Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkलोकसभेत भाषणावेळी नितीन गडकरींनी पंतप्रधानांसाठी टाळ्या वाजवणं टाळलं? हे आहे सत्य

लोकसभेत भाषणावेळी नितीन गडकरींनी पंतप्रधानांसाठी टाळ्या वाजवणं टाळलं? हे आहे सत्य

(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम प्रशांत शर्मा यांनी केले आहे.)

लोकसभेतील आभार प्रस्तावावर पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे टाळ्या वाजविणे टाळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकसभेतील पंतप्रधानांच्या भाषणातील 38-सेकंद लांबीच्या व्हिडिओमध्ये भाजपचे खासदार टाळ्या वाजवताना आणि टेबलावर हात बडविताना, पंतप्रधानांचे त्यांच्या वक्तव्याबद्दल जयजयकार करताना दिसतात, तर नितीन गडकरी हे टाळ्या न वाजवता आणि टेबलावर हात न बडविता शांत बसल्याचे दिसत आहेत.

अनेक युजर्स ज्यामध्ये व्हेरिफाईड हँडल्सधारकही आहेत. जे ट्विटर आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत आहेत. व्हिडिओ शेअर करणाऱ्यांमध्ये @Ahmedkhabeer हे हँडल आहे, ते व्हेरीफाईड युजर असून, ज्यानी “नितीन गडकरींनी मोदींच्या बनावट नाट्यावर टाळ्या वाजवल्या नाहीत” असे ट्विट केले आहे.

इतर अनेक युजर्सनी देखील ट्विटर आणि फेसबुकवर समान दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला आहे.

पोस्टचे संग्रहण येथे, येथे आणि येथे पाहिले जाऊ शकते.

Fact Check/ Verification

दाव्याचा तपास करण्यासाठी, आम्ही लोकसभेतील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान मोदींचे भाषण पाहिले. संसदेचे अधिकृत यूट्यूब चॅनल Sansad TV वर भाषणाची दीर्घ आवृत्ती उपलब्ध आहे.

आम्हाला पंतप्रधानांच्या भाषणाचा व्हायरल भाग 53:52 मिनिटांवर पाहायला मिळाला. YouTube व्हिडिओमध्ये पंतप्रधान असे म्हणताना ऐकू येतात “देशाचा माझ्यावर असलेला विश्वास हा माझ्या कठोर परिश्रमामुळे आणि वचनबद्धतेमुळे आहे आणि कोणत्याही माध्यमामुळे आणि पीआर मुळे नाही.”

लवकरच, 54:18 वर वाजता खंडपीठाचे सदस्य आणि संसदेचे इतर सदस्य पंतप्रधानांचा जयजयकार करताना दाखवण्यासाठी कॅमेरा पॅन करतो. नितीन गडकरी पंतप्रधान मोदींसाठी टाळ्या वाजवताना स्पष्टपणे दिसत आहेत.

पण 54:23 वर नितीन गडकरी टाळ्या वाजवणे थांबवितात. हे 10 सेकंद टिकते. 54:33 नंतर, नितीन गडकरी पुन्हा टाळ्या वाजवतात. त्याचवेळी कॅमेरा सदनातील इतर सदस्यांना पुन्हा दाखवण्यासाठी पॅन करतो.

या कालावधीत नितीन गडकरींच्या शेजारी बसलेले कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही टाळ्या वाजवणं थांबवलं आणि काही सेकंदांनंतर ते पुन्हा सुरू झाले. जसजसे ‘मोदी’ च्या जयघोषाला सुरुवात झाली, तसतसे गृहमंत्री अमित शहा देखील नितीन गडकरी पुन्हा टाळ्या वाजविणे सुरू होण्यापूर्वी 54:32 पूर्वी थांबले आणि त्यांनी पुन्हा टाळ्या वाजविण्यास प्रारंभ केला होता.

यावरून हे सिद्ध होते की नितीन गडकरी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत टाळ्या वाजवत होते आणि त्यांनी थोड्या विरामानंतर पुन्हा टाळ्या वाजवल्या.

व्हायरल व्हिडिओशी YouTube व्हिडिओची तुलना करताना, आमच्या लक्षात आले की, विशिष्ट भाग, जिथे नितीन गडकरी टाळ्या वाजवताना दिसत नाहीत, तो संपादित केला आहे. गडकरी ज्या भागात थोडक्‍यात थांबताना दिसतात तो भाग 00:32 वर लूप केला जातो, आणि नितीन गडकरी यांनी पंतप्रधानांचा जयजयकार करणे टाळले आहे, असा समज निर्माण करतो.

Conclusion

अशा प्रकारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की लोकसभेतील भाषणादरम्यान नितीन गडकरी पंतप्रधानांना उद्देशून टाळ्या वाजवण्यापासून किंवा बाकावर हात वाजवण्यापासून टाळाटाळ करतानाचा व्हायरल व्हिडिओ सोयीस्कर बदलला गेला आहे.

Result: Altered media

Our Sources

Video Posted by Sansad TV, Dated 8 Feb 2023


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular