिपोर्टमध्ये नाही.

शोधादरम्यान असे आढळून आले की त्यावेळीही असे अनेक दावे वेगाने शेअर केले जात होते. त्यावेळी प्रणव रॉय यांची पत्नी राधिकाबाबतही अशाच गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. त्यावेळी व्हायरल झालेल्या दाव्यावर लल्लनटॉप यांनी तपास करून या दाव्यांचे खंडन केले होते.

काही मीडिया रिपोर्ट्ससह प्रणवचे चरित्र वाचल्यानंतर हे समोर आले की त्यांचा जन्म कोलकाता येथे १९४९ साली झाला होता. याशिवाय त्यांच्या X हँडलवर त्यांचे नाव प्रणव रॉय असे लिहिले आहे.

फॅक्ट चेक: एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांचे नाव परवेझ राजा आहे का? येथे जाणून घ्या सत्य
Courtesy: Dainik Bhaskar

महत्वाचे म्हणजे द हिंदूंच्या १ ऑक्टोबर २०२४ च्या रिपोर्टनुसार CBI ने १ ऑक्टोबर २०२४ रोजी NDTV चे माजी प्रवर्तक आणि संचालक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्या विरोधात कथित फसवणुकीच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला कारण त्यांना ICICI बँकेने केलेल्या ४८ कोटींच्या फसवणुकीच्या आरोपात योग्य पुरावे मिळाले नाहीत. रिपोर्ट येथे वाचता येईल.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांचे नाव परवेझ राजा आहे हा दावा पूर्णपणे निराधार असून दिशाभूल करीत व्हायरल केला जात असल्याचे स्पष्ट झाले.

Result: False

Our Sources
News published by Dainik Jagaran on June 5, 2017
News published by Zee News on June 5, 2017
News published by Navbharat Times on June 5, 2017
News published by Lallan Top on June 7, 2017
News published by Dainik Bhaskar
News published by The Hindu on October 1, 2024


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular