Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
कर्नाटकमधील सेडम येथे अलीकडेच झालेल्या आरएसएसच्या मार्चमध्ये मोठ्या संख्येने स्वयंसेवक सहभागी झाले होते.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ कर्नाटकातील सेडमचा नसून, तो महाराष्ट्रातील नागपूर येथे मे 2025 मध्ये झालेल्या आरएसएसच्या मार्चचा जुना व्हिडिओ आहे.
एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात येत आहे की कर्नाटकमधील सेडम येथे अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारूनही आरएसएस स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने मार्च केला.
तथापि, Newschecker च्या तपासात हा दावा चुकीचा असल्याचे आढळले.

व्हायरल व्हिडिओचे कीफ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्चद्वारे तपासल्यावर 25 मे 2025 रोजी PTI या वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेला एक पोस्ट आढळला. या पोस्टमध्ये याच व्हिडिओचा छोटा भाग देण्यात आलेला होता आणि कॅप्शन होते: “महाराष्ट्र: नागपूर येथील रेशीमबाग परिसरात आरएसएस स्वयंसेवकांनी मार्च केला.”

ANI नेही 25 मे 2025 रोजी याच visuals च्या आधारे नागपूर येथील आरएसएस मार्चविषयी माहिती दिली होती, ज्यामुळे व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचे पुष्टी होते.
Google Street View वापरून केलेल्या लोकेशन तपासात, व्हिडिओमध्ये दिसणारी स्थानिक चिन्हे आणि रस्ते नागपूरमधील काही भागांशी जुळले.

लक्षात घेण्यासारखे म्हणजे, कर्नाटकमधील सेडम येथे अलीकडेच आरएसएसकडून मार्च करण्यात आला होता. प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर मार्च काढल्यावरून काही स्वयंसेवकांना तात्पुरते ताब्यात घेण्यात आले होते. नंतर स्थानिक नागरिकांकडून पुष्पवृष्टीच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले असतानाच मार्च पुन्हा सुरू करण्यात आला. मात्र, व्हायरल होत असलेला व्हिडिओ या घटनेशी संबंधित नाही.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ कर्नाटकातील सेडम येथील अलीकडील आरएसएस मार्चचा नसून, तो महाराष्ट्रातील नागपूर येथे मे 2025 मध्ये झालेल्या जुन्या आरएसएस मार्चचा आहे.
१. व्हायरल व्हिडिओमध्ये नेमके काय दाखवले आहे?
हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नागपूर येथे मे 2025 मध्ये झालेल्या आरएसएस मार्चचा आहे.
२. सेडम येथे अलीकडे आरएसएस मार्च झाला होता का?
होय, सेडम येथे अलीकडे काही स्वयंसेवकांनी मार्च केला होता, पण व्हायरल व्हिडिओ त्या घटनेशी संबंधित नाही.
३. हा व्हिडिओ नागपूरचा असल्याचे कसे तपासण्यात आले?
रिव्हर्स इमेज सर्च, PTI आणि ANI यांच्या पोस्ट्स तसेच Google Street View मधील लोकेशन तुलना करून हे स्पष्ट करण्यात आले.
४. अशा चुकीच्या दाव्यांपासून कसे सावध राहावे?
कुठलाही व्हिडिओ किंवा दावा शेअर करण्याआधी विश्वसनीय न्यूज स्रोत किंवा फॅक्ट-चेक प्लॅटफॉर्मसह पडताळणी करावी.
Sources
X Post By PTI, Dated May 25, 2025
X Post By ANI, Dated May 25, 2025
Google Street View
Ishwarachandra B G
November 6, 2025
Prasad S Prabhu
October 25, 2025
Sabloo Thomas
October 24, 2025