उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकरवर सक्ती केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत एका रस्त्यावर मुस्लिम समुदायाचे काही लोक एका ओळीत उभे राहून अजान देतांना दिसत आहे.
त्यात असा दावा केलाय की, युपीत लाऊडस्पीकरवर बंदी घातल्यानंतर मुस्लिमांनी रस्त्यावर येऊन अजान देण्यास सुरवात केली. हा व्हिडिओ शेअर करत काही लोक असेही म्हणत आहे की, आता लाऊडस्पीकरवर अजानचा पर्याय शोधलाय.
इथे या ट्विटची संग्रहित लिंक पाहू शकता.

ट्विटरवर काही अधिकृत खात्यांवरून देखील हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ युपीचा सांगून फेसबुकवर शेअर केला जात आहे.
युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लाऊडस्पीकरच्या संदर्भात काही दिवसांपूर्वी एक आदेश जारी केला होता. त्यात म्हटले होते की, आता लोकांना लाऊडस्पीकर आणि माईकचा आवाज परिसराबाहेर जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.
त्याचबरोबर युपीत आता नव्या ठिकाणी लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी मिळणार नाही, असंही बोललं जात आहे. या आदेशानंतर युपीतील अनेक धार्मिक ठिकाणांचा आवाज कमी झाला आणि काही ठिकाणी तर ध्वनी उपकरणेही काढून टाकण्यात आली.
Fact Check/Verification
व्हिडिओला इन-वीड टूलमध्ये टाकले. त्यानंतर काही कीवर्ड टाकून शोधले. तेव्हा आम्हांला या संदर्भातील कोणतीही बातमी आढळली नाही. पण हा व्हायरल व्हिडिओ एप्रिल २०२० मध्ये शेअर केला होता.

यावरून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की, हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. याचा युपीत दिलेल्या लाऊडस्पीकर आदेशाशी कुठलाही संबंध नाही. त्यानंतर आम्ही हा व्हिडिओ कुठला आहे, ते शोधण्याचा प्रयत्न केला.
एप्रिल २०२० मध्ये शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आम्हांला असा एक व्हिडिओ मिळाला, ज्याची रिझोल्युशन चांगले होते.
हा व्हिडिओ फेसबुकवर ७ एप्रिल २०२० रोजी अपलोड केला होता. त्या व्हिडिओत एका ठिकाणी ‘डॉ. एन. राय होमिओपॅथ’ अशी लिहिलेली एक पाटी दिसत आहे. त्याच्या शेजारी एक मेडिकल दिसत आहे. तिथे बारकाईने पाहिल्यावर समजले की, तिथे ‘हावडा’ असं लिहिलं होतं.

गुगलच्या मदतीने शोधल्यावर आम्हाला समजले की, डॉ. एन. राय नावाचा एक होमिओपॅथी डॉक्टराचे क्लिनिक हावडा आणि कोलकाता इथे आहे. गुगलवर दिलेल्या नंबरच्या मदतीने आम्ही डॉ. एन. राय यांच्याशी संपर्क साधला.
डॉ. एन. राय यांनी व्हिडिओ पाहिल्यावर आम्हांला सांगितले की, हा व्हिडिओ हावडामधील आहे. यात दिसणारा रस्ता त्यांच्याच क्लिनिक बाहेरचा आहे. पण डॉ राय यांच्या म्हणण्यानुसार, तेथील क्लिनिक त्यांनी दोन वर्षांपूर्वीच बंद केले आहे.
त्याचबरोबर आम्हांला व्हायरल व्हिडिओत एका ठिकाणी लाल रंगाच्या पाटीवर ‘शिमला बिर्याणी’ असं लिहिलेलं दिसले. ‘शिमला बिर्याणी हावडा’ सारखे काही कीवर्ड गुगलवर टाकले. तेव्हा आम्हांला त्यासारखीच एक पाटी दिसली.
या फोटोत पाटीवर ‘जीटी रोड पिलखाना नॉर्थ हावडा’ असं लिहिलेले दिसले. त्याचबरोबर तिथे एक फोन नंबर देखील लिहिलेला दिसला. त्या नंबरवर आम्ही फोन केला पण त्या व्यक्तीला या व्हिडिओ संदर्भात कुठलीही माहिती देता आली नाही.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही गुगलवर ते मेडिकल दुकान शोधण्याचा प्रयत्न केला. गुगल मॅप्सच्या मदतीने ही गोष्ट समोर आली की, नॉर्थ हावडाच्या जीटी रोडवर अशरफ मेडिकल हॉल या नावाचे एक दुकान आहे.
या दुकानाच्या पाटीवर एक मोबाईल नंबर लिहिलेला दिसत आहे. या नंबरवर फोन केल्यावर आमचा संपर्क मोहम्मद अशरफ यांच्याशी झाला. अशरफने या गोष्टीला दुजोरा देत सांगितले की, हा व्हिडिओ त्यांच्या मेडिकलच्या बाहेरचा आहे. त्याचे म्हणणे होते की, हा व्हिडिओ टाळेबंदीतील आहे.
अशरफ यांच्या म्हणण्यानुसार,”टाळेबंदीतील परिस्थिती खूपच भयानक होती. व्हिडिओत दिसणारी लोक रस्त्यावर अजान देऊन अल्लाहकडे प्रार्थना करत होते की, सर्वांची कोरोनातून लवकर सुटका होवो. टाळेबंदीमुळे मशीद बंद होती, त्यामुळे लोक रस्त्यावर येऊन नमाज अदा करत होते. असं फक्त त्याच दिवशी झाले होते, रोज नाही.”
या संदर्भात न्यूजचेकरने हावडाचे पोलीस आयुक्त सी, सुधाकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांचे देखील असेच म्हणणे आहे की, हा व्हिडिओ कोरोना दरम्यानचा आहे. यात दिसणारी लोक अल्लाहकडे प्रार्थना करत होते की, सर्वांची कोरोनातून लवकर सुटका होवो.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील नसून हावडातील आहे. हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. व्हिडिओ लाऊडस्पीकरशी जोडून भ्रामक दाव्यासोबत शेअर केला जात आहे.
Result : False Context/False
Our Sources
७ एप्रिल २०२० ची फेसबुक पोस्ट
हावडाचे पोलीस आयुक्त सी. सुधाकर यांच्याशी झालेला संवाद
मेडिकल दुकानाचे मालक आणि डॉ. एन. राय यांच्याशी झालेला संवाद
गुगल आणि गुगल मॅप्सच्या मदतीने केलेले विश्लेषण
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.