Thursday, December 26, 2024
Thursday, December 26, 2024

HomeFact CheckFact Check: बिबट्या पुणे किंवा नागपूरला नाही तर कर्नाटकाच्या गदग मध्ये दिसला,...

Fact Check: बिबट्या पुणे किंवा नागपूरला नाही तर कर्नाटकाच्या गदग मध्ये दिसला, दिशाभूल करीत व्हिडीओ व्हायरल

Claim
बिबट्याचे दर्शन पुण्यातील भोसरीजवळ आणि नागपूर जवळील कोरडी जवळ झाले आहे.
Fact
हा दावा चुकीचा संदर्भ देऊन करण्यात आले आहे. हा बिबट्या गदग जिल्ह्यात दिसला आहे.

सध्या व्हाट्सअप वर बिबट्याचा एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. काही युजर्स हा बिबट्या पुण्याजवळील भोसरी येथे दिसला असे सांगत हा व्हिडीओ शेयर करीत आहेत. तर काही युजर्स हा व्हिडीओ नागपूर जवळच्या कोरडी येथे सापडला आहे. असे सांगत आहेत.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. हा व्हिडीओ नेमका पुणे येथील आहे की नागपूर येथील आहे? असा प्रश्न युजर्सनी विचारला आहे.

Fact Check: बिबट्या पुणे किंवा नागपूरला नाही तर कर्नाटकाच्या गदग मध्ये दिसला, दिशाभूल करीत व्हिडीओ व्हायरल

Fact check/ Verification

व्हिडीओ पडताळणीसाठी आम्ही हा व्हिडीओ बारकाईने पाहिला. व्हिडिओत एका महामार्गाशेजारी हा बिबट्या बसलेला दिसतो. एका कारमधून हा व्हिडीओ शूट करण्यात आलेला आहे. आजूबाजूने दबकत दबकत जाणाऱ्या वाहनांमध्ये आम्हाला एक बस दिसली. त्या बसचा क्रमांक पाहता ती बस कर्नाटक परिवहन महामंडळाची असल्याचे दिसून आले. दरम्यान बस जरी कर्नाटकाची असली तरी ती इतर राज्यातही गेलेली असू शकते ही शक्यता घेऊन आम्ही व्हिडीओ संदर्भात आणखी शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला.

व्हिडीओचे की फ्रेम्स काढून आम्ही त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला असता आम्हाला Times Now ने १७ एप्रिल २०२३ रोजी प्रसिद्ध केलेली एक बातमी मिळाली. या बातमीत आम्हाला व्हायरल व्हिडिओसोबतच त्यासंदर्भातील बातमी पाहायला मिळाली. “गदग जिल्ह्यातील बिनकडकट्टी गावाजवळ बिबट्याने महामार्गाजवळून जाणाऱ्या अनेक मोटारसायकलस्वारांना परत फिरायला लावले.” असे ही बातमी सांगते. यावरून बिबट्याच्या दिसण्याचा आणि त्या व्हिडिओचा काहीही संबंध महाराष्ट्रातील कोणत्याही शहराशी नसल्याचे स्पष्ट झाले. या व्हिडीओचे कर्नाटक कनेक्शन आम्हाला याठिकाणी पाहायला मिळाले आहे.

Fact Check: बिबट्या पुणे किंवा नागपूरला नाही तर कर्नाटकाच्या गदग मध्ये दिसला, दिशाभूल करीत व्हिडीओ व्हायरल
Screengrab of Times Now

रविवार दि १६ एप्रिल रोजी रात्री हा बिबट्या दिसल्याची स्पष्ट माहिती आम्हाला मिळाली. दरम्यान शोध घेत असताना आम्हाला इंडियन एक्सप्रेस ने १९ एप्रिल २०२३ रोजी प्रसिद्ध केलेले एक वृत्त आम्हाला पाहायला मिळले. यावरून हा बिबट्या गदग जिल्ह्यातच दिसल्याचा माहितीला पुष्टी मिळते.

Fact Check: बिबट्या पुणे किंवा नागपूरला नाही तर कर्नाटकाच्या गदग मध्ये दिसला, दिशाभूल करीत व्हिडीओ व्हायरल
Screengrab of Indian Express

“कर्नाटकाच्या गदग मध्ये दिसलेला बिबट्या हा गदग अभयारण्यातून आला अशी चर्चा सुरु झाली. याचा जिल्हा वनसंरक्षणाधिकारी दीपिका बाजपेयी यांनी इन्कार केला असून सदर बिबट्या हा अभयारण्यातून आला नसून आसपासच्या जंगलातून आला आहे. त्याचा शोध घेण्यासाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे.” असे ही बातमी सांगते.

व्हायरल व्हिडिओच्या माहितीवरून आम्ही गुगल अर्थ वरही शोध घेतला असता, आम्हाला बिबट्या बसलेले ठिकाण पाहायला मिळाले. यावरूनही ते गदग जिल्ह्यातीलच असल्याचे स्पष्ट झाले.

Fact Check: बिबट्या पुणे किंवा नागपूरला नाही तर कर्नाटकाच्या गदग मध्ये दिसला, दिशाभूल करीत व्हिडीओ व्हायरल
Screengrab of Google Earth

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात बिबट्या पुणे किंवा नागपूरला दिसलेला नसून तो कर्नाटकाच्या गदग जिल्ह्यात दिसला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: Partly False

Our Sources

News published by Times Now on April 17, 2023

News published by Indian Express on April 19, 2023

Google Earth Search Results


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

Most Popular