Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
नेदरलँड सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) 100 वर्षपूर्तीनिमित्त अधिकृत स्मरणिक पोस्टेज स्टॅम्प जारी केला आहे.
हा दावा चुकीचा आहे. नेदरलँड सरकार किंवा नेदरलँडची अधिकृत पोस्टल सेवा PostNL यांनी RSS साठी कोणताही अधिकृत स्मरणिक स्टॅम्प जारी केलेला नाही. सदर स्टॅम्प हा Hindu Swayamsevak Sangh नेदरलँड यांनी PostNL च्या “Personalised Stamp” सुविधेचा वापर करून तयार केलेला खाजगी स्मरणिक स्टॅम्प आहे.
सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की नेदरलँड सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त अधिकृत स्मरणिक पोस्टेज स्टॅम्प जारी केला आहे.
X आणि फेसबुकवर आम्हाला हा दावा आढळला. विशेष म्हणजे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या अधिकृत खात्यांवरून हा दावा शेयर केला आहे.

दाव्याचे संग्रहण येथे आणि येथे पाहता येईल.
सोशल मीडियावर आलेल्या या दाव्याची पडताळणी करण्यासाठी न्यूजचेकरने सर्वप्रथम “नेदरलँड सरकारने RSS साठी पोस्टेज स्टॅम्प जारी केला” या संदर्भात नेदरलँड सरकार किंवा नेदरलँडची अधिकृत पोस्टल सेवा PostNL यांच्या अधिकृत घोषणेचा शोध घेतला. तथापि, आमच्या तपासात ना नेदरलँड सरकारकडून अशी घोषणा आढळली, ना PostNL कडून अधिकृत स्मरणिक स्टॅम्प जारी झाल्याचा कोणताही उल्लेख सापडला.
यानंतर पुढील तपासात आम्हाला 10 ऑक्टोबर 2025 रोजी Organiser.org वर प्रकाशित बातमी आढळली. या वृत्तानुसार, Hindu Swayamsevak Sangh नेदरलँड (HSS नेदरलँड) यांनी RSS च्या 100 वर्षपूर्तीनिमित्त 9 ऑक्टोबर 2025 रोजी World Post Day निमित्ताने एक “विशेष स्टॅम्प” सादर केला. या बातमीत स्पष्टपणे नमूद आहे की हा स्टॅम्प PostNL च्या कस्टम ऑर्डर प्रणालीद्वारे तयार करण्यात आला आहे आणि तो नेदरलँड सरकारकडून अधिकृतपणे जारी केलेला नाही.

पुढील तपासणीत आम्ही PostNL (नेदरलँडची अधिकृत पोस्टल सेवा) यांची अधिकृत वेबसाइट तपासली. येथे आम्हाला “Personalised Stamps” ही सुविधा आढळली, ज्याद्वारे कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा गट स्वतःच्या डिझाइनसह कस्टम स्टॅम्प तयार करून वापरासाठी देऊ शकतो. यासाठी संबंधित वेबसाईटच्या “Personalised Stamps” या विभागात जाऊन आपल्याला आवश्यक ते शुल्क भरून पोस्टल स्टॅम्प बनविता येतो.

Create Now वर क्लिक करून त्यात आवश्यक फोटो अपलोड केल्यास आणि पेमेंट प्रोसेस केल्यास आपल्याला हवा तसा स्टॅम्प मिळतो, अशी माहिती आम्हाला मिळाली.


आमच्या तपासणीतून हे स्पष्ट झाले की, नेदरलँड सरकारने RSS च्या 100 वर्षपूर्तीनिमित्त अधिकृत स्मरणिक स्टॅम्प जारी केलेला नाही. व्हायरल होत असलेला स्टॅम्प हा HSS नेदरलँड या संस्थेने PostNL च्या Personalised Stamp सुविधेचा वापर करून तयार केलेला खाजगी स्टॅम्प आहे. म्हणून सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणारा आणि चुकीचा आहे.
Our Sources
Google Search
Article published by Organiser.org on October 10, 2025
Official website of PostNL
Prasad S Prabhu
October 25, 2025
Vasudha Beri
October 24, 2025
Prasad S Prabhu
August 30, 2025