Thursday, April 24, 2025
मराठी

Fact Check

Fact Check: कर्नाटकात जैन मुनींवर मुस्लिमांचा हल्ला? खोटा जातीय दावा व्हायरल

Written By Arjun Deodia, Translated By Prasad S Prabhu, Edited By Pankaj Menon
May 16, 2023
banner_image

Claim
कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर मुस्लिमांनी जैन मुनीवर हल्ला केला.

Fact
ही चित्रे वर्षानुवर्षे जुनी आहेत, त्यांचा कर्नाटक निवडणुकीच्या निकालाशी काहीही संबंध नाही.

काँग्रेसवर अनेकदा मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप केला जातो. कर्नाटक निवडणुकीतही भाजपने हा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर अनेकवेळा हल्लाबोल केला. आता कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे.

दरम्यान, एका फोटो कोलाजसह असा दावा केला जात आहे की, काँग्रेसची सत्ता येताच मुस्लिमांनी कर्नाटकात आपले रूप दाखवायला सुरुवात केली आहे. ‘काँग्रेस झिंदाबाद’चा नारा न दिल्याने कर्नाटकात एका जैन मुनीला मुस्लिमांनी मारहाण केल्याचे या दाव्यात म्हटले आहे.

व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये तीन फोटो आहेत. पहिल्या दोन चित्रांमध्ये एक स्त्री आणि पुरुष रक्ताने माखलेले दिसत आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये एक वृद्ध व्यक्ती कपड्यांशिवाय बसलेली दिसत आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट ट्विटर आणि फेसबुकवर चांगलीच व्हायरल होत आहे.

Fact Check: कर्नाटकात जैन मुनींवर मुस्लिमांचा हल्ला? खोटा जातीय दावा व्हायरल
Courtesy: Facebook/sharad.chaudhary.1694
Fact Check: कर्नाटकात जैन मुनींवर मुस्लिमांचा हल्ला? खोटा जातीय दावा व्हायरल
Courtesy: Twitter@Rajendr46509722

एका युजरने आमच्या व्हॉट्सअप टिपलाइनवरही हा दावा पाठवला आहे.

Fact Check: कर्नाटकात जैन मुनींवर मुस्लिमांचा हल्ला? खोटा जातीय दावा व्हायरल

Fact Check/ Verification

पहिला फोटो

रक्तात भिजलेल्या महिलेचा फोटो रिव्हर्स सर्च केला असता, हा फोटो 2018 पासून इंटरनेटवर असल्याचे आढळून आले. हा फोटो याआधीही अनेक दाव्यांसह व्हायरल झाला आहे. या फोटोसह इतर काही फोटो एका युजरने 30 मार्च 2018 रोजी पश्चिम बंगालचे असे सांगत शेअर केले होते.

मात्र, आम्हाला हा फोटो कोणत्याही विश्वसनीय न्यूज वेबसाइटवर सापडला नाही, त्यामुळे हा फोटो कुठला आहे हे सांगणे कठीण आहे. मात्र हा फोटो पाच वर्षांहून जुना असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Fact Check: कर्नाटकात जैन मुनींवर मुस्लिमांचा हल्ला? खोटा जातीय दावा व्हायरल
Courtesy: Twitter@Kkjh74

दुसरा फोटो

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाचा हा फोटोही वर्षानुवर्षे जुना आहे. मे 2018 मध्ये काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढ़ी आणि आप नेते संजय सिंह यांनी हा फोटो शेअर करत यूपीच्या योगी सरकारवर निशाणा साधला होता. दोघांनी दावा केला होता की फोटोमध्ये दिसणारा माणूस बीएड आणि टीईटी परीक्षेच्या निषेधार्थ लाठीचार्जमध्ये जखमी झालेला उमेदवार आहे.

SM Hoax Slayer नावाच्या वेबसाईटने आपल्या फॅक्ट चेकमध्ये सांगितले होते की, हे चित्र 2017 मधले मुझफ्फरनगर, यूपीमधील आहे. SM Hoax Slayer आपल्या वेबसाइटवर एका बातमीचा स्क्रीनशॉट देखील पोस्ट केला होता, ज्यामध्ये या व्यक्तीचा फोटो दिसत आहे. बातमीच्या मथळ्यानुसार, हा माणूस पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमप्रकरणात अडथळा बनत होता, त्यामुळे पत्नी-प्रेयसीने त्याला बेदम मारहाण केली होती.

Fact Check: कर्नाटकात जैन मुनींवर मुस्लिमांचा हल्ला? खोटा जातीय दावा व्हायरल
Courtesy: SM Hoax Slayer

हा स्क्रीनशॉट रॉयल बुलेटिन नावाच्या वेबसाइटचा आहे. मात्र, आता स्क्रीनशॉटसह बातमी वेबसाइटवर उपलब्ध नाही. SM Hoax Slayer आपल्या बातमीत लिहिले आहे की, त्यांनी या वेबसाइटच्या संपादकाशी संपर्क साधला होता, त्यांनी सांगितले की हा फोटो त्यांच्या एका पत्रकाराने क्लिक केला आहे. हा फोटो रॉयल बुलेटिन वृत्तपत्रातही प्रसिद्ध झाला होता.

तिसरा फोटो

तिसरा फोटो रिव्हर्स सर्च केल्यावर आम्हाला डेक्कन क्रॉनिकल या मीडिया संस्थेची एक बातमी सापडली. 31 मार्च 2018 रोजी प्रकाशित झालेल्या या बातमीत असे म्हटले आहे की हा फोटो जैन मुनी उपाध्याय मयंक सागर महाराज यांचा आहे, जो पोस्टकार्ड न्यूज नावाची वेबसाइट चालवणारे महेश विक्रम हेगडे यांनी दिशाभूल करणारा दावा करून शेअर केला होता.

Fact Check: कर्नाटकात जैन मुनींवर मुस्लिमांचा हल्ला? खोटा जातीय दावा व्हायरल
Courtesy: Deccan Chronicle

मयंक सागर कर्नाटकात अपघातात जखमी झाले होते, तर हेगडे यांनी सोशल मीडियावर लिहिले की, मुस्लिमांनी जैन मुनीवर हल्ला केला. हेगडे यांना पोलिसांनी खोट्या बातम्या पसरवल्याप्रकरणी अटक केली होती. यासंदर्भात ‘द हिंदू‘मध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले होते.

Conclusion

एकंदरीत, व्हायरल पोस्टमध्ये खोटा जातीय दावा केला जात असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. ही चित्रे वर्षानुवर्षे जुनी आहेत, त्यांचा कर्नाटक निवडणुकीच्या निकालाशी काहीही संबंध नाही. तसेच पोस्टमध्ये दिसणारे जैन मुनी हल्ल्यात नव्हे तर अपघातात जखमी झाले होते.

Result: False

Our Sources
Twitter post of March 30, 2018
Report of SM Hoax Slayer
Report of Deccan Chronicle and The Hindu


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,898

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.