Tuesday, December 24, 2024
Tuesday, December 24, 2024

HomeFact CheckViralशेअर केले जाणारे फोटो खरंच मणिपूरच्या नोनी येथील सध्याच्या भूस्खलनाचे आहे? याचे...

शेअर केले जाणारे फोटो खरंच मणिपूरच्या नोनी येथील सध्याच्या भूस्खलनाचे आहे? याचे सत्य जाणून घ्या

याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख शुभम सिंह यांनी लिहिला आहे.

मागील काही दिवसांपासून मणिपूरमधील भूस्खलनाच्या घटनेशी जोडत दोन फोटो एकत्र करत ते सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. त्यात असा दावा केलाय की, हे फोटो नुकत्याच झालेल्या मणिपूरच्या नोनी येथील भूस्खलनाचे आहे.

काही फेसबुक युजरने हे फोटो शेअर करत ते मणिपूरच्या नोनी येथील भूस्खलनाचे सांगितले आहे.

फोटो साभार : Facebook/page/Khan Sir Patna
फोटो साभार : Facebook/Prashant Singh

ट्विटरवर देखील हे फोटो मणिपूरच्या नोनी येथील भूस्खलनाचे सांगत शेअर केले जात आहे.

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही पाहू शकता.

आजतकच्या बातमीनुसार, मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात २९ जूनला भूस्खलनाने ८० हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. द प्रिंटच्या बातमीनुसार, मणिपूरमध्ये झालेल्या या भूस्खलनामुळे आसाममधील ११ रहिवाशांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर राज्यातील किमान १० लोकं अद्यापही बेपत्ता आहे. या भागात भारतीय लष्कर मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम राबवत आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. एडिटरजी या न्यूज पोर्टलच्या बातमीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात दुःखद घटना असल्याचे सांगितले आहे.

Fact Check / Verification

शेअर केले जाणारे फोटो खरंच मणिपूरच्या नोनी येथील सध्याच्या भूस्खलनाचे आहे, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही ते दोन्ही फोटो गुगल रिव्हर्सच्या मदतीने शोधले.

पहिला फोटो

फोटो साभार : Facebook/page/Khan Sir Patna

हा फोटो गुगल रिव्हर्सच्या मदतीने शोधल्यावर आम्हांला ११ जुलै २०१८ मधील झी न्यूजची एक बातमी मिळाली. त्या बातमीनुसार, मणिपूरच्या तामेंगलोंगमध्ये भूस्खलनामुळे नऊ लोकांचा मृत्यू झाला. त्या बातमीसोबत तोच फोटो प्रकाशित केला आहे, जो आता व्हायरल झाला आहे.

फोटो साभार : Zee News

या व्यतिरिक्त आम्ही ‘Manipur Tamenglong’ असे ट्विटरवर टाकून शोधले. यात आम्हांला गुवाहाटी प्लसच्या अधिकृत ट्विटर खात्यावरील ११ जुलै २०१८ मधील एक ट्विट मिळाले. ज्यात व्हायरल फोटो दिसत आहे. त्या ट्विटमध्ये लिहिलंय,”मणिपूरच्या तामेंगलोंगमध्ये भूस्खलनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला.”

दुसरा फोटो

फोटो साभार : Facebook/page/Khan Sir Patna

हा फोटो आम्ही गुगल लेन्सच्या मदतीने शोधल्यावर आम्हांला ४ मे २०१५ मधील हिंदुस्तान टाइम्सची बातमी मिळाली. त्या बातमीनुसार, नागालँड-म्यानमार सीमाजवळ आतंकवाद्यांनी आसाम रायफलच्या ८ सैनिकांना मारले. या बातमीत एक फोटोही जोडला आहे. हा फोटो Reuters वृत्तसंस्थेचा असल्याचे सांगितले आहे. हा तोच फोटो आहे, जो आता मणिपूरच्या भूस्खलनाचा सांगत शेअर केला जात आहे.

फोटो साभार : Hindustan Times

त्यानंतर आम्ही काही कीवर्डच्या मदतीने फेसबुकवर शोधले. तेव्हा आम्हांला Kuki Hills नावाच्या फेसबुक पानावर ४ मे २०१५ मधील एक पोस्ट मिळाली. या पोस्टमध्ये देखील तो फोटो जोडला आहे, जो आता मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनाचा सांगत शेअर केला जात आहे.

फोटो साभार : Facebook/Kuki Hills

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, दोन्ही एकत्र करून शेअर केले जाणारे फोटो नुकत्याच झालेल्या मणिपूरच्या नोनी येथील भूस्खलनाचे नाही. हे दोन्ही फोटो वेगवेगळ्या घटनेचे आहे.

Result : False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular