Fact Check
गायक मोहम्मद रफी यांच्या मुलीचा हरिनाम संकीर्तन करतानाचा व्हायरल व्हिडिओ खरा आहे का?
Claim
लोकप्रिय हिंदी पार्श्वगायक मोहम्मद रफी यांची मुलगी हिंदू मुलीसारखी वेशभूषा करून हरिनाम संकीर्तन करताना.
Fact
व्हायरल व्हिडिओ सोबतची माहिती खोटी आहे. व्हायरल व्हिडिओमधील गायिकेचे नाव गीतांजली राय आहे.
गायक मोहम्मद रफी यांची मुलगी पारंपारिक वेशात हरिनाम संकीर्तन करीत असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
“हरिनाम संकीर्तन कोण करतंय माहीत आहे का..?? मुस्तफा फरावेज प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांची मुलगी आहे. ज्या महिलांनी फॅशनच्या नावाखाली हिंदू पोशाख वापरणे सोडले आहे, त्यांनी तिच्याकडून शिकले पाहिजे. मधुर आवाजाने गायलेले अतिशय सुंदर हरी भजन कोणत्याही प्रसिद्ध गायकापेक्षा कमी नाही.!” अशा कॅप्शनखाली हा दावा शेयर केला जात आहे.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check/ Verification
गायक मोहम्मद रफी यांची मुलगी हरिनाम संकीर्तन करत असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल व्हिडिओचा आम्ही तपास केला.
आम्ही व्हायरल व्हिडिओला कीफ्रेममध्ये विभागले आणि त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. शेवटी, आम्हाला भक्तीगीत गायिका गीतांजली रॉय यांच्या अधिकृत YouTube चॅनेल वरील एक व्हिडिओ क्लिप मिळाली.
“चिन्मय मिशनने गीतांजली राय यांनी गायलेल्या अद्भुत रचनांचे एक सुंदर सादरीकरण आयोजित केले.हे जगभरातील सर्वात आवडते गाणे आहे. या गाण्यावर प्रेम आणि शेअर केल्याबद्दल सर्वांचे आभार.” असे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे. व्हायरल व्हिडिओ त्यातून कापण्यात आला आहे. हा व्हिडिओ गीतांजली रॉयच्या अधिकृत वेबसाइटवर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.
११ ऑगस्ट २०१९ रोजी, गीतांजली राय यांच्या अधिकृत यूट्यूब खात्यावर त्या मोहम्मद रफी यांची मुलगी आणि नात असल्याच्या अफवांचे खंडन केले होते.
Conclusion
आमच्याकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की, गायक मोहम्मद रफी यांची मुलगी हरिनाम संकीर्तन करत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ खोटा आहे.
Our Sources
YouTube Video from Gitanjali rai, Dated August 11, 2019