Friday, April 26, 2024
Friday, April 26, 2024

HomeFact Checkचित्रपट निर्मात्या किरण राव यांचे जुने छायाचित्र दिशाभूल करीत होत आहे व्हायरल

चित्रपट निर्मात्या किरण राव यांचे जुने छायाचित्र दिशाभूल करीत होत आहे व्हायरल

चित्रपट निर्मात्या किरण राव यांचे जुने छायाचित्र दिशाभूल करणारे

Claim

सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत असा दावा केला जात आहे की,असहिष्णुतेवर बोलणारी आमिर खानची माजी पत्नी किरण राव घटस्फोटानंतर आता वांद्रे मध्ये एकटीच फिरत आहे.

व्हायरल दावा

Fact

2015 मध्ये रामनाथ गोएंका पुरस्कार सोहळ्यादरम्यान आयोजित केलेल्या चर्चेत इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका यांच्याशी संवाद साधताना अभिनेता आमिर खानने देशात भीती,असुरक्षितता आणि असहिष्णुतेचे वातावरण असल्याचे विधान केले. किरण आणि तो त्यांचे संपूर्ण आयुष्य भारतात जगत आहेत, पण पहिल्यांदाच आपण भारत सोडावा का?असे विचार मनात येत असल्याची प्रतिक्रिया आमिर खान याने दिली होती.आमिरच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.त्याच संदर्भाने,सोशल मीडिया वापरकर्ते विनोदी भावाने एक छायाचित्र शेअर करत असून,असहिष्णुतेबद्दल बोलणाऱ्या आमिर खानची माजी पत्नी किरण राव घटस्फोटानंतर आता वांद्रे येथे एकटीच फिरत असल्याचा दावा केला जात आहे. हा दावा ट्विटर आणि फेसबुकवरही मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.चित्र तपासण्यासाठी,आम्ही ते Google वर शोधले.या प्रक्रियेत,आम्हाला 27 सप्टेंबर 2019 रोजी बॉलीवूड तडका नावाच्या वेबसाइटने प्रकाशित केलेला एक लेख आढळला,ज्यात निर्माता किरण राव मेकअपशिवाय वांद्रे येथे फिरताना दिसत असल्याची माहिती देणारे व्हायरल चित्र आणि इतर अनेक तत्सम चित्रे शेअर केली होती.


Twitter Advanced Search वापरून,आम्हाला 22 सप्टेंबर 2019 रोजी पंजाब केसरीने शेअर केलेले ट्विट आढळले, ज्यामध्ये वरील लेख तसेच बॉलीवूड तडकाने प्रकाशित केलेली व्हायरल प्रतिमा उपलब्ध आहे.


त्यामुळे घटस्फोटानंतर न घाबरता एकटी फिरण्याच्या नावाखाली आमिर खानची माजी पत्नी किरण राव यांच्याबद्दल केलेला हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.व्हायरल चित्र 2019 पासून इंटरनेटवर उपस्थित आहे,तर आमिर खान आणि किरण राव यांचा 2021 मध्ये घटस्फोट झाला आहे.

Result: Missing Context

Our Sources

Article published by Bollywood Tadka on 22 September, 2019
Tweet shared by Punjab Kesari on 22 September, 2019

जर तुम्हाला ही वस्तुस्थिती तपासणी आवडली असेल आणि अशा आणखी तथ्य तपासण्या वाचायच्या असतील तर, येथे क्लिक करा.


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्तीसाठी किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल: checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular