सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केलाय की, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या एका तरुणाला युपी पोलिसांनी धडा शिकवला. व्हिडिओत दोन पोलीस एका तरुणाला बेदम मारतांना दिसत आहे.
पोलिसांनी त्या तरुणाचे दोन्ही हात पकडून ठेवले आहे. त्यातील एक पोलीस कर्मचारी तरुणाला सतत काठीने मारत आहे. त्यानंतर एक पोलीस कर्मचारी त्या तरुणाला जमिनीवर पाडतो आणि दुसरा जण त्याला काठीने मारत असतो. तो तरुण वेदनेने व्याकुळ होतांना दिसत आहे.

या ट्विटचे संग्रहण येथे पाहू शकता.

या ट्विटचे देखील संग्रहण येथे पाहू शकता.
व्हिडिओसोबत “पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर युपी पोलीस धडा शिकवतांना” असं लिहिलं आहे. फेसबुक आणि ट्विटरवर हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे.
योगींच्या शासनकाळात युपी पोलिसांच्या कारवाईसंबंधी ते खूपच चर्चेत होते. मुख्यमंत्री योगी आणि त्यांचे समर्थक यांनी खूपदा राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि पोलीस सक्तीबाबत सरकारची पाठ थोपटली आहे.
नुकतेच युपीच्या निवडणूका संपल्यानंतर बीजेपीने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर खूपच जोर दिला. हीच गोष्ट लक्षात घेता आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरचे युजर हा व्हिडिओ युपीचा सांगत पोलिसांचे कौतुक करत आहे.
Fact Check / Verification
व्हायरल व्हिडिओचा शोध असतांना आम्हांला त्याविषयी काही खास माहिती मिळाली नाही. पण काही कीवर्डच्या मदतीने शोधल्यावर आम्हांला केटीव्ही न्यूज नावाच्या एका संकेतस्थळावर एक बातमी मिळाली. २ मे २०२१ रोजी प्रकाशित झालेल्या या बातमीत त्या व्हिडिओची एक फ्रेम उपलब्ध आहे.

बातमीत सांगितले आहे की, हा व्हिडिओ युपीतील चंदौलीमधील आहे. जिथे चोरीच्या आरोपात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तीन अल्पवयीन मुलांना खूपच बेदम मारले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.
या व्हिडिओचा अजून शोध घेतल्यावर आम्हांला द टाइम्स ऑफ इंडिया आणि अमर उजालाच्या बातम्या मिळाल्या. त्यामध्ये सांगितले आहे की, ही घटना चंदौलीतील बलुआ पोलीस स्थानकातील आहे.
काही अल्पवयीन मुले मोबाईलच्या दुकानात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. पण दुकानाच्या मालकाने त्यांना पकडले. पोलिसांना माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्या तीन मुलांना बेदम मारण्यात आले. त्यातील एक पोलीस कर्मचारी एसएचओ आणि दुसरा कॉन्स्टेबल होता.
हा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासोबत व्हायरल झाला. त्यानंतर चंदौली पोलिसांनी त्याला नकार देत त्याबाबत एक ट्विट केले.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ जवळपास एक वर्षापूर्वीचा आहे. याचा देश विरोधी आणि पाकिस्तान झिंदाबाद घोषणेशी काहीही संबंध नाही. युपी पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलांना चोरीच्या आरोपासंबंधी मारले होते.
Result : False Context / False
Our Sources
केटीव्ही, द टाइम्स ऑफ इंडिया आणि अमर उजाला यांच्या बातम्या
चंदौली पोलिसांचे ट्विट
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.