Wednesday, December 25, 2024
Wednesday, December 25, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: जवाहरलाल नेहरू यांना 1962 मध्ये स्वामी विद्यानंद विदेह यांनी जाहीरपणे...

फॅक्ट चेक: जवाहरलाल नेहरू यांना 1962 मध्ये स्वामी विद्यानंद विदेह यांनी जाहीरपणे थप्पड मारली होती? व्हायरल दावा खोटा आहे

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
जवाहरलाल नेहरू यांना 1962 मध्ये स्वामी विद्यानंद विदेह यांनी जाहीरपणे थप्पड मारली होती.
Fact

पाटणा येथे 1962 मध्ये काँग्रेस पक्षाच्या बैठकीदरम्यान अचानक घुसलेल्या आंदोलकांपासून बचाव सुरु असतानाचे जवाहरलाल नेहरू यांचे चित्र खोटा दावा करून व्हायरल केले जात आहे.

जवाहरलाल नेहरू यांना 1962 मध्ये स्वामी विद्यानंद विदेह यांनी जाहीरपणे थप्पड मारली होती, असा दावा करीत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे एक चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. फेसबुकवर हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

फॅक्ट चेक: जवाहरलाल नेहरू यांना 1962 मध्ये स्वामी विद्यानंद विदेह यांनी जाहीरपणे थप्पड मारली होती? व्हायरल दावा खोटा आहे
Courtesy: FB/ गणेश अरुण भुतकर

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.

व्हायरल छायाचित्रासोबत पुढील कॅप्शन लिहिलेली आहे. एकदा स्वामी विद्यानंद विदेह यांनी नेहरू यांच्या कानशिलात जोरदार लगावली होती. कारण… नेहरू यांनी एका समारंभात त्यांच्या भाषणात म्हटले होते की, “हिंदू लोक भारतात निर्वासित (शरणार्थी) आहेत.” हे ऐकून, समारंभाचे मुख्य पाहुणे स्वामी विद्यानंद विदेहजी उभे राहिले आणि व्यासपीठावरच नेहरू यांच्या जोरदार कानशिलात मारली. व त्यांच्या जवळचा माईक काढून घेत म्हणाले, “आर्य हिंदू” लोक निर्वासित नसून, ते आमचे पूर्वज आहेत आणि या देशाचे मूळ रहिवासी आहेत. “तुमचे स्वतःचे पूर्वज ‘अरबी’ आहेत, आणि तुमच्या शरीरात ‘अरबी’ रक्त वाहत आहे. तुम्ही या महान देशाचे मूळ रहिवासी नाहीत.. खर पहायला गेलो तर आमच्या देशात तुम्ही शरणार्थी आहात.” तसेच स्वामी विद्यानंद विदेहजी यांनी खंत व्यक्त करुण पूढे अस ही म्हटले की, “जर सरदार वल्लभभाई पटेल या देशाचे पंतप्रधान असते, तर आपल्याला हे सगळे पाहावे लागले नसते.” या सर्व घडामोडी नंतर व्यासपीठावर एकच गोंधळ उडाला होता.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

फॅक्ट चेक: जवाहरलाल नेहरू यांना 1962 मध्ये स्वामी विद्यानंद विदेह यांनी जाहीरपणे थप्पड मारली होती? व्हायरल दावा खोटा आहे

Fact Check/ Verification

व्हायरल इमेजवर तिची सत्यता तपासण्यासाठी Google रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर, न्यूजचेकरला आढळले की तीच इमेज असोसिएटेड प्रेस वेबसाइटवर 06 जानेवारी 1997 रोजी सबमिट केलेली आहे.

फॅक्ट चेक: जवाहरलाल नेहरू यांना 1962 मध्ये स्वामी विद्यानंद विदेह यांनी जाहीरपणे थप्पड मारली होती? व्हायरल दावा खोटा आहे

इमेजचा डिस्क्रिप्शनमध्ये असे लिहिले आहे की “भारताच्या पटना, जानेवारी 1962 मध्ये काँग्रेस पक्षाच्या बैठकीत एका सुरक्षा रक्षकाने भारतीय पंतप्रधान नेहरूंना दंगलखोर गर्दीत अडकण्यापासून रोखले. वर्षाच्या उत्तरार्धात, कम्युनिस्ट चीनचा भारतावर हल्ला झाला. नेहरू नव्या संकटात सापडले आहेत.”

कीवर्ड शोध केल्यावर, न्यूजचेकरला गुगल न्यूज आर्काइव्हवर 8 जानेवारी 1962 च्या टाइम्स डेलीचे संग्रहण सापडले. हीच प्रतिमा वृत्तपत्रात या मथळ्यासह छापण्यात आली होती “सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना शुक्रवारी, भारताच्या पाटणा येथे बेशिस्त गर्दीत घुसण्यापासून रोखले. भारतीय शेतकऱ्यांनी केलेल्या जंगली निदर्शनाने नेहरूंच्या काँग्रेस पक्षाची ही सभा मोडून काढली आणि 24 जणांना रुग्णालयात पाठवावे लागले.”

फॅक्ट चेक: जवाहरलाल नेहरू यांना 1962 मध्ये स्वामी विद्यानंद विदेह यांनी जाहीरपणे थप्पड मारली होती? व्हायरल दावा खोटा आहे

स्वामी विद्यानंद विदेह यांच्या संदर्भातील गुगल सर्चमध्ये ते ‘वेद-संस्थान’ नावाच्या कंपनीचे संस्थापक असल्याचे समोर आले. वेद-संस्थानच्या वेबसाइटनुसार, स्वामी विद्यानंद विदेह हे ‘वेदांचे प्रख्यात विद्वान’ आणि योग जीवन शैलीचे उपदेशक होते. जवाहरलाल नेहरूंना जाहीर सभेत त्यांनी थप्पड मारल्याचा उल्लेख किंवा पुरावा नाही.

फॅक्ट चेक: जवाहरलाल नेहरू यांना 1962 मध्ये स्वामी विद्यानंद विदेह यांनी जाहीरपणे थप्पड मारली होती? व्हायरल दावा खोटा आहे

Conclusion

अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वामी विद्यानंद विदेह यांनी जाहीरपणे थप्पड मारली होती हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाटणा येथे 1962 मध्ये काँग्रेस पक्षाच्या बैठकीदरम्यान अचानक घुसलेल्या आंदोलकांपासून बचाव सुरु असतानाचे जवाहरलाल नेहरू यांचे चित्र खोटा दावा करून व्हायरल केले जात आहे.

Result: False

Our Sources

Photo published by Associated Press
Information published by Ved Sansthan website
News published by Times Daily on Google News Archive

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular