Authors
Claim
कर्नाटकात भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्यानंतर नागरिकांनी त्यांची तोडफोड केली.
Fact
प्रत्यक्षात आरक्षित ईव्हीएम मशीन निवडणूक अधिकाऱ्यांच्या वाहनातून नेण्यात येत असताना गैरसमजातून हा प्रकार घडला असून दिशाभूल करीत खोटा दावा करण्यात येत आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही लोक ईव्हीएम मशीन फोडताना दिसत आहेत. भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्यानंतर स्थानिक लोकांनी गोंधळ घातल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
वास्तविक, 10 मे रोजी कर्नाटकात विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कालावधीत राज्यात एकूण 72% मतदान झाले.
Fact Check/ Verification
दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही Invid टूलच्या मदतीने व्हायरल व्हिडिओचे काही मुख्य फ्रेम्स काढले. त्यांचा रिव्हर्स इमेज सर्च केला. ‘दैनिक भास्कर’च्या वेबसाईटवर १० मे रोजी प्रकाशित झालेला रिपोर्ट आम्हाला आढळला. त्यात व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनग्राब आहे. वृत्तानुसार, व्हिडिओ कर्नाटकच्या विजयपुर पूर्वीचे विजापूर जिल्ह्यातील आहे, जिथे बसवण बागेवाडी तालुक्यात काही लोकांनी ईव्हीएम आणि VVPAT मशीन फोडल्या.
शिवाय, ‘न्यूज 18‘ आणि ‘DighVijay’ च्या यूट्यूब चॅनेलवर 10 मे रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओत देखील कर्नाटकातील विजयपुर येथील घटनेचे वर्णन केले आहे.
‘डेक्कन क्रॉनिकल’च्या वेबसाइटवर 10 मे रोजी प्रकाशित झालेला रिपोर्ट आम्हाला आढळला. वृत्तानुसार, विजयपुर जिल्ह्यातील मसबिनाळ गावात काही गावकऱ्यांनी सेक्टर ऑफिसरचे वाहन अडवले, कर्नाटकात मतदानादरम्यान राखीव ठेवलेल्या ईव्हीएमचे नुकसान केले. राखीव ईव्हीएम बसवण बागेवाडी विधानसभा मतदारसंघात नेत असताना ही घटना घडली. अहवालात अधिकार्यांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, ईव्हीएमचा गैरवापर होऊन त्याचे नुकसान होत असल्याची ग्रामस्थांची धारणा होती. विजयपुरा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, या घटनेसंदर्भात 23 जणांना अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान, आम्हाला एका युजरच्या ट्विटच्या रिप्लाय विभागात कर्नाटकच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या ट्विटर हँडलवरून केले गेलेले एक ट्विट देखील आढळले, त्यानुसार, ही घटना मसबिनाळ गावात घडली जिथे गावकऱ्यांनी सेक्टर ऑफिसरच्या वाहनावर हल्ला केला आणि आरक्षित ईव्हीएम मशीनचे नुकसान केले. गावकऱ्यांनी दोन कंट्रोल युनिट, दोन बॅलेट युनिट आणि तीन व्हीव्हीपॅटचेही नुकसान केले. याप्रकरणी 23 जणांना अटक करण्यात आली आहे.
याशिवाय विजयपुरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ट्विटर हँडलनेही व्हायरल व्हिडिओबाबत ट्विट केले आहे. यामध्ये भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम असल्याचा दावा फेटाळण्यात आला आहे. ट्विटनुसार, “हा दावा दिशाभूल करणारा आहे. प्रत्यक्षात ग्रामस्थांनी सेक्टर ऑफिसरच्या वाहनात नेण्यात येत असलेले राखीव ईव्हीएम अडवून त्याचे नुकसान केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून 24 जणांना अटक करण्यात आली आहे.”
Conclusion
त्यामुळे कर्नाटकातील भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Rating: False
Our Sources
Report Published by Dainik Bhaskar on May 10, 2023
Report Published by Decaan Chronicle on May 10, 2023
Tweet by CEO of Karnataka on May 10, 2023
Tweet by DC of Vijayapura on May 10, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in