Sunday, October 27, 2024
Sunday, October 27, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: विशेष समुदायाने काँग्रेस, एनसीपी आणि उबाठाला जिंकवण्याची तयारी केली असे...

फॅक्ट चेक: विशेष समुदायाने काँग्रेस, एनसीपी आणि उबाठाला जिंकवण्याची तयारी केली असे सांगत व्हायरल व्हिडीओ एडिटेड आहे

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
शरद पवार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत विशेष समुदायाने काँग्रेस, एनसीपी आणि उबाठाला जिंकवण्याची तयारी केली.
Fact
इफ्तार पार्टीचा 6 महिन्यांचा जुना व्हिडिओ दुसऱ्या ऑडिओशी जोडून दिशाभूल करीत शेअर केला जात आहे.

शरद पवार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत विशेष समुदायाने काँग्रेस, एनसीपी आणि उबाठाला जिंकवण्याची तयारी केली असे सांगत सध्या एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.

फॅक्ट चेक: शरद पवार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत विशेष समुदायाने काँग्रेस, एनसीपी आणि उबाठा ला जिंकवण्याची तयारी केली असे सांगत व्हायरल व्हिडीओ एडिटेड आहे
Courtesy: X@jpsin1

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.

“विशेष समुदाय ने कांग्रेस, एनसीपी, शिवसेना (उबाठा) को जिताने की जबरदस्त तैयारी शुरू की है। यह कहा जा रहा है कि किसी भी पार्टी का घोषणा पत्र मत देखो चाहे उद्धव ठाकरे का उम्मीदवार कांग्रेस का उम्मीदवार शरद पवार का उम्मीदवार एकदम नालायक हो नकारा हो कोई काम ना करता हो फिर भी हमें बीजेपी के खिलाफ इन्हें ही जिताना है। अगर इस विधान सभा इलेक्शन में सभी हिंदुओं ने बीजेपी, शिंदे सेना का साथ नहीं दिया तो आगे के परिणामो कों जिम्मेदार आप ही होंगे। अभी ये आपके अस्तित्व की लड़ाई है, आपको बीजेपी शिंदेसेना के उम्मीदवारोंको जिताना ही होगा चाहे वे उम्मीदवार आपके पसंदीदा हो या ना हो। सोचो, समझदारों को इशारा काफी है!” अशा कॅप्शनसह हा दावा केला जात आहे.

संबंधित व्हिडीओच्या मागून ऐकू येणारा आवाज हा या दाव्याचे मुख्य कारण आहे. व्हिडिओतील आवाजामध्ये “चुनाव के दिन आप पहले से अपनी जमातें बना लीजिए, अपनी कमेटियां बना लीजिए. एक-एक वोटर मर्द और औरत को इज्जत के साथ ले जाकर वोट डलवाइए. इलेक्शन को दीन से हटकर कोई काम मत समझिएगा. इस इलेक्शन के नतीज़े अगर गलत निकल आए तो क्या होगा, आप समझ भी नहीं सकते. जुल्म की नदियां बहेंगी, कत्लेआम होगा, जेल छोटे पड़ जाएंगे और अल्लाह जाने क्या-क्या होगा.” असे ऐकू येते.

Fact Check/ Verification

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला AAP Mumbai च्या X खात्यावर 30 मार्च 2024 रोजी केलेली एक पोस्ट मिळाली. यामध्ये व्हायरल व्हिडिओला जुळतील असे काही फोटो मिळाले.

फॅक्ट चेक: शरद पवार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत विशेष समुदायाने काँग्रेस, एनसीपी आणि उबाठा ला जिंकवण्याची तयारी केली असे सांगत व्हायरल व्हिडीओ एडिटेड आहे
Courtesy: X@AAPMumbai

दिलेल्या माहितीनुसार, ही इफ्तार पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केली होती, ज्यामध्ये मुंबईतील आम आदमी पार्टीशी संबंधित नेतेही सहभागी झाले होते.

यावरून सुगावा घेत आम्ही आणखी शोध घेतला असता, Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar या फेसबुक पेजवर या कार्यक्रमाचे Live प्रक्षेपण 30 मार्च 2024 रोजी करण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले.

संपूर्ण व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिडिओतील दृश्ये आणि व्यक्ती समाविष्ट असल्याचे आमच्या निदर्शनास आले. मात्र व्हायरल व्हिडिओत पाठीमागून येणारा आवाज आम्हाला या Live प्रक्षेपणात ऐकू आला नाही.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी 30 मार्च 2024 रोजी या कार्यक्रमाची माहिती आणि त्यावेळी केलेल्या भाषणातील नोंदी आपल्या अधिकृत X खात्यावरून ट्विट केल्या असल्याचेही आम्हाला पाहायला मिळाले.

फॅक्ट चेक: शरद पवार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत विशेष समुदायाने काँग्रेस, एनसीपी आणि उबाठा ला जिंकवण्याची तयारी केली असे सांगत व्हायरल व्हिडीओ एडिटेड आहे
Courtesy: X@PawarSpeaks

या ट्विट मध्ये कार्यक्रमाचे फोटो शेयर करतानाच शरद पवार यांनी आपण या कार्यक्रमात नेमके केलेले भाषण दिले असून ते पुढीलप्रमाणे आहे. “मुंबई में रमज़ान मास के औसर पर आयोजित इफ्तार पार्टी कार्यक्रम में उपस्थित भाई-बहनों को संबोधित किया | हमारे साथी सांसद अरविंद सावंत जी, राष्ट्रवादी कांग्रेस के महाराष्ट्र के अध्यक्ष जयंत पाटील, वर्षा गायकवाड, और यहां आए हुए सारे बहनों और भाइयों…! पिछले 30 40 सालों से हम यहां मिलते हैं | यह सब दिन बहुत ही अच्छे दिन है, आप रोजा रखते हैं | रोजा रख कर दुनिया के भलाई के बारे में हमेशा सोचते हैं | आज हम यह एकत्रित हुए, हमें खुशी है कि हमारे साथी माइनॉरिटी डिपार्टमेंट के प्रमुख सूभेदार जी ने आप सभी को दावत दी, इस दावत का स्वीकार आप लोगों ने किया | मेरे पहले जो साथी उन्होंने कुछ शब्द आपके सामने रखें, मैं कोई ज्यादा बात करना नहीं चाहता, पर एक बात सच है की इस देश में भाईचारा रखना हो, देश में एकता रखती हो, इस देश का संविधान जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी की देन है इस पर हमें ध्यान देना होगा | यह कहने की कभी स्थिति आती नहीं थी, मगर आज जिनके हाथों में देश की हुकूमत हैं, उन्हीं लोगों के साथियों ने आज तक कई जगह पर जो बातें कही, वह बातें सुनने के बाद मेरे जैसे आदमी को चिंता रहती है | उन लोगों ने कहा इस देश के संविधान में हमें परिवर्तन करना है, और परिवर्तन करना हो तो मोदी साहब को मदद करो | आप भारत के आसपास के देशों की स्थिति देखेंगे, शांति यहां है, वहा चिंता नहीं | पर हम लोगों ने कभी ना कभी देखा कि हमारे पड़ोसी देशों ने कहा की हुकूमत ने प्रजातंत्र को खत्म किया और देश के हुकूमत को कोई आदमी हो या और कोई हो ऐसे सत्ता हाथ में दे दिया | यह स्थिति देश में कभी पैदा नहीं होनी चाहिए | मेरे पहले कोई कुछ साथियों ने कहा की अनडिक्लेअर्ड इमरजेंसी देश में है | दिल्ली जैसे राज्य के मुख्यमंत्री जेल में है, बाकी लोग ऐसी स्थिति को सामना कर रहे हैं | हम इतना ही कहेंगे यह स्थिति को हमें सामना करना होगा, हमें मिलकर रहना होगा, मिलकर रहने का संदेश में आप सभी लोगों को शुभकामना देता हूं |”

यासंदर्भात 31 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध केलेली बातमी आम्हाला मिळाली. “शांतता आणि बंधुता नांदावी यासाठी संविधानाचे रक्षण करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विरोधी पक्षनेते शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.” अशी माहिती आम्हाला त्यामध्ये वाचायला मिळाली.

फॅक्ट चेक: शरद पवार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत विशेष समुदायाने काँग्रेस, एनसीपी आणि उबाठा ला जिंकवण्याची तयारी केली असे सांगत व्हायरल व्हिडीओ एडिटेड आहे
Courtesy: ABP News

यावरून हा व्हायरल व्हिडिओ सुमारे 6 महिने जुना असल्याचे स्पष्ट झाले. व्हिडीओ सध्याचा नसून आगामी विधानसभा निवडणुकांशी काहीही संबंध नाही. शिवाय मूळ व्हिडिओत व्हायरल व्हिडिओमधील संबंधित आवाजही नसल्याचे दिसून आले.

