Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
पाकिस्तानातील सरकारने सलमान खान यांना Anti-Terrorism Act, 1997 अंतर्गत Fourth Schedule मध्ये समाविष्ट करून दहशतवादी ठरवले आहे.
हा दावा खोटा आहे. सलमान खान यांना पाकिस्तानने दहशतवादी घोषित केल्याची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नाही. व्हायरल होत असलेले नोटिफिकेशन बनावट आहे. त्यामध्ये अनेक त्रुटी, वेळापत्रकातील विसंगती आणि पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांनीही या दाव्याला नाकारले आहे.
सोशल मीडियावर एक कथित सरकारी नोटिफिकेशन प्रसारित करण्यात आले, ज्यामध्ये असा दावा केला गेला की पाकिस्तानच्या सरकारने सलमान खानला “Azad Balochistan Facilitator” म्हणून घोषित करून Anti-Terrorism Actच्या Fourth Schedule मध्ये स्थान दिले आहे.
हे कथित नोटिफिकेशन व्हायरल होताच, अनेक भारतीय माध्यमांनी हेडलाईन्ससह बातम्या प्रकाशित केल्या की “सलमान खानला पाकिस्तानने दहशतवादी घोषित केले” किंवा “Pakistan puts Salman Khan on terror watchlist after Balochistan remark”.

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
अशाच बातम्या काही न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया पोस्ट्सवर दिसल्या. त्या येथे, येथे, येथे आणि येथे पाहता येतील.
वादाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा सलमान खान यांनी सौदी अरेबियामधील रियाध येथे झालेल्या Joy Forum या कार्यक्रमात बॉलीवूड चित्रपटांच्या आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेबद्दल बोलताना “बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील लोक” असा स्वतंत्र उल्लेख केला.
त्यांच्या विधानाचे संदर्भ असे होते:
“येथे (सौदी अरेबियामध्ये) तुम्ही हिंदी चित्रपट प्रदर्शित केला तर तो सुपरहिट होतो. तमिळ, तेलुगू किंवा मल्याळम चित्रपट शेकडो कोटी कमावतात, कारण इथे विविध देशांतील लोक राहतात. बलुचिस्तानमधले लोक आहेत, अफगाणिस्तानमधले लोक आहेत, पाकिस्तानमधलेही लोक इथे आहेत…”
या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू झाली. काही गटांनी याचा गैरसमज करून “बलुचिस्तान वेगळा देश आहे असे सलमान खान यांनी मान्य केले” असा अर्थ लावला. याच पाश्र्वभूमीवर बनावट नोटिफिकेशन व्हायरल करण्यात आले असण्याची शक्यता आहे.
Newschecker ने पाकिस्तान सरकारचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स, त्यांच्या प्रेस माहिती विभागाची (Press Information Department) वेबसाइट आणि बलुचिस्तान सरकारचे पोर्टल्स तपासले, मात्र सलमान खान यांचे नाव Anti-Terrorism Act च्या Fourth Schedule मध्ये समाविष्ट असल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. याशिवाय, संबंधित कीवर्ड्सच्या आधारे शोध घेतल्यावरही अशा प्रकारच्या दाव्याला समर्थन देणारी कोणतीही विश्वासार्ह पाकिस्तानी बातमी सापडली नाही.
व्हायरल झालेल्या कथित नोटिफिकेशनमधील खालील विसंगती आढळल्या:
“BALOCHISTAN” हा शब्द चुकीचा “BALOCIIISTAN” असा लिहिला होता.
“Terrorism” ऐवजी “terrarism” असे स्पेलिंग होते.
“Affiliated” ऐवजी “aftilisted” असा चुकीचा शब्द होता.
फॉर्मॅटमध्ये अनेक ठिकाणी अमान्य व्याकरण आणि अनौपचारिक भाषा वापरली होती.
“Film” हा शब्द “संस्था” (Organisation) या कॉलममध्ये टाकलेला होता — ज्यामुळे अधिसूचनेचा स्वरूप निरर्थक दिसत होता.
नोटिफिकेशनमध्ये “प्रत्येक महिन्यात पोलिस स्टेशनला उपस्थित राहणे” व “कायमस्वरूपी पत्त्याबाहेर जाण्यापूर्वी परवानगी घेणे” यांसारख्या अटी होत्या — परंतु सलमान खान पाकिस्तानचा नागरिक नसल्याने त्या लागू होऊ शकत नाहीत.
व्हायरल पत्रकामध्ये तारीख 16 ऑक्टोबर 2025 दिली आहे. तर सलमान खान यांनी Joy Forum (सौदी अरेबिया) मध्ये बलुचिस्तानचा उल्लेख 17 ऑक्टोबर 2025 रोजी केला. म्हणजेच कथित अधिसूचनेची तारीख त्यांच्या वक्तव्याच्या आधीची आहे — जे तथ्यात्मकदृष्ट्या अशक्य आहे. हा एक मोठा पुरावा आहे की हा दस्तऐवज बनावट आहे.

