Authors
याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख अर्जुन देवडिया याने लिहिला आहे.
राजस्थानमधील जालोर येथे नऊ वर्षीय दलित विद्यार्थी इंद्र मेघवालच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात हा व्हिडिओ इंद्र मेघवालच्या अंतयात्रेचा असल्याचा सांगितला जात आहे.
व्हिडिओत एका रस्त्यावर खूप गर्दीने लोक निघताना दिसत आहे. लोकांच्या मध्ये एक गाडी देखील दिसत आहे. त्याचबरोबर काही लोकांच्या हातात भारताचा झेंडा आहे. इंद्र मेघवालच्या अंतयात्रेचा व्हिडिओ सांगत लोक फेसबुक आणि ट्विटरवर शेअर करत आहे. शिर्षकात लिहिलंय की,”इंद्र मेघवालची अंतयात्रा.”
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.
बीबीसीच्या एका बातमीनुसार, इंद्र कुमार मेघवाल जालोरच्या एका खाजगी शाळेत तिसरीत शिकत होता. आरोप केला जातोय की, छैल सिंह नावाच्या शिक्षकाने २० जुलैला इंद्र मेघवालला मारले होते. या विद्यार्थ्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते. मात्र १३ ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला. मेघवाल कुटुंबीयांचे असे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलाने उच्च जातीतील शिक्षकाच्या भांड्यातून पाणी प्यायले. दलित मुलाने मडक्यातील पाणी प्यायले, ते काही शिक्षकाला आवडले नाही. यामुळे शिक्षकाने इंद्र मेघवाल याची एवढी मारहाण केली की, त्याचा मृत्यू झाला. पण मडक्यातील पाणी पिण्याच्या प्रकरणाला अजूनही दुजोरा मिळालेला नाही, त्याचा तपास सुरू आहे.
Fact Check / Verification
व्हायरल व्हिडिओची एक फ्रेम इन व्हीड टूलच्या मदतीने आम्ही शोधला. तेव्हा आम्हांला यु ट्यूबवर एक व्हिडिओ मिळाला. तिथे एका युजरने व्हिडिओचे शीर्षक लिहिले होते,”जौनपूरचा सुपुत्र लाल जिलाजीत शहीद भारत माता की जय”
त्यानंतर आम्ही या शिर्षकातील काही कीवर्ड यु ट्यूबवर टाकून शोधले. तेव्हा आम्हांला १८ ऑगस्ट २०२० मधील NEWJ या यु ट्यूब वाहिनीवर युपीतील जौनपूरचे राहणारे जिलाजीत यादव नावाच्या एका शहिद सैनिकाच्या अंतयात्रेचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओच्या शेवटी व्हायरल व्हिडिओ देखील दिसत आहे.
या व्यतिरिक्त NYOOOZZ UP-UTTARAKHAND या यु ट्यूब वाहिनीवर १४ ऑगस्ट २०२० रोजी अपलोड केलेला व्हिडिओ जौनपूरचे जिलाजीत यादव यांच्या अंतयात्रेचा असल्याचा सांगितला आहे. त्यावेळी अन्य काही वृत्त यु ट्यूब वाहिन्यांनी जिलाजीत यादव यांच्या अंतयात्रेचे वेगवेगळे व्हिडिओ शेअर केले होते.
दैनिक भास्करच्या बातमीत सांगितले आहे की, ११ ऑगस्ट २०२० जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये आतंकवाद्यांच्या चकमकीत जिलाजीत यादव शहीद झाले. त्यानंतर जिलाजीत यादव यांचे पार्थिव शरीर जौनपूरचे येथील धौरहरा इजरी या मूळ गावी आणण्यात आले. शहीद होण्याआधी जिलाजीत वडील झाले होते. त्यांच्या अंतिम यात्रेत लोक हातात तिरंगा घेऊन गेले होते. व्हायरल व्हिडिओ देखील तेव्हाचा आहे.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओत केला जाणारा दावा भ्रामक आहे. दोन वर्षांपूर्वीच्या एका शहिदाच्या अंतयात्रेचा व्हिडिओ इंद्र मेघवालच्या अंतयात्रेचा सांगत शेअर केला जात आहे.
Result : False
Our Sources
१८ ऑगस्ट २०२० रोजी NEWJ ने अपलोड केलेला यु ट्यूब व्हिडिओ
१४ ऑगस्ट २०२० रोजी NYOOOZZ UP-UTTARAKHAND ने अपलोड केलेला यु ट्यूब व्हिडिओ
१४ ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित झालेली दैनिक भास्करची बातमी
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.