Friday, December 20, 2024
Friday, December 20, 2024

HomeFact CheckFact Check: जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन अँजिओग्राफी पद्धत फक्त ₹5000 मध्ये? खोटा...

Fact Check: जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन अँजिओग्राफी पद्धत फक्त ₹5000 मध्ये? खोटा आहे हा दावा

Claim
मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन अँजिओग्राफी पद्धत सुरु झाली असून खर्च फक्त ₹5000 आहे.
Fact
हा दावा खोटा आहे. जे. जे. हॉस्पिटलने याचा इन्कार केला आहे.

मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलच्या नावे एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून हा दावा सध्या केला जात आहे. आता हार्ट अटॅक ला घाबरण्याची गरज नाही. या इस्पितळात नवी सीटी अँजिओग्राफी पद्धत सुरु झाली असून येथे फक्त ₹5000 इतकाच खर्च येतो असे हा दावा सांगतो.

Fact Check: जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन अँजिओग्राफी पद्धत फक्त ₹5000 मध्ये? खोटा आहे हा दावा
Courtesy: Twitter@onlynikil

“आता हार्ट अ‍ॅटॅकची चिंता सोडा. पहा नवीन तंत्रज्ञान अशाप्रकारची C T अँजिओग्राफी की जिच्याद्वारे HEART BLOCKS डायरेक्ट काढले जातात. जे. जे. हाॅस्पिटल मुंबई येथे उपलब्ध 5000 रू. खर्च विडिओ अवश्य पहा व गरजूं पर्यंत पोहोचवा. कृपया तुमच्याकडे जेवढे ग्रुप आणि काॅन्टॅक्ट नं. असेल त्यांना ही बातमी पटकन पाठवा लगेच ताबडतोब…..! महत्वाची माहिती शेअर करताना खूपआनंद होतोय !” असे हा दावा सांगतो.

न्यूजचेकरला तथ्य तपासण्यासाठी आमच्या WhatsApp टिपलाइनवर (+91-9999499044) अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला आहे.

Fact Check: जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन अँजिओग्राफी पद्धत फक्त ₹5000 मध्ये? खोटा आहे हा दावा

Fact Check/ Verification

व्हायरल व्हिडीओ आणि त्यासंदर्भात केला जात असलेला दावा याबद्दल Google वर कीवर्ड सर्च केला असता, अनेक वर्षांपासून हा दावा इंटरनेटवर केला जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली. २०१८ पासून हा दावा ट्विटर वर केला जात असल्याचे आम्हाला आढळले.

Fact Check: जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन अँजिओग्राफी पद्धत फक्त ₹5000 मध्ये? खोटा आहे हा दावा

आम्ही यासंदर्भात कोणते मीडिया रिपोर्ट उपलब्ध आहेत का? याचा शोध घेतला. मात्र जे. जे. रुग्णालयाने नवीन पद्धत सुरु केल्याची किंवा ₹5000 मध्ये अँजिओग्राफी होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली नाही. आम्हाला मुंबई live ने प्रसिद्ध केलेली एक बातमी सापडली. यामध्ये जे. जे. रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र बन्सल यांनी हा व्हिडीओ बोगस असल्याचे म्हटले आहे. ” व्हिडिओत दाखविण्यात आलेले तंत्रज्ञान अद्याप आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेले नाही. शिवाय कोणत्याही पद्धतीने अँजिओग्राफी करण्यासाठी फक्त ₹5000 रुपये खर्च येतो हा दावा चुकीचा असून या शस्त्रक्रियेचा खर्च जास्त आहे. नागरिकांनी अशा व्हिडिओवर विश्वास ठेऊ नये आणि हॉस्पिटलमध्ये चौकशी करू नये.” असे आवाहन डॉ. बन्सल यांनी केल्याचे आम्हाला वाचायला मिळाले.

Fact Check: जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन अँजिओग्राफी पद्धत फक्त ₹5000 मध्ये? खोटा आहे हा दावा
Screengrab of Mumbai Live

आम्ही जे. जे. हॉस्पिटलच्या अधिकृत वेबसाईटवर शोध घेतला. मात्र अशाप्रकारे कमी खर्चात अँजिओग्राफी करण्याची कोणती नवी पद्धत सुरु केल्याची माहिती आम्हाला मिळाली नाही.

Fact Check: जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन अँजिओग्राफी पद्धत फक्त ₹5000 मध्ये? खोटा आहे हा दावा
Screengrab of J J Hospitals Website

न्यूजचेकरने आणखी माहिती मिळविण्यासाठी जे. जे. रुग्णालयाशी संपर्क केला. कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. कल्याण मुंढे यांच्या कार्यालयातून आम्हाला व्हायरल व्हिडीओ आणि दावा खोटा असल्याची माहिती मिळाली. “हा दावा व्हायरल झाल्यामुळे परदेशातूनही फोन येत असून हॉस्पिटलला याचा मनस्ताप झाला आहे. इतक्या कमी खर्चात अँजिओग्राफी करण्याचे कोणतेही तंत्रज्ञान अद्याप उपलब्ध नाही. दरम्यान नागरिकांची दिशाभूल करण्याचा हा उद्देश असून नागरिकांनी यावर विश्वास ठेऊ नये.” असे आवाहन करण्यात आले आहे.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल दावा जनतेची दिशाभूल करणारा आणि खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये ₹5000 मध्ये अँजिओग्राफी करण्याची कोणतीही नवीन पद्धत अस्तित्वात नसून खोट्या माहितीचा प्रसार केला जात असल्याचे उघड झाले आहे.

Result : False

Our Sources
Google search results
Official Website of J J Hospital, Mumbai
News published by Mumbai Live
Conversation with Cardiology Department, J J Hospital, Dr. Kalyan Mundhe’s office


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular