Authors
Claim
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “गरिबांना फक्त स्वप्ने दाखवा, खोटे बोला, आपापसात लढवा आणि राज्य करा.”
Fact
हा दावा दिशाभूल करणारा आहे. मोदी काँग्रेसची खिल्ली उडवीत होते. ज्याला दिशाभूल करीत व्हायरल करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पंतप्रधान म्हणत आहेत, “गरिबांना फक्त स्वप्ने दाखवा, खोटे बोला. आपापसात लढवा आणि राज्य करा.” हे शेअर करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हेच काम असल्याचे सांगितले जात आहे.
Fact Check/ Verification
दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही इनव्हिड टूल्सच्या मदतीने व्हायरल व्हिडिओचे काही मुख्य फ्रेम्स कॅप्चर केले. कीफ्रेम चा रिव्हर्स इमेज शोध घेतला. आम्हाला ANI च्या YouTube चॅनलवर दोन वर्षांपूर्वी अपलोड केलेला व्हिडिओ सापडला. त्यामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओचा काही भाग पाहता येतो. व्हिडिओसह दिलेल्या माहितीनुसार, आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पीएम मोदींनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर जोरदार हल्ला चढवला होता.
व्हिडिओमध्ये पीएम मोदी एक मिनिट 35 सेकंदावर बोलताना दिसत आहेत, “आसामच्या लोकांना त्यांच्या (काँग्रेस) प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. खोटी आश्वासने, खोटे जाहीरनामे करण्याची सवय या लोकांना लागली आहे. गरिबांना फक्त स्वप्न दाखवा, खोटे बोला. एकमेकांशी लढवा आणि राज्य करा, हे काँग्रेसचे नेहमीच सत्तेत राहण्याचे सूत्र राहिले आहे.”
याशिवाय, दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा व्हिडिओही आम्हाला आढळला. यामध्ये 35 मिनिटानंतर पीएम मोदींचा काँग्रेसवरचा टोमणा ऐकता येईल.
Conclusion
अशा प्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की पीएम मोदींचा दोन वर्षे जुना व्हिडिओ दिशाभूल करणारा दावा करून शेअर करण्यात येत आहे.
Result: Missing Context
Our Sources
Video Uploaded by ANI in 2021
Video Uploaded by Bhartiya Janta Party in 2021
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी शुभम सिंग यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in