Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
करमाळा- माढा मतदार संघाचे आमदार व राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांचा कार पेटून मृत्यू झाल्याची बातमी इंडिया टिव्ही या हिंदी न्यूज चॅनलने प्रसिद्ध केली आहे. बातमीत रस्त्याच्या कडेला पेट घेतलेल्या कारचा व्हिडिओ तसेच आमदार संजय शिंदे यांचा फोटो देखील दाखवण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय शिंदे यांचा कार लागलेल्या आगीत मृत्यू झाला. संजय शिंदे कारने मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ त्यांच्या कारमध्ये शॉर्टसर्किट झाले व आग लागली असे सांगितले जात आहे.
आम्ही इंडिया टिव्हीच्या बातमीची शहानिशा करण्याकरिता गूगलमध्ये यासंदर्भात इतर माध्यमांनी दिलेल्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान आम्हाला न्यूज बाईट या वेबसाईटवर एक बातमी आढळून आली. ज्यात नाशिकमधील राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांचा कारने पेट घेतल्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मात्र यात इंडिया टिव्हीच्या व्हिडिओत दिसणा-या कारसारखीच ही कार असल्याचे मात्र फोटो मात्र दुस-याच व्यक्तीचा असल्याचे आढळून आले.
इंडिया टुडेने देखील ही बातमी प्रसिद्ध केली आहे मात्र यातही न्यूज बाईटने प्रसिद्ध केलेला फोटो शेअर कऱण्यात आला आहे.
अधिक शोध घेतला असता आम्हाला दैनिक सकाळच्या वेबसाईटवर 13 आॅक्टोबर 20202 रोजी प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, मुंबई आग्रा महामार्गावर कारमध्ये शाॅर्टसर्किट झाले त्यात सॅनिटायझरने पेट घेतला यातच राष्ट्रवादीचे नेते संजय चंद्रभान शिंदे यांचा मृत्यू झाला.
यानंतर आम्ही करमाळा-माढा मतदारसंघाचे आमदार संजय विठ्ठल शिंदे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता कार्यालयाकडून निवेदन जाहिर करण्यात आले आहे.
India TV न्यूज चॅनेलच्या माध्यमातून संजय शिंदे यांचा अपघात झाल्याची बातमी दाखवली जात आहे… करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या गाडीचा अपघात झालेला नसून ते त्यांच्या निमगाव या गावी सुखरूप आहेत… टीव्ही चॅनलच्या माध्यमातून चुकीची बातमी दाखवली जात आहे व सोशल मीडियावर ही त्याच्या पोस्ट फिरत आहेत…. सदर बातमी वरती विश्वास न ठेवता कोणीही चुकीच्या अफवा पसरवू नये असे आ. संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय करमाळा यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे…
यावरुन हेच सिद्ध होते की कार जळाल्याने तीन दिवसांपूर्वी नाशिकमधील राष्ट्रवादीचे नेते संजय चंद्रभान शिंदे यांचा मृत्यू झाला आहे, मात्र इंडिया टिव्हीने करमाळ्याचे आमदार संजय विठ्ठलराव शिंदे यांचा फोटो प्रसिद्ध केला.
Prasad S Prabhu
October 19, 2024
Vasudha Beri
May 27, 2024
Saurabh Pandey
March 22, 2024