Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
माश्याच्या पोटात गोळ्या ठेवणाऱ्या एक व्यक्तीला पोलिसांनी पकडले असे सांगणारा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.
दाव्याचे संग्रहण इथे पाहता येईल.
“कोल्हापूर जिल्ह्यातील निपाणी गावामध्ये मुसलमानाने प्रत्येक माशाच्या पोटात किडन्या खराब करणाऱ्या गोळ्या ठेवल्या… आणि हे मासे तो दररोज हिंदूंना विकायचा पण अखेर घडा भरला आणि त्याचे पाप समोर आले, याच्यामुळेच आम्ही म्हणतो त्यांच्याकडून काहीच खरेदी करू नका.” असे हा दावा सांगतो.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
दाव्यामध्ये वापरलेल्या कॅप्शनमध्ये सुरुवातीलाच ‘कोल्हापूर जिल्ह्यातील निपाणी’ असा उल्लेख आला आहे, दरम्यान निपाणी हे गाव कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात येत असल्याने आणि कोल्हापूर महाराष्ट्रात असल्याने आम्हाला संशय आला.
व्हिडिओचे परीक्षण केल्यावर, आम्हाला ‘ब्रेव्ह इंडिया’ हा लोगो सापडला. हे संकेत म्हणून आम्ही एक कीवर्ड शोधला आणि ‘ब्रेव्ह इंडिया’ या ऑनलाइन पोर्टलच्या यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजवर आम्हाला हा व्हिडिओ सापडला. 25 जुलै 2024 रोजी YouTube वर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओचे कॅप्शन “अरे देवा हेच आम्ही घेत आहोत || ब्रेव्ह इंडिया एक्सक्लुसिव्ह.” असे सांगते.
वर्णनात पुढे असे म्हटले आहे की, “कोचीमधील विविध बाजारपेठांमधून पकडलेले कृमीग्रस्त मासे.”
पल्लुरुथी येथे कोची कॉर्पोरेशनने सुमारे 200 किलो शिळे मासे जप्त केल्याचा 25 जुलै 2024 रोजी प्रकाशित न्यू इंडियन एक्सप्रेसचा रिपोर्ट देखील आम्हाला आढळला.
आम्हाला 25 जुलै 2024 रोजी केरळ कौमुदी आणि 24 जुलै 2024 रोजी कैरालीन्यूज ऑनलाइनमध्ये देखील कोचीमधील पल्लुरथी मार्केटमध्ये छापे टाकण्यात आल्याचे रिपोर्ट सापडले.
त्यामुळे, आम्हाला आढळले की, व्हिडिओमध्ये किडनी निकामी करणाऱ्या गोळ्यांनी भरलेले निपाणी येथील मासे नव्हे तर कोचीच्या मासळी बाजारात शिळ्या कृमीग्रस्त माशांवर पोलिसांनी केलेली कारवाई दिसत आहे.
Sources
YouTube Video of Brave India dated July 25,2024
News Report by New Indian Express dated July 25,2024
News Report by Karalionline date July 24,2024
News Report by Kerala Kaumudi on July 25,2024
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सबलु थॉमस यांनी केले असून, ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Runjay Kumar
March 10, 2025
Prasad S Prabhu
March 8, 2025
Prasad S Prabhu
March 7, 2025