Thursday, August 18, 2022
Thursday, August 18, 2022

घरFact Checkशरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट झाल्याची बातमी खरी आहे?...

शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट झाल्याची बातमी खरी आहे? याचे सत्य जाणून घ्या

अनेक वृत्तमाध्यममांनी अशी बातमी दिली की, महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो देखील बातमीसोबत जोडला आहे. 

लोकसत्ता, लोकमत, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, तरुण भारत, दैनिक प्रभात, थोडक्यात, महाराष्ट्र केसरी, माय महानगर, सोलापूर वार्ता, अहमदनगर लाईव्ह २४, ग्लोबल न्यूज मराठी, हॅलो महाराष्ट्र यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट झाल्याची बातमी दिली आहे. 

३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर ४ जुलै २०२२ रोजीच्या अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यातच आता काही वृत्तमाध्यमांनी बातम्या दिल्या की, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची मुंबईतल्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट झाली.

Fact Check / Verification

शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याची बातमी खरी आहे का, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगलवर ‘एकनाथ शिंदे आणि शरद पवार भेट’ असं टाकून शोधले. पण आम्हांला कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर आम्ही त्या बातमीसोबत जोडलेला फोटो गुगल रिव्हर्सच्या मदतीने शोधला. त्यावेळी आम्हांला सरकारनामाची ११ नोव्हेंबर २०२१ ची बातमी मिळाली. त्यात देखील नुकताच अनेक बातम्यांमध्ये वापरण्यात आलेला फोटो वापरला होता. 

फोटो साभार : Sarkarnama

त्यानंतर आम्ही हा फोटो ट्विटर शोधला. त्यावेळी आम्हांला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत ट्विटर खात्यावरील एक पोस्ट मिळाली. ११ नोव्हेंबर २०२१ च्या त्या ट्विटमध्ये त्या फोटोसहित लिहिले होते,”राज्याचे नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज आदरणीय खा. शरद पवार साहेबांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.”

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.

या व्यतिरिक्त आम्हांला दोन तासांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत ट्विटरवर या संदर्भातील एक पोस्ट मिळाली. त्या ट्विटमध्ये लिहिले होते,”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये..”

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.

त्याचबरोबर आम्हाला महाराष्ट्र टाइम्स यांची आजची प्रकाशित झालेली बातमी मिळाली. त्यात देखील ही बातमी चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. 

फोटो साभार : Maharashtra Times

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची सध्या कोणतीही भेट झालेली नाही. अनेक वृत्तमाध्यमांनी भेटीची दिलेली बातमी चुकीची आहे. तसेच बातम्यांसोबत जोडलेला फोटो आताचा नसून ११ नोव्हेंबर २०२१ रोजीचा आहे. 

Result : False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular