Authors
Claim
महाराष्ट्रात कामामुळे बुधवार दि. २१ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत वीजपुरवठा बंद राहणार असे महावितरण ने कळविले आहे.
हा मेसेज व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे.
Fact
कामानिमित्त वीजपुरवठा खंडित ठेवायचा झाल्यास महावितरण किमान आठवडाभर आधी त्याची पूर्वकल्पना आपल्या ग्राहकांना देते. मात्र तसे न आढळल्याने आम्ही महावितरण ची अधिकृत वेबसाईट धुंडाळून पाहिली. मात्र आम्हाला तसे काहीच आढळले नाही.
महावितरण कोणतीही सूचना एसएमएस च्या माध्यमातून देत नाही. त्यामुळे अशा मेसेजपासून सावध राहा. असे आवाहन त्याठिकाणी वाचायला मिळाले.
‘बुधवार दि. २१ जून महावितरण वीजपुरवठा खंडित’ या किवर्ड सर्चच्या माध्यमातून आम्ही गुगल वर शोध घेतला. मात्र याबद्दलच्या कोणत्याही बातम्या आम्हाला पाहायला मिळाल्या नाहीत.
आम्ही महावितरण च्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी “सदरील संदेश महावितरणकडून अधिकृतपणे प्रसारित करण्यात आला नाही. संदेशातील मजकुरावर विश्वास ठेवू नये.” अशी माहिती आम्हाला दिली. तसेच याबद्दलचे एक प्रसिद्धिपत्रकही दिले.
यावरून सदर संदेश खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
Official Website of MAHAVITARAN
Google Search Results
Self Analysis
Conversation with PRO of MAHAVITARAN
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in