Tuesday, November 19, 2024
Tuesday, November 19, 2024

HomeFact CheckFact Check: ऑक्सफोर्ड डिक्शनरीने इंडियनचा अर्थ क्रिमिनल असा केलाय? खोटा आहे हा...

Fact Check: ऑक्सफोर्ड डिक्शनरीने इंडियनचा अर्थ क्रिमिनल असा केलाय? खोटा आहे हा दावा

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
जुन्या ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये पान क्र. ७८९ वर Indian शब्दाचा अर्थ जुनाट लोक, गुन्हेगार आणि मूर्ख लोक असा केला आहे.

Fact
१९३४ च्या ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये पृष्ठ क्रमांक ७८९ वर India हा शब्द आढळला नाही. तथापि, पृष्ठ ५८० वर भारत या शब्दाची व्याख्या सिंधू नदीच्या पूर्वेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस असलेला दक्षिण आशियातील देश अशी करण्यात आली आहे. India हा शब्द संस्कृतमधील प्राचीन सिंधू नदीच्या नावावरून आला आहे आणि ग्रीक आणि रोमन लेखनात त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे हा दावा खोटा आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जात आहे, ज्यात असा दावा करण्यात आला आहे की जुन्या ऑक्सफर्ड डिक्शनरीने पृष्ठ क्रमांक ७८९ वर भारतीय शब्दाचा अर्थ जुन्या जमान्यातील लोक, गुन्हेगार आणि मूर्ख लोक असा केला आहे. या पोस्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की डिक्शनरीने शब्दाचा अर्थ बदलला आहे.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: ऑक्सफोर्ड डिक्शनरीने इंडियनचा अर्थ क्रिमिनल असा केलाय? खोटा आहे हा दावा

Fact Check/ Verification

व्हायरल पोस्टसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही कीवर्ड सर्च केला. मात्र आम्हाला ऑक्सफोर्ड डिक्शनरीने Indian चा अर्थ चुकीच्या पद्धतीने लिहिला असल्याची माहिती मिळाली नाही. व्हायरल दाव्यात जुन्या ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये असा उल्लेख आला आहे. त्याबद्दल आम्ही शोधले. जेव्हा आम्ही संबंधित कीवर्ड वापरून ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या १९०० च्या आवृत्तीचा शोध घेतला तेव्हा आम्हाला १९३४ च्या ऑक्सफर्ड डिक्शनरीचे प्रकाशन सापडले. पृष्ठ क्रमांक ७८९ वर Indian हा शब्द आढळला नाही.

Fact Check: ऑक्सफोर्ड डिक्शनरीने इंडियनचा अर्थ क्रिमिनल असा केलाय? खोटा आहे हा दावा

तथापि, पृष्ठ ५८० वर India या शब्दाची व्याख्या सिंधू नदीच्या पूर्वेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस दक्षिण आशियातील देश अशी असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Fact Check: ऑक्सफोर्ड डिक्शनरीने इंडियनचा अर्थ क्रिमिनल असा केलाय? खोटा आहे हा दावा
Screengrab of page.580 archieved Oxford Dictionary

ऑक्सफर्ड ऑनलाइन डिक्शनरी वेबसाइटवर India या शब्दाचा अर्थ शोधल्यावर, आम्हाला आढळले की India या शब्दाची व्याख्या, ‘a country in South Asia that used to be a part of the British empire. It became independent and a member of the Commonwealth in 1947.‘ अशी करण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Fact Check: ऑक्सफोर्ड डिक्शनरीने इंडियनचा अर्थ क्रिमिनल असा केलाय? खोटा आहे हा दावा

India हा शब्द खरे तर संस्कृतमधील सिंधू नदीच्या नावावरून आला आहे. India या शब्दाचा उगम हेरोडोटस सारख्या प्राचीन ग्रीक आणि रोमन लेखनात सापडतो ज्यांनी सिंधू नदीच्या पूर्वेकडील भूमीला India म्हणून संबोधले. अशी माहिती आम्हाला ncrt च्या वेबसाईटवर मिळाली. यावरून आम्हाला India या नावाशी ब्रिटिशांना जोडणारा दावाही संदर्भहीन असल्याचे दिसून आले.

Fact Check: ऑक्सफोर्ड डिक्शनरीने इंडियनचा अर्थ क्रिमिनल असा केलाय? खोटा आहे हा दावा
Screengrab of ncrt.nic

Conclusion

अशाप्रकारे भारतीय लोकांना ऑक्सफोर्ड डिक्शनरीने चुकीच्या पद्धतीने संबोधले असल्याचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources
Google Search
Archieved Oxford Dictionary
Oxford online Dictionary
Website of NCRT

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular