फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही अनेक फेक दावे सोशल मीडियावर व्हायरल झाले. गुंडांना अटक करतानाचा यूपी पोलिसांचा व्हिडिओ, असा दावा करण्यात आला. हरिद्वार येथील अनाथाश्रमात मुलाला अमानुष मारहाण करण्यात आली, असा दावा झाला. छावा फिल्म बघितल्यानंतर सर्व लोक हाजीअली मध्ये शिरले, असा दावा करण्यात आला. लोकप्रिय हिंदी पार्श्वगायक मोहम्मद रफी यांची मुलगी हिंदू मुलीसारखी वेशभूषा करून हरिनाम संकीर्तन करताना, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

हा व्हिडीओ उत्तरप्रदेशातील नाही
गुंडांना अटक करतानाचा यूपी पोलिसांचा व्हिडिओ, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

हरिद्वार येथील अनाथाश्रमात मुलाला मारले?
हरिद्वार येथील अनाथाश्रमात मुलाला अमानुष मारहाण करण्यात आली, असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.

छावा फिल्म बघितल्यानंतर सर्व लोक हाजी अली मध्ये शिरले?
छावा फिल्म बघितल्यानंतर सर्व लोक हाजीअली मध्ये शिरले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.

हरिनाम संकीर्तन करणारी गायिका मोहम्मद रफी यांची मुलगी आहे?
लोकप्रिय हिंदी पार्श्वगायक मोहम्मद रफी यांची मुलगी हिंदू मुलीसारखी वेशभूषा करून हरिनाम संकीर्तन करताना, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.