Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी शुभम सिंग यांनी केले आहे.)
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती पूजाअर्चा करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतरचा फोटो असे सांगत हा फोटो शेअर केला जात आहे.
महत्वाचे म्हणजे ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरसह देशातील अनेक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला होता.
व्हायरल चित्र वर्तमानपत्राच्या कटिंगला जोडलेले आहे. “श्रीनगरच्या गंदरबल येथील खीर भवानी मंदिरात सुरू असलेल्या वार्षिक जत्रेत रविवारी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती काश्मिरी हिंदूंसोबत प्रार्थना करताना” असे कॅप्शनमध्ये म्हटलेले आहे.
त्याची मदत घेऊन आम्ही ‘मेहबूबा मुफ्ती गंदरबल खीर भवानी’ या कीवर्डसह गुगलवर सर्च केले. ‘अमर उजाला’च्या वेबसाईटवर 2016 मध्ये प्रकाशित झालेला रिपोर्ट आम्हाला सापडला. रिपोर्टनुसार, हे चित्र जून 2016 चे आहे. त्यावेळी जम्मू-काश्मीरच्या तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या मुफ्ती काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यात असलेल्या खीर भवानी मंदिरात गेल्या होत्या.
तसेच, आम्ही काही कीवर्डच्या मदतीने यासंदर्भात YouTube वर शोधले. आम्हाला जून 2016 मध्ये ‘द क्विंट’च्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडिओ सापडला. त्यात व्हायरल चित्रही आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या खीर भवानी यात्रेच्या निमित्ताने काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील प्रसिद्ध खीर भवानी मंदिरात हजारो काश्मिरी पंडितांनी प्रार्थना केल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. यादरम्यान जम्मू-काश्मीरच्या तत्कालीन मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही मंदिराला भेट दिली होती.
विशेष म्हणजे 2016 मध्ये मेहबुबा मुफ्ती यांनी भाजप आणि पीडीपीच्या युती सरकारमध्ये जम्मू-काश्मीर राज्याची सत्ता हाती घेतली होती. यानंतर 2018 मध्ये भाजपने पीडीपीसोबतची युती तोडल्यानंतर राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केला. तेथील पोलीस आणि प्रशासन यंत्रणा केंद्र सरकारच्या ताब्यात आहे.
त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा सुमारे ७ वर्षे जुना फोटो दिशाभूल करणारा दावा करून शेअर केला जात असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Report Published by AMAR UJALA in June 2016
Youtube Video uploaded by ‘The Quint‘ in June 2016
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in