Newscheckerने पाकिस्तान टीव्ही डिजिटलचे प्रमुख मोहम्मद साकिब तनवीर यांच्याशी संपर्क केला. त्यांनी दस्तऐवजाचे परीक्षण केल्यानंतर म्हटले: “या अधिसूचनेतील भाषा अनौपचारिक असून अनेक कायदेशीर त्रुटी आहेत. याशिवाय CINC (Computerised National Identity Card) फक्त पाकिस्तानी नागरिकांसाठी असतो. सलमान खानकडे असा कार्ड असूच शकत नाही. हे दस्तऐवज पूर्णपणे बनावट आहे.” तसेच त्यांनी हेही नमूद केले की दस्तऐवज बहुधा एखाद्या जुन्या अधिकृत नमुन्यात फेरफार करून तयार केला आहे.
व्हायरल दस्तऐवजाच्या प्रतिमेवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर तो एका X (पूर्वी ट्विटर) पोस्टकडे निर्देशित झाला, जो 21 ऑक्टोबर 2025 रोजी ‘Baloch Women Forum’ यांनी पोस्ट केला होता.
या पोस्टमध्ये बलुचिस्तान सरकारने तीन व्यक्तींचा Fourth Schedule मध्ये समावेश करणारे अधिकृत नोटिफिकेशन प्रकाशित केले होते. तुलना केल्यावर पुढील गोष्टी लक्षात आल्या. दोन्ही दस्तऐवजांमध्ये क्रमांक (Serial No.), पत्र क्रमांक (Reference Number), जारी दिनांक, स्टॅम्पची जागा, स्वाक्षरीचा फॉरमॅट एकसारखा होता. यावरून असे दिसते की पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मूळ दस्तऐवजामध्ये फेरबदल करून सलमान खानचे नाव बनावटरीत्या घातले गेले.

पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या Fact Check Unit ने 26 ऑक्टोबर 2025 रोजी X वर स्पष्टीकरण दिले, ज्यात म्हटले आहे:
“सलमान खान यांचे Anti-Terrorism Act च्या Fourth Schedule मध्ये नाव आढळले नाही. NACTA च्या Proscribed Persons डेटाबेसमध्ये किंवा Home Department Gazette मध्ये त्यांच्याविषयी कोणतीही अधिकृत नोंद नाही. हा दावा अप्रमाणित व खोटा असून, केवळ सनसनाटीपणासाठी केला जात आहे.”
यासंदर्भात आम्ही सलमान खान यांच्या पीआर टिमशीही संपर्क साधला असून त्यांची प्रतिक्रिया आल्यावर हा लेख आणखी अपडेट केला जाईल.
सलमान खान यांना पाकिस्तानने दहशतवादी घोषित केल्याचा दावा खोटा आहे. व्हायरल दस्तऐवज बनावट (doctored) आहे, त्यातील वेळापत्रक अभिनेता सलमान खान यांच्या वक्तव्याशी जुळत नाही आणि पाकिस्तानमधील अधिकृत अधिकाऱ्यांनीही हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे.
Sources
YouTube Video By Saudi On Demand, Dated October 17, 2025
X Post By @FactCheckerMoIB, Dated October 27, 2025
Conversation With Pakistan TV Digital Head Muhammad Saqib Tanveer On October 27, 2025
Self analysis
(With inputs from Vasudha Beri)
Salman
November 29, 2025
Vasudha Beri
November 21, 2025
Prasad S Prabhu
November 18, 2025