व्हायरल व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यानंतर, हे स्पष्ट होते की त्यामध्ये प्ले होत असलेला ऑडिओ व्हिडिओमध्ये दर्शविलेल्या दृश्यांशी जुळत नाही. व्हिडिओमध्ये लोक कार्यक्रमात ये-जा करताना दिसत आहेत आणि नेते भेटत आहेत, जे ऑडिओशी जुळत नाही. एवढी मोठी गोष्ट ऑडिओमध्ये बोलली जात असली तरी एकही नेता गांभीर्याने ऐकत नाही हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे.

या प्रकरणाच्या अधिक माहितीसाठी, आम्ही कार्यक्रमात उपस्थित असलेले AAP मुंबई अध्यक्ष रुबिन मस्करेनेस यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. रुबिन म्हणाले की, “हा व्हिडीओ व्हायरल होत असलेल्या कार्यक्रमाच्या मंचावर मी स्वतः उपस्थित होतो. तिथे तशी कोणतीही घोषणा नव्हती. व्हिडिओ एडिट केला आहे. त्यावेळी लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिताही लागू होती. त्यामुळे हा प्रकार शक्यही नाही. ही इफ्तार पार्टी होती जिथे लोक एकमेकांना शुभेच्छा देत होते. कोणत्याही एका समाजाला मत देण्याचे आवाहन करण्यासारखे काही नव्हते.” आम्ही त्यांना या कार्यक्रमात मौलाना सज्जाद नोमानी यांच्या उपस्थितीबद्दल विचारले तेंव्हा त्यांनी ते त्या कार्यक्रमात उपस्थित नव्हते अशीच माहिती दिली.

व्हायरल व्हिडिओतील आवाज काळजीपूर्वक ऐकल्यावर ‘इलेक्शन में वोट डालने को दीन से हट कर काम मत समझिए’ हे वाक्य आमच्या निदर्शनास विशेषत्वाने आले. आम्ही हे वाक्य Google वर शोधले असता, आम्हाला Tufail Chaturvedi या युट्युब चॅनेलवर 9 एप्रिल 2024 रोजी अपलोड केलेला एक व्हिडीओ मिळाला. या व्हिडिओमध्ये संबंधित वाक्य मौलाना सज्जाद नोमानी यांनी बोलल्याचे ऐकावयास मिळाले.

मौलाना सज्जाद नोमानी हे नेहमीच आपली भाषणे स्वतःच्या युट्युब चॅनेलवरून प्रसारित करीत असल्याने आम्ही त्यांचे युट्युब चॅनेल धुंडाळले आणि आम्हाला 27 मार्च 2024 रोजीच्या Live प्रक्षेपणात निवडणुकीसंदर्भात मुस्लिमांना आवाहन करणारे त्यांचे भाषण ऐकायला मिळाले. संपूर्ण भाषण ऐकल्यावर आमच्या लक्षात आले की या भाषणातील 1 तास 12 मिनिटानंतर त्यांनी बोललेला आवाज व्हायरल व्हिडिओत वापरण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओत मौलाना सज्जाद नोमानी यांचा आवाज घालून दिशाभूल केली जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले. तरीही अधिक खात्रीसाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमास वार्तांकनासाठी गेलेले मुक्त पत्रकार जितेंद्र पाटील यांच्याशी बातचीत केली. त्यांनीही “व्हायरल व्हिडीओ एडिटेड व्हाईस ने भरलेला असल्याचे सांगितले , आपण स्वतः त्या कार्यक्रमाला गेलेलो होतो आणि अशाप्रकारे विशिष्ट समुदायाला आवाहन करणारे भाषण तेथे झाले नाही.” अशी माहिती दिली.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सहा महिन्यांपूर्वी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टी कार्यक्रमाच्या व्हिडिओत दुसरा आवाज मिसळून दिशाभूल केली जात आहे, हे स्पष्ट झाले.

Result: Altered Video

Our Sources
Tweet made by AAP Mumbai on March 30, 2024
Live streaming by NCP on March 30, 2024
Tweet made by Sharad Pawar on March 30, 2024
News published by ABP News on March 31, 2024
Video uploaded by Tufail Chaturvedi on April 9, 2024
Live video by Sajjad Nomani on 27 March, 2024
Conversation with AAP Mumbai President Rubin Mascarnhes
Conversation with journalist Jitendra Patil


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular