Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
२५ सप्टेंबर २०२५ रोजी राजस्थानातील बांसवाडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान लोकांची मोठी गर्दी जमलेली दिसत आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ बांसवाडा रॅलीशी संबंधित नाही. तो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पेडगाव येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीचा आहे.
राजस्थानमधील पंतप्रधान मोदींच्या रॅलीत मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते असे सांगत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
२५ सप्टेंबर २०२५ रोजी राजस्थानातील बांसवाडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १,२२,१०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले आणि जनतेला संबोधित केले.
त्यानंतर लगेचच, सोशल मीडियावर मोठ्या गर्दीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये असा दावा करण्यात आला की त्यात पंतप्रधानांच्या रॅलीला उपस्थित राहण्यासाठी लोकांची गर्दी दिसत आहे. न्यूजचेकरने तपास केला आणि हा दावा खोटा असल्याचे आढळून आले.



व्हायरल होणाऱ्या गर्दीचा व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या बांसवाडा रॅलीचा नाही. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील पेडगाव येथील बैलगाडा शर्यतीचा आहे.
प्रश्न १. पंतप्रधान मोदींनी २५ सप्टेंबर २०२५ रोजी बांसवाडा येथे सभा घेतली होती का?
हो. त्यांनी १,२२,१०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि बांसवाडा येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित केले.
प्रश्न २. हा त्या सभेतील व्हायरल गर्दीचा व्हिडिओ आहे का?
नाही. ही क्लिप महाराष्ट्रातील पेडगाव येथील बैलगाडा शर्यतीतील आहे.
प्रश्न ३. व्हिडिओची पडताळणी कशी झाली?
रिव्हर्स इमेज सर्च, सुरुवातीचे सोशल मीडिया अपलोड आणि गुगल मॅप्स लोकेशन मॅचमुळे खऱ्या स्रोताची पुष्टी झाली.
प्रश्न ४. हा व्हिडिओ इतर खोट्या दाव्यांमध्ये वापरला गेला आहे का?
हो. बिहारमधील एका राजकीय कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते असा दावा करण्यासाठी यापूर्वी याचा गैरवापर करण्यात आला होता.
Sources
Instagram Post By @all_about_phaltan, Dated June 22, 2025
Google Maps
Telephonic Conversation With Organiser Of Event In Pedgaon
Vasudha Beri
November 21, 2025
Vasudha Beri
November 19, 2025
Vasudha Beri
October 24, 2025