Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
हा व्हिडीओ उत्तरप्रदेशातील असून मुलीची छेड काढणाऱ्या आरोपींची युपी पोलिसांनी अशी अवस्था केली आहे.
व्हायरल दावा खोटा आहे, व्हिडिओमध्ये दिसणारे सर्व तरुण राजस्थानमधील भरतपूर येथे झालेल्या एका खून प्रकरणातील आरोपी असून पोलिसांशी झालेल्या चकमकीत जखमी झाले होते.
मुलीची छेड काढणाऱ्या आरोपींची युपी पोलिसांनी केलेली अवस्था असे सांगून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तीन जखमी तरुण जमिनीवर रांगताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना असा दावा केला जात आहे की, “सेहाब, अफजल आणि फैजल….,!ही तीन उनाड गुंड मुस्लीम मुले…! उत्तर प्रदेशात राहतात ! एका हिंदू मुलीला, सायकल चालवताना अफजलने ओढले….! उरलेल्या दोघांनी त्या मुलीला बाईकने धडक दिली आणि तेथून पळ काढला…! या घटनेनंतर फक्त 24 तासातच योगीजींनी त्या तिघा गुंडांच्या पायात गोळ्या घातल्या. त्यांनी उपचार घेतले…, आणि त्यानंतर मात्र त्यांना व्हीलचेअर न देता तुरुंगात पाठवले…! ही आहे आपल्या राष्ट्रीय पक्षाची हिम्मत…! आणि ही हिंमत आमच्यासाठी आहे….!! भाजप सोडून दुसरा कोणता पक्ष आहे का ? बुरे काम बुरा नतिजा ! भुगतना तो पड़ेगा!”
व्हायरल व्हिडिओ ३० सेकंदांचा आहे. व्हिडिओमध्ये तीन तरुण जमिनीवर रांगताना दिसत आहेत. तिन्ही तरुणांच्या पायावर प्लास्टर दिसत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील असल्याचा दावा करत शेअर केला जात आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की व्हायरल व्हिडिओसोबत केला जात असलेला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ राजस्थानमधील भरतपूरचा आहे. जिथे एका खून प्रकरणातील तीन संशयितांना पोलिसांशी झालेल्या चकमकीत पायात गोळी लागली होती.
तपासात सर्वप्रथम आम्ही व्हायरल व्हिडिओच्या काही किफ्रेम्स काढून रिव्हर्स इमेज सर्च केला. यामध्ये आम्हाला १८ सप्टेंबर २०२३ रोजी फर्स्ट इंडिया न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला एक व्हिडिओ रिपोर्ट सापडला. या रिपोर्टमध्ये व्हायरल व्हिडिओ देखील आहे. व्हिडिओ रिपोर्टनुसार, जमिनीवर रांगणारे तीन तरुण राजस्थानातील भरतपूर येथे नुकत्याच घडलेल्या अजय झमारी हत्याकांडातील आरोपी आहेत. अटकेदरम्यान पोलिसांशी झालेल्या चकमकीत आरोपींच्या पायाला गोळी लागली.
आता आम्ही संबंधित कीवर्ड्सच्या मदतीने यासंदर्भात शोधले. आम्हाला दैनिक भास्करच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला. या रिपोर्टमध्ये अजय झमारी हत्या प्रकरणातील तीन आरोपींचे फोटो आहेत, ज्यांना पोलिस चकमकीत गोळ्या घालण्यात आल्या होत्या.
रिपोर्टनुसार, २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी भरतपूरमधील हिरदास चौकात अजय झमारी नावाच्या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की तीन आरोपी डेहराडूनमध्ये लपले आहेत, त्यानंतर पोलिसांनी युवराज, बंटी आणि तेजवीर या तिन्ही आरोपींना डेहराडून येथून अटक केली आणि ५ सप्टेंबरच्या रात्री त्यांना भरतपूरला आणले.
भरतपूर पोलिसांच्या जिल्हा विशेष पथकाने (डीएसटी) तिन्ही आरोपींना अटलबंद पोलिस ठाण्यात सोपवण्यास सुरुवात केली तेव्हा पुढे चकमक घडली. तेजवीर नावाच्या आरोपीने एका कॉन्स्टेबलची पिस्तूल हिसकावून घेतली आणि पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला तेव्हा त्याने गोळीबार केला. यादरम्यान एका पोलिस अधिकाऱ्याच्या छातीतही गोळी लागली, परंतु बुलेटप्रूफ जॅकेटमुळे कोणतीही हानी झाली नाही. यानंतर पोलिसांनीही गोळीबार केला आणि तिन्ही आरोपींच्या पायात गोळ्या लागल्या. गोळी लागल्यानंतर, आरोपींना जवळच्या आरबीएम रुग्णालयात हलवण्यात आले आणि नंतर तिघांनाही जयपूरला रेफर करण्यात आले.
तपासादरम्यान, आम्ही दैनिक भास्करच्या बातमीत वापरण्यात आलेल्या तीन आरोपींच्या छायाचित्रांशी व्हायरल व्हिडिओची तुलना केली आणि आढळले की दोन्ही व्हिडिओंमध्ये दिसणारे तीन तरुण एकसारखेच आहेत. खालील चित्रातही तुम्ही ही समानता पाहू शकता.
आमचा तपास अधिक बळकट करण्यासाठी आम्ही अटल बंद पोलिस ठाण्याचे एसएचओ मनीष शर्मा यांच्याशीही संपर्क साधला. व्हायरल व्हिडिओला दुजोरा देताना त्यांनी सांगितले की, “या व्हिडिओमध्ये दिसणारे तीन आरोपी अजय झमारी हत्याकांडातील आहेत. व्हिडिओमध्ये, युवराज प्रथम दिसतो तर त्यानंतर दिसणारे बंटी आणि तेजवीर आहेत.”
यापूर्वीही हा दावा चुकीच्या दाव्याने व्हायरल झाला होता, त्यावेळी न्यूजचेकर हिंदीने केलेले फॅक्ट चेक आपण येथे वाचू शकता.
व्हायरल दावा खोटा आहे, व्हिडिओमध्ये दिसणारे सर्व तरुण उत्तरप्रदेश येथील नसून राजस्थानमधील भरतपूर येथे झालेल्या एका खून प्रकरणातील आरोपी आहेत, पोलिसांशी झालेल्या चकमकीत ते जखमी झाले होते.
Our Source
Article published on Dainik Bhaskar Website
Video Reports of First India News
Telephonic Conversation With Atalband SHO
Salman
July 3, 2025
Kushel Madhusoodan
July 2, 2025
Vasudha Beri
July 1, 2025