Authors
Claim
पाकिस्तानात मृत मुलीचे पालक तिच्या कबरीला टाळे लावतात जेणेकरून मृतदेहावर बलात्कार होऊ नये.
Fact
Geolocation tools आणि स्थानिक लोकांशी केलेल्या संभाषणांनी पुष्टी केली की हे छायाचित्र भारतातील हैदराबादमधील स्मशानभूमीचे आहे. व्हायरल प्रतिमेच्या माध्यमातून मृतदेहावर बलात्कार घटनांशी जोडला गेलेला संदर्भ आणि वर्णन चुकीचे आहे.
लोखंडी गेटने झाकलेल्या एका कुलूपबंद कबरीची प्रतिमा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली आहे. ही प्रतिमा शेअर करणाऱ्या युजर्सनी आरोप केला की त्यात पाकिस्तानची कबर दिसत आहे, तसेच मृत मुलीच्या पालकांनी मृतदेहावर बलात्कार होऊ नये म्हणून तिच्या कबरीला कुलूप लावले. WION, ABP, OpIndia हिंदी आणि ANI या वृत्तसंस्थेसह अनेक वृत्तवाहिनींनीही पाकिस्तानमधील नेक्रोफिलियाबद्दल चिंता व्यक्त करून हा दावा केला आहे. न्यूजचेकरला हा दावा खोटा असल्याचे आढळले.
अशा पोस्ट इथे, इथे आणि इथे बघता येतील.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check/ Verification
आम्ही व्हायरल चित्र असलेल्या विविध पोस्टच्या टिप्पण्या विभागांमध्ये स्कॅन केले आणि लक्षात आले की अनेक युजर्सनी ही प्रतिमा प्रत्यक्षात भारताच्या हैदराबादची कबर दाखवते, पाकिस्तानची नाही. असे लिहिले होते.
पुढे, आम्हाला @jaleel.raja या युजरची 30 एप्रिल 2023 रोजीची फेसबुक पोस्ट सापडली, ज्यात कुलूपबंद कबरीच्या व्हायरल झालेल्या दोन प्रतिमा आहेत. पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, मदनापेट येथील दरब जान कॉलनीतील सालार-ए-मलिक मस्जिदजवळ या प्रतिमा कॅप्चर करण्यात आल्या आहेत.
न्यूजचेकरने जलील यांच्याशी संपर्क साधला, ज्यानी आम्हाला सांगितले की त्यांना सोशल मीडिया युजर्स कुलूपबंद केलेल्या कबरीच्या फोटो पाकिस्तानची असल्याचा दावा करून शेअर करताना आढळले. त्यानंतर, ते पहाटे 2 वाजता भारतातील हैदराबादमधील स्मशानभूमीत पोहोचला आणि संपूर्ण प्रकरण स्पष्ट करण्यासाठी फोटो क्लिक केले व त्याने नंतर फेसबुकवर शेअर केले.
यानंतर, न्यूजचेकरने तेलंगणातील हैदराबादमधील स्मशानभूमीजवळ असलेल्या जहांगीर डेअरीच्या मालकाशी संपर्क साधला, ज्याने आम्हाला पुष्टी केली की व्हायरल चित्र खरोखर त्याच्या शेजारील स्मशानभूमीचे आहे.
आम्ही परिसरातील इतर अनेक लोकांशी संपर्क साधला ज्यांनी याची पुष्टी केली की व्हायरल प्रतिमा भारतातील हैदराबादमधील स्मशानभूमीची आहे. व्हायरल चित्रात दिसणारी कबर स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर आहे. कोणीही त्यावर पाऊल ठेवू नये किंवा परवानगीशिवाय तिच्यावर दुसरी कबर बांधू नये म्हणून ती कुलूपबंद करण्यात आली आहे.
@Deccan24Hyderabad द्वारे 1 मे 2023 रोजीच्या फेसबुक पोस्टमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांचा व्हिडीओ दाखवण्यात आला आहे. ज्यात त्यांनी लोखंडी गेट आणि कुलूप लावण्याची कारणे स्पष्ट केली आहेत. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एक पुरुष असे म्हणताना दिसतो की लोक कबरीवर कचरा आणि इतर घाणेरड्या वस्तू टाकत असल्याने कुलूप लावण्यात आले आहे.
Conclusion
आमच्या तपासात मृतदेहांवर बलात्कार होऊ नये या भीतीने पाकिस्तानमधील मयत मुलींचे पालक त्यांच्या मुलींच्या कबरींना कुलूप लावत आहेत, अशी चुकीची माहिती देऊन भारतातील हैदराबादमधील कुलूपबंद केलेल्या कबरीची प्रतिमा शेयर केली गेली आहे. हे स्पष्ट झाले आहे.
Result: False
Sources
Facebook Post By @jaleel.raja, Dated April 30, 2023
Google Earth
Facebook Post By @Deccan24Hyderabad, Dated May 1, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in