एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे पाहायला मिळाले. संजय निरुपम यांनी एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटले, असा दावा करण्यात आला. भूकंपाच्या वेळी म्यानमारमधील रुग्णालयात रुग्णाला सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ, असा दावा करण्यात आला. एक व्हिडीओ शेयर करीत राणा सांगा वादामुळे झालेल्या निदर्शनाचे दृश्य असा दावा करण्यात आला. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडल्यानंतर रडत होते, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

संजय निरुपम यांनी एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटले?
संजय निरुपम यांनी एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

भूकंपाच्या वेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णाला सांभाळल्याचा व्हिडिओ म्यानमारमधील नाही
भूकंपाच्या वेळी म्यानमारमधील रुग्णालयात रुग्णाला सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा अंशतः खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

हे आंदोलन राणा सांगा आंदोलनाशी संबंधीत नाही
एक व्हिडीओ शेयर करीत राणा सांगा वादामुळे झालेल्या निदर्शनाचे दृश्य असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

संसदेत असदुद्दीन ओवैसी रडले?
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडल्यानंतर रडत होते, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.