Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkभूस्खलन होण्याचा व्हायरल व्हिडिओ कर्नाटकच्या अनमोड घाटातील आहे? चुकीचा दावा व्हायरल 

भूस्खलन होण्याचा व्हायरल व्हिडिओ कर्नाटकच्या अनमोड घाटातील आहे? चुकीचा दावा व्हायरल 

याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख शुभम सिंह यांनी लिहिला आहे.

Claim

सोशल मीडियावर भूस्खलन होण्याचा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

Fact

दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही इन व्हीड टूलच्या मदतीने व्हायरल व्हिडिओतील एक कीफ्रेम गुगलवर टाकून शोधली. तेव्हा आम्हांला ३१ जुलै २०२१ रोजी हिंदुस्तान टाइम्सच्या यु ट्यूब वाहिनीवर अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला. “हिमाचल प्रदेशात सिरमौरमध्ये भूस्खलनाच्या दरम्यान रस्ता खचला”, असं त्या व्हिडिओच्या शिर्षकात लिहिले होते. यात व्हायरल व्हिडिओतील भाग देखील पाहिला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त जुलै २०२१ मध्ये अमर उजालाने त्यांच्या यु ट्यूब वाहिनीवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्यात देखील हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील सिरमौरमधील असल्याचे सांगितले जात आहे.

त्यानंतर आम्ही ट्विटरवर काही कीवर्ड टाकून शोधले. तेव्हा आम्हांला काही युजरने हा व्हिडिओ जुलै २०२१ मध्ये हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले आहे. ते ट्विट तुम्ही इथे आणि इथे पाहू शकता.

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, कर्नाटकातील अनमोड घाटाच्या नावाने शेअर केला जाणारा व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील सिरमौरचा असून तो एक वर्षापूर्वीचा आहे.

Result : False 

जर तुम्हांला माझी तथ्य पडताळणी आवडत असेल तर असेच विविध लेख या दुव्यावर टिचकी मारून तुम्ही वाचू शकता.


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular