Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
महावितरणने नवीन प्रीपेड वीज मीटर लाॅंच केला असल्याच्या दाव्याने सोशल मीडियात एक मीटरचा फोटो व्हायरल होत आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यात लवकरच प्रीपेड मीटर महावितरण ग्राहकांना देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांतच सोशल मीडियावर प्रीपेड मीटरचा फोटो व्हायरल झाला आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, नवीन महावितरण प्रीप्रेड मीटर .. मोबाईल सिम कार्ड सारखे आहे ..बँलेन्स जेवढा मारनार तेवढीच लाईट मिळनार बँलेन्स संपला तर लाईट बंद होनार लवकरच येतोय आपल्या दारी.
हा फोटो फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
महावितरण ने वीज ग्राहकांसाठी खरंच नवीन प्रीपेड मीटर लाॅंच केले आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. गूगल सर्च मध्ये काही कीवर्ड्सच्या शोध घेतला असता न्यूज 18 लोकमतची 14 आॅगस्टची बातमी आढळून आली ज्यात म्हटले आहे की,
आपल्या देशात असंख्य लोक असे आहेत, जे नियमितपणे वीजबिल (Electric Bill) भरत नाहीत. त्यामुळे देशातल्या वीजपुरवठा कंपन्यांवरचा (डिस्कॉम्स) आर्थिक बोजा वाढत असून, त्या डबघाईला आल्या आहेत. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सरकारने संपूर्ण देशात प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या देशातल्या काही निवडक शहरांमध्ये असे मीटर्स बसवण्यात आले असून, आता संपूर्ण देशातच ही प्रीपेड स्मार्ट मीटरची प्रणाली लागू करण्याची तयारी केली जात आहे. प्रीपेड मीटर प्रीपेड मोबाइलप्रमाणेच काम करतो. म्हणजे जितके पैसे तितकी वीज मिळणार. मोबाइलप्रमाणे त्याचंही रिचार्ज करणं आवश्यक आहे. सरकारच्या या पावलामुळे वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. तसंच ग्राहकांनाही बिल भरणं सोपं होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पण या बातमीत नवीन स्मार्ट प्रीपेड मीटरचा फोटो आढळून आला नाही त्यामुळे आम्ही शोध पुढे सुरुच ठेवला असता आम्हाला एबीपी माझाची 20जुलै 2021 रोजीची बातमी आढळून आली यात म्हटले आहे की,घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडींग बाबतच्या विविध तक्रारींवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला आहे. घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या महानगरात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले आहेत.
स्मार्ट मीटर योजनेबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी याबाबत आज निर्देश दिले. राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या निर्देशानुसार दुरुस्ती करण्याच्या सूचनाही डॉ. राऊत यांनी दिल्या.
आम्हाला या दोन्ही बातम्यामध्ये व्हायरल मीटरचा फोटो आढळून आला नाही. यानंतर आम्ही महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी सांगितले की, महावितरण ने कडून ग्राहकांना प्रीपेड मीटर देण्याची घोषणा झाली असली तरी ती योजना कधीपासून सुरु होईल हे निश्चित सांगता येत नाही. तसेच सोशल मीडियात व्हायरल होत असलेला फोटोमधील मीटर महावितरणने लाॅंच केलेला नाही.
व्हायरल फोटो गूगल इमेज रिव्हर्सच्या साहाय्याने शोधला असता हा फोटो एका camerounweb नावाच्या वेबसाईटवरील एका लेखात आढळून आला. हा लेख 18 फेब्रुवारी 2016 रोजी प्रसिद्ध झाला आहे. मात्र हा फोटो जुना असल्याचे म्हटले आहे.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, सोशल मीडियात व्हायरल होत असलेला वीज मीटरचा फोटो महावितरणच्या नवीन स्मार्ट प्रीपेड मीटरचा नाही तर खूप वर्षे आधीचा आहे. महावितरण ने नवीन प्रीपेड मीटर लाॅॅंच केलेला नाही.
न्यूज 18 लोकमत https://lokmat.news18.com/auto-and-tech/prepaid-electricity-smart-meter-in-india-gh-591942.html
camerounweb – https://www.camerounweb.com/CameroonHomePage/NewsArchive/Electricit-Qui-sont-les-dirigeants-de-la-de-la-SONATREL-358677
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा