Authors
Claim
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर हेराफेरी झाली.
Fact
हा व्हिडिओ पश्चिम बंगालमध्ये 2022 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीचा आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रात हेराफेरी झाल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
10 मे 2023 रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, राज्यातील विधानसभेच्या एकूण 224 जागांपैकी काँग्रेसने 135 जागा जिंकल्या आहेत. सत्ताधारी भाजपला केवळ 66 जागांवर यश मिळाले आहे. सहसा निवडणुकीनंतर हेराफेरीचे किंवा खोटेपणाचे दावे व्हायरल होतात. याच क्रमाने, सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या एका व्हिडिओसह कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर हेराफेरी तसेच बोगस मतदान झाल्याचा दावा केला जात आहे.
Fact Check/ Verification
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पोलिंग बूथ हेराफेरीच्या नावाखाली शेअर करण्यात येत असलेल्या या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी, आम्ही गुगलवर त्याची एक की फ्रेम तपासली. या प्रक्रियेत, आम्हाला कळले की हा व्हिडिओ इंटरनेटवर फेब्रुवारी 2022 पासूनच उपलब्ध आहे.
आसनसोल दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार अग्निमित्रा पॉल यांनी 27 फेब्रुवारी 2022 रोजी एक ट्विट शेअर करून हा व्हिडीओ दक्षिण दम दम येथील महापालिका निवडणुकीदरम्यान हेराफेरीचा असल्याचे म्हटले होते.
या व्यतिरिक्त, आम्हाला हे देखील कळले की इतर अनेक भाजप नेते आणि सोशल मीडिया युजर्सनी देखील फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये पश्चिम बंगालमधील महापालिका निवडणुकांच्या संदर्भात हा व्हिडिओ शेअर केला होता.
वरील ट्विटमध्ये दिलेल्या माहितीच्या मदतीने आम्ही Google वर ‘লেকভিউ স্কুল, বুথ নম্বর ১০৮, ওয়ার্ড ৩৩, দক্ষিণ দমদম পৌরসভা’ म्हणजेच ‘लैखवियु स्कूल, बुथ नंबर 108, वार्ड 33, दक्षिण दुमदम पौरसभा’ हे कीवर्ड शोधले. प्रक्रियेत, आम्हाला कळले की हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील 2022 च्या महापालिका निवडणुकांबद्दलचा आहे.
सर्च रिझल्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, TV9 Bangla ने सुद्धा हा व्हिडिओ 2022 मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीबद्दल असल्याचेच सांगितले आहे.
Conclusion
त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील मतदान केंद्रातील हेराफेरीच्या नावाखाली करण्यात येत असलेला हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. वास्तविक हा व्हायरल व्हिडिओ फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या पश्चिम बंगालच्या महापालिका निवडणुकांचा आहे.
Result: False
Our Sources
YouTube video published by TV9 Bangla on 27 February, 2022
Facebook post shared by The News বাংলা on 26 February, 2022
Facebook post shared by CPIM West Bengal on 27 February, 2022
Tweet shared by BJP MLA Agnimitra Paul on 27 February, 2022
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in