Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो उत्तर प्रदेशचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्व्हिहिडिओत एका रस्त्याचा आहे जिथे पोलीस कर्मचारी अनेक काही लोकांवर लाठीमार करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये लोक थांबलेले दिसत आहेत आणि पोलिस त्यांच्यावर लाठीचार्ज करत आहेत.
दावा करण्यात येत हे की, भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर उत्तरप्रदेशात फटाके फोडण्याच आले. यानंतर योगी सरकारच्या पोलिसांनी फटाके फोडणा-यांचा असा समाचार घेतला.
पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
परवा पाकिस्तानने मॅच जिंकल्यानंतर काही हौशी लोकांनी फटाकड्या वाजवून शुभेच्छा दिल्या त्यानंतर लगेच योगी सरकारनेही संबंधिताचा सत्कार केला तो अनमोल क्षण आपणही पाहवा.
सोशल मीडियावर हायरल होत असलेल्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी ाम्ही याबाबत शोध सुर केला यसाठी व्हिडिओतील काही किफ्रेम्स काढून काढून गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला व्हिडिओतील दृश्यांशी मिळता जुळता फोटो 20 आॅक्टोबर रोजीच्या एका बातमीत आढळून आला मात्र ही बातमी मध्यप्रदेशातील जबलपुरमधूल असल्याचे आढळले. बातमी म्ह्टले आहे की, जबलपूरच्या मिलौनीगंजमध्ये ईद मिलादुन्नबीच्या मिरवणुकीवरून तरुण आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. मिरवणूक ठरलेल्या मार्गावरून फिरत असताना पोलिसांनी तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, तरुणांनी पोलिसांवर फटाके फोडले. त्याचवेळी त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी तरुणांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
याबाबत अधिक माहित मिळविण्यासाठी आम्ही काही किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला एमपी तक या युटयूब चॅनलवर 19 आॅक्टोबर रोजीची बातमी आढळून आली
याशिवाय आम्हाला दैनिक भास्करची देखील बातमी आढळून आली. यात म्हटले की, धारनंतर जबलपूरमध्ये ईद मिलादुन्नबीच्या मिरवणुकीवरून वाद झाला आहे. येथे मिरवणूक काढणाऱ्या समजावल्नेयानंतरही पोलिसांवर जळते फटाके फेकले आणि दगडफेक केली. पोलिसांना सौम्य बळाचा वापरही करावा लागला. त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले.
ही मिरवणूक मासळी बाजारातून सुब्बा शाह मैदानाकडे जाणार होती, मात्र अचानक मासळी बाजारातून मिरवणुकीत सहभागी असलेल्या काही तरुणांनी सराफाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि बॅरिकेड्स हटवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी थांबवून समजावले असता काही लोकांनी पोलिसांच्या दिशेने जळते फटाके फेकले. यानंतर कुजलेले टोमॅटो व डाळिंब फेकण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी रस्त्यावरून दगडफेक सुरू केली.
व्हायरल व्हिडिओबाबत व्हिडीओबाबत आम्ही जबलपूर पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता त्यांनी ही घटना येथे घडल्याची पुष्टी केली आणि 19 तारखेला ईद-ए-मिलादुन्नबीच्या दिवशी जुलूस निघाला होता. त्यात जमावाने निर्धारित मार्ग न पाळता नकार देत दगडफेक सुरू केली. त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेसंदर्भात लोकांना अटक करण्यात येत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाने दिली.
आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की, सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तरप्रदेशातील नसून मध्यप्रदेशातील जबलपूरचा आहे त्याचा भारत पाकिस्तान मॅचशी काही संबंध नाही मॅचच्या चार दिवस आधीचा हा व्हिडिओ आहे.
एमपी तक
दैनिक भास्कर
जबलपूर पोलिस
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Komal Singh
February 24, 2025
Komal Singh
September 6, 2024
Komal Singh
June 12, 2024