महाराष्ट्र सरकारने एकट्या महिलांसाठी मोफत वाहनाची सुविधा सुरु केली असल्याचा मॅसेज सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, यात महिलांना मदतीसाठी एक हेल्पलाईन नंबर देखील शेअर करण्यात आला आहे.
मॅसेजमध्ये काय म्हटले आहे?
महाराष्ट्र पोलिसांनी एकट्या महिलासांठी सुरक्षेच्या दृष्टीने मोफत प्रवासाची योजना सुरू केली आहे . एकटी महिला रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत घरी जाण्यासाठी जर वाहन शोधू शकत नसेल तर ती पोलिस हेल्पलाइन नबर (1091 आणि 7837018555) या नंबरवर काॅल करु शकते। ही हेल्पलाइन 24×7 काम करेल. नियंत्रण कक्षातील वाहन किंवा जवळील पीसीआर वाहन किंवा एसएचओ वाहन त्या महिलेला सुरक्षितपणे तिला तिच्या ठिकाणी पोहचवेल. ही सेवा निशुल्क आहे. हा संदेश सगळ्यांना पाठवा, कृपया नंबर सेव्ह करा.

हा मॅसेज व्हाटसअॅप वर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Fact Check / Verification
महाराष्ट्र पोलिसांनी असा हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे का याबाबत आम्ही पडताळणी करण्याचे ठरविले. शोध सुरु केला असता आम्हाला या हेल्पलाईन नंबर विषयीच्या मागील वर्षीच्या ब-याच पोस्ट आढळून आल्या.

अधिक शोध घेतला असता दी ट्रिब्युन या इंग्रजी वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर मागील वर्षीची बातमी आढळून आली. बातमी म्हटले आहे- लुधियाना पोलिसांनी महिलांसाठी हेल्पलाईन नंबरची सेवा सुरू केली आहे महिला या हेल्पलाइनवर काॅल करुन वाहनाने घरापर्यंत सोडण्याची विनंती करु शकतात. बातमीत पुढे लिहिले आहे कि पोलिस आयुक्त राकेश अग्रवाल यांनी म्हटले कि आम्ही लुधियानात महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सुरक्षितता निश्चित करण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरु केले आहेत. आमच्याकडे महिलांसाठी दोन हेल्पलाईन नंबर आहेत आणि हे 24X7 सुरु आहेत. लुधियानात मोफत प्रवासासाठी महिला हा नंबर डायल करु शकतात.
याशिवाय एनडीटीव्हीची देखील बातमी आढळून आली ज्यात लुधियाना पोलिसांनी रात्री एकट्या महिलांना घरी सुरक्षितपणे पोहचण्यासाठी वाहनाची मोफत सुविधा सुरु केल्याचे म्हटले आहे.
पंजाब पोलिसांनी लुधियानात सुरु असलेल्या या सुविधेला मिळत असलेल्या प्रंचड प्रतिसादाबद्दल एक ट्विट देखील केले होते.
यावरुन स्पष्ट झाले की हा नंबर महाराष्ट्र पोलिसांचा नाही तर लुधियाना पोलिसांनी महिला सुरक्षेसाठी सुरु केलेला हेल्पलाईन नंबर आहे. यानंतर आम्ही 1901 या नंबरची पडताळणी केली असता हा नंबर राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाईनचा असल्याचे आढळून आले.
यानंतर आम्ही महाराष्ट्र पोलिसांनी महिलासांठी महिला सुरक्षेसाठी हेल्पलाईन नंबरची सेवा सुरु केली आहे की नाही याची शोध सुरु ठेवला असता एएनआयची मागील वर्षीची बातमी मिळाली. या बातमीत नागपुर पोलिसांनी अशी सेवा सुरु केल्याची महिती मिळाली. याशिवाय नागपुर पोलिसांचे ट्विट देखील मिळाले.
या ट्विटमध्ये महिला आयोगाच्या हेल्पलाईनचा नंबर 1091 हा देखील शेअर करण्यात आला आहे मात्र मोबाईल नंबर वेगळा आहे. शिवाय आम्हाला महाराष्ट्र पोलिसांचे देखील एक ट्विट आढळून आले यात म्हटले आहे कि 100 हा नंबर डायल करुन कुणीही केव्हाही मंदत मागू शकते हे सगळ्यांसाठी आहे.
Conclusion
यावरुवन हेच स्पष्ट होते की लुधियाना पोलिसांचा हेल्पलाईन नंबर महाराष्ट्र पोलिसांच्या नावाने शेअर होतोय. महाराष्ट्र पोलिसांनी 100 नंबर शिवाय कोणताही नवा नंबर सुरु केलेला नाही.
Result- Misleading
Our Sources
tribuneindia- https://www.tribuneindia.com/news/archive/ludhiana/now-free-ride-to-home-for-women-stuck-in-869017
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.