Authors
Claim
विरोधी पक्षाची नेते मंडळी शरद पवाराच्या दिल्ली येथील घरी मोदीच्या विरोधात कीती खालच्या पातळीवर गेलेली आहे.
Fact
हा व्हिडीओ एडिटेड आहे. बैठकीच्या व्हिडिओत इन्किलाब या हिंदी चित्रपटातील दिवंगत अभिनेते कादर खान यांच्या तोंडचे संवाद घुसडण्यात आले आहेत.
देशातील विविध विरोधी पक्षातील नेते आणि केंद्रीभूत राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरद पवार असलेल्या एका बैठकीचा व्हिडीओ सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल केला जात आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून दावा केला जात आहे जी, पहा विरोधी पक्षाची नेते मंडळी शरद पवार यांच्या दिल्ली येथील घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात किती खालच्या पातळीवर गेलेली आहेत.
या पोस्टाचे संग्रहण इथे पाहता येईल.
हा दावा फेसबुकवरही व्हायरल झाला आहे.
या दाव्यासह शेयर केला जात असलेला व्हिडीओ हा एक प्रमुख दावा असल्याचे पाहायला मिळते. व्हिडिओत शरद पवारांसह विरोधीपक्षांतील काही नेते मंडळी पाहायला मिळतात. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातवारे करीत बोलताना दिसते. तिच्या पाठीमागून हिंदीमधील संवाद ऐकायला येतात. या संवादाचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे, “निवडणूक जिंकण्यासाठी आपल्याला सत्ताधारी पक्षावरुन जनतेचा विश्वास हटवला पाहिजे आणि त्यासाठी जनतेत भिती निर्माण करणे महत्वाचे आहे. हे करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवून आणाव्या लागतील, ज्यामुळे जनता आपल्यावर विश्वास ठेऊ लागेल आणि आपल्याला निवडून देईल. पण यासाठी पाण्यासारखा पैसा खर्चावा लागेल. यासाठीच ही बैठक बोलावण्यात आली आहे.”
Fact Check/ Verification
व्हायरल होत असलेला व्हिडीओ आणि त्यामधील संवाद यांचा तपास करण्यासाठी आम्ही व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला. दरम्यान अनेक युजर्स शेयर करीत असलेल्या या व्हिडिओवर ए एन आय चा लोगो आणि ए एन आय ट्विटर हॅण्डलवरून तो व्हिडीओ मूळ प्रसारित झाल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. व्हिडिओची मूळ कॅप्शनही इंग्रजी भाषेत असल्याचे आम्हाला दिसून आले.
यावरून आम्ही संबंधित किवर्डच्या माध्यमातून गुगल वर शोधले असता, आम्हाला २२ जून २०२१ रोजी ए एन आय ने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा व्हिडीओ पोस्ट केल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.
सदर व्हिडिओची कॅप्शन आणि व्हायरल व्हिडिओची कॅप्शन समान आहे. मात्र या व्हिडिओत कोणताही आवाज नसून बैठकीचे फक्त व्हीज्यूअल्स पाहायला मिळत असल्याचे निदर्शनास आले.
यावरून आम्ही ट्विटर advanced सर्च च्या माध्यमातून शोध घेतला असता, आम्हाला NATIONALNEWSDM ने आपल्या ट्विटर हॅन्डल वरून हाच व्हिडीओ २२ जून २०२१ रोजीच पोस्ट केल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान या व्हिडिओतही फक्त बैठकीचे व्हिज्युअल्स पाहायला मिळत असून कोणताही आवाज नसल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. सदर व्हिडीओ २०२१ च्या जून महिन्यात झालेल्या बैठकीचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओत व्हिडिओला जोडून येणाऱ्या हिंदी संवादांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
आम्ही ते संवाद युट्युबवर शोधले असता, आम्हाला @entertainmentstation1138 या युट्युब चॅनेलने ७ ऑगस्ट २०१८ रोजी अपलोड केलेला एक व्हिडीओ पाहायला मिळाला.
Best political scene of Kader Khan | Amitabh Bachchan | Inquilab movie या कॅप्शनखाली हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक राजकीय बैठकीचा प्रसंग असून दिवंगत अभिनेते कादर खान बोलताना दिसतात. त्यांच्या तोंडून बोलले जात असलेले संवाद व्हायरल व्हिडिओत असलेल्या संवादांशी पूर्णपणे मिळते जुळते असल्याची माहिती आम्हाला मिळाली.
व्हायरल व्हिडिओमध्ये १९८४ मध्ये प्रदर्शित राजकीय घडामोडींवर भाष्य करणारा चित्रपट इन्किलाब मधील संवाद घुसडण्यात आले आहेत. हे आमच्या तपासावरून स्पष्ट झाले.
Conclusion
आमच्या तपासात मोदींच्या विरोधात कारस्थान या नावाखाली व्हायरल व्हिडीओ एडिटेड आहे. बैठकीच्या व्हिडिओत इन्किलाब या हिंदी चित्रपटातील दिवंगत अभिनेते कादर खान यांच्या तोंडचे संवाद घुसडण्यात आले आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
Result: Altered Photo/ Video
Our Sources
Tweet made by ANI on June 22, 2021
Tweet made by DAINIK NATIONAL NEWS DIGITAL MEDIA on June 22, 2021
Video uploaded by @entertainmentstation1138 on August 7, 2018
